जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी कुठं गेले ? अजित पवार
मुंबई : महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाच भयंकर संकट ओढवलं असून त्याला अनुसरून आज एनसीपी पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, जर आज राज्यावर दुष्काळ ओढवला असेल तर जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी नेमके गेले कुठं? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
दरम्यान, शिर्डी मधील भाषणादरम्यान मोदींनी उल्लेख केला होता की, जलयुक्त शिवार योजनेमुळे १६,००० गावांना पाणी मिळाले. पण, पंतप्रधानांचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे असा आरोप पत्रकार परिषदेत अजित पवारांनी केला. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जलयुक्त शिवार योजना आणली. परंतु, ताशा प्रकारची कामे झाली असल्याचे काहीच दिसत नाही. जर असं असेल तर मग या योजनेचे ७,५०० कोटी रुपये गेले कुठे, असा थेट प्रश्न उपस्थित करून अप्रत्यक्ष पणे भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे आणि ग्रामीण महाराष्ट्र होरपळून निघण्याची चिन्ह आहेत. राज्यात याआधी १९७२ दुष्काळाची भयंकर स्थिती ओढवली होती. परंतु सध्या त्यापेक्षा सुद्धा भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं. परंतु, राज्य सरकार अजूनही अधिकृत पणे दुष्काळ घोषित करत नाही. त्यामुळे राज्य सरकारने ताबडतोब दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ३३ टक्के वीजबील माफ केल्याचे राज्य सरकार सांगते. परंतु, महावितरण आज सुद्धा वीजबीलं पाठवतच आहे. सणांच्या दिवशी लोकांना अंधारात ठेवण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने भारनियमन ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.
राज्यातील ऐरणीच्या दुष्काळाच्या प्रश्नावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते @AjitPawarSpeaks , विरोधी पक्षनेते @dhananjay_munde व प्रमुख प्रवक्ते @nawabmalikncp यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रवक्ते @Clyde_Crasto उपस्थित होते.#PressConference pic.twitter.com/VChzIF0N6U
— NCP (@NCPspeaks) October 25, 2018
राज्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. १९७२ हूनही भयंकर दुष्काळ परिस्थिती आज निर्माण झाली आहे, मात्र सरकार दुष्काळ घोषित करत नाही. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आ. @AjitPawarSpeaks यांनी यावेळी केली. #PressConference pic.twitter.com/t8xL4BH205
— NCP (@NCPspeaks) October 25, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की जलयुक्त शिवार योजनेमुळे साडेसोळा हजार गावांना पाणी मिळाले. हा दावा खोटा आहे. सरकारने गाजावाजा करत ही योजना आणली. मात्र कामे झाली असल्याचे दिसत नाही. मग साडे सात हजार कोटी गेले कुठे, असा प्रश्न आ. @AjitPawarSpeaks यांनी उपस्थित केला. pic.twitter.com/SZ2CrPdIJ0
— NCP (@NCPspeaks) October 25, 2018
३३ टक्के वीजबिल माफ असे सरकार म्हणते मात्र #महावितरण अजूनही बीलं पाठवतच आहे. कोळशाबाबत समन्वय साधावा तर सरकार म्हणतंय की कोळसा नाही. सणांच्या दिवशी लोकांना अंधारात ठेवण्याचे काम सरकार करत आहे. सरकारने भारनियमन ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी आ. @AjitPawarSpeaks यांनी केली. pic.twitter.com/iHzpV0Boei
— NCP (@NCPspeaks) October 25, 2018
कर्जमाफीला १४ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला मात्र अजूनही यादी फायनल नाही. शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. आम्हाला या विषयात राजकारण आणायचे नाही, सरकारला आम्ही मदत करायला तयार आहोत. परंतु शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे, असे आ. @AjitPawarSpeaks यांनी स्पष्ट केले. pic.twitter.com/goNeAgn1yU
— NCP (@NCPspeaks) October 25, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS