18 April 2025 9:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 19 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

महाराष्ट्रनामा'च्या बातमीला यश, पार-तापी-नर्मदा पाणीवाटपावरून भुजबळांच मुख्यमंत्र्यांना पत्र

नाशिक : गुजरात राज्याने पार-तापी नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे तापी खोऱ्यातील ४३४ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्र पाठवून गुजरातने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी द्यावे अशी विनंती केली होती. परंतु गुजरात सरकारने स्पष्ट नकार देत महाराष्ट्र सरकारची विनंती धुडकावून लावत मुख्यमंत्र्यांच्या विनंती पत्राला केराची टोपली दाखविली आहे.

परंतु भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने त्याबद्दल कोणताही आवाज उठवला नव्हता. त्यासंबंधित बातमी महाराष्ट्रनामा’ने प्रसिद्ध करून त्या गंभीर विषयाला वाचा फोडली होती. त्या विषयाला खुद्द माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी वाचा फोडली असून, महाराष्ट्र सरकारने पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पास विरोध दर्शवून गुजरात सरकारला आक्रमक पणे महाराष्ट्राची असहमती दर्शवावी आणि त्या प्रकल्पाबाबत गुजरात सरकार व केंद्र सरकार बरोबर कोणताही लिखित करार करू नये, अशी मागणी करणार पत्र मुख्यमंत्र्यांना धाडण्यात आलं आहे.

भुजबळांच्या पत्रानुसार राज्यातील दमणगंगा, नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यावर महाराष्ट्र राज्याचा हक्क आहे. तसेच या प्रकल्पाचा महाराष्ट्राला काहीही फायदा नसून, तज्ज्ञ समितीनुसार नार-पार-औरंगा-अंबिका खोऱ्यामध्ये ३७ टी.एम.सी. इतके पाणी आहे. तसेच नार-पार-गिरणा उपसा जोड योजनेद्वारे १२.८० टी.एम.सी पाणी गिरणा उपखोऱ्यात वळवले जाईल. महत्वाचं म्हणजे उर्वरीत २४.२० टी.एम.सी इतकं पाणी पार-तापी-नर्मदा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाद्वारे गुजरात राज्यासाठी वापरण्याचे नियोजन आहे असं तज्ज्ञांचं मत आहे.

त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या विषयाकडे जरी कानाडोळा करत असले तरी या गंभीर विषयावरील बातमीने विरोधक आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या