5 November 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

आमच्या सरकारमुळे उत्तर भारतीयांना धमकावण्याचे प्रकार बंद: फडणवीस

मुंबई : युपी ही जन्मभूमी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वनवासातील चौदा वर्षे नाशिकच्या पंचवटीत व्यतीत केली. त्यामुळे यूपी आणि महाराष्ट्राचे हजारो वर्षांचे ऋणानुबंध आहेत. तसेच राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकासात उत्तर भारतीय समाजाचे मोठे योगदान आहे. यापूर्वीच्या सरकारच्या काळात उत्तर भारतीयांना धमकावण्याचे प्रकार वारंवार घडत. मात्र, मागील साडेचार वर्षे आमच्या सरकारच्या कामगिरीमुळे त्यांना कोणी सुद्धा धमकावले नाही, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात केला.

मुंबईतील सांताक्रुझ येथे ‘उत्तर भारतीय स्थापना दिन’ मेळाव्यात काल मुख्यमंत्री उपस्थितांना संबोधित करत होते. दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह युपीचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित होते. मागील ३१ वर्षांपासून उत्तर प्रदेश दिन आयोजित करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मुंबई सरचिटणीस अमरजीत मिश्र यांचे फडणवीसांनी यावेळी तोंडभरून कौतुक केले. या वेळी उत्तर भारतीय नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.

तसेच आज सकाळीच लखनऊ येथे उत्तर भारतीय स्थापना दिवस साजरा केला. आता सायंकाळी आम्ही उत्तर भारतीय स्थापना दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आल्याचे आदित्यनाथ योगी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x