26 April 2025 7:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

आता ट्रॅफिक पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही

नवी दिल्ली : केंद्रीय परिवाहन मंत्रालयाच्या अध्यादेशानुसार डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर तुमच्या वाहनांची मूळ कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमची ट्रॅफिक पोलिसांच्या नियमातून सुटका होण्याची शक्यता आहे.

या अध्यादेशानुसार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल केल्याने आता यापुढे तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांना तुमचे मूळ लायसन्स तसेच गाडीची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी मागता येणार नाहीत. कारण डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.

याआधी वाहन चालकांना किंवा वाहन धारकाला प्रवासादरम्यान वाहनाची कागदपत्रे, लायसन्स, पीयुसी, इंन्शुरन्स सोबत ठेवणे अनिवार्य होत आणि त्या नेहमी सोबत हाताळणे शक्य होत नव्हते. त्यात ट्रॅफिक पोलिसांनी अडविल्यास नाहक भुर्दंड भरावा लागत होता. परंतु या सर्व त्रासातून मुक्तता होणार आहे. वाहनाच्या नंबरवरून पोलीस त्यांच्या मोबाईलवरील अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा पोलीस आणि वाहन चालक या दोघांनाही होणार आहे.

यासाठी खास करून माहिती तंत्रज्ञान कायदा २०० आणि मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये हे फेरबदल करण्यात आले आहेत. डिजिटल डॉक्युमेंट वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वीकारली जात नसल्याच्या अनेक तक्रारी परिवाहन मंत्रालयाकडे माहिती अधिकारामार्फत करण्यात आल्या होत्या असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony