15 January 2025 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

मोदींना आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी तो १३५० किमी पायी दिल्लीला

नवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडीशाचा दौऱ्यावर आले असता, त्यांनी जनतेला इस्पात जनरल हॉस्पिटलला सुपर स्पेशलिटी करण्याचे व ब्राह्मणी पुल उभा करण्याचे जाहीर आश्वासन दिल होत. मोदींच तेच आश्वासन २०१८ उजाडल तरी प्रत्यक्ष अस्तित्वात न उतरल्याने, त्याची आठवण मोदींना करून देण्यासाठी ३० वर्षीय मुक्तिकांत बिस्वल पायी दिल्लीला पोहोचला.

मुक्तिकांत बिस्वल ओडीशावरून १३५० किमी चक्क पायी चालत दिल्लीला पोहोचला आहे. मोदींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी राऊरकेला येथे मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटल उभारण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले होते, त्याचीच आठवण करून देण्यासाठी मुक्तिकांत पायी दिल्लीला पोहोचला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सुद्धा त्यालाच अनुसरून काँग्रेस ते आश्वासन पूर्ण करेल असं मुक्तिकांतला ट्विट करत हमी दिली आहे. तसेच संधी मिळताच मोदींना टोला लगावला आहे की, तीन वर्षापूर्वी मोदींनी दिलेलं मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्याचे वचन आणि त्याची आठवण करून देण्यासाठी मुक्तिकांत १३०० किमी चालत दिल्लीला आला आहे…..लोक मरत आहेत.

मुक्तिकांत व्यवसायाने मूर्तिकार असून तो ओडिशाहून दिल्लीला पायी चालत व हातात तिरंगा घेऊन शनिवारी दिल्लीला पोहोचला आहे. परंतु पायी प्रचंड प्रवास करून आल्याने तो आग्रा महामार्गावर बेशुद्ध पडल्याने मुक्तिकांतला इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x