महत्वाच्या बातम्या
-
शांतीवार्ता! १८२ मदरसे ताब्यात, १०० दहशतवादी अटकेत: पाकिस्तान गृह मंत्रालय
पाकिस्तानने इस्लामिक दहशतवाद्यांविरूद्ध मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यादरम्यान पाकिस्तानी सरकारने एकूण १८२ मदरसे स्वतःच्या नियंत्रणात घेत, पाकिस्तानने बंदी घातलेल्या संघटनांशी संबधित असलेल्या शंभर दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई आम्ही योग्य नियोजन करून अमलात आणल्याचे पाकिस्तानच्या सरकारकडून सांगण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
सेना - भाजप षटकार मारण्याच्या तयारीत? लोकसभा - विधानसभा एकत्रित?
लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका देखिल लोकसभे सोबत घेण्यात येतील अशी माहिती काही सूत्रांनी दिली असून शुक्रवारी विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आणला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने युतीच्या वेळेस भाजपला काही अटी सांगितल्या होत्या आणि त्यातली एक अट म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाव्यात.
6 वर्षांपूर्वी -
अदाणी झाले! आता अनिल अंबानींना गुजरातमधील ६४८ कोटीच्या विमानतळाच्या कंत्राटाची लॉटरी
राफेल लढाऊ विमानांच्या प्रकरणावरुन आधीच गर्तेत अडकलेले उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीला गुजरातमधील विमानतळांचे कंत्राट देण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आर इन्फ्रा म्हणजे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला तब्बल ६४८ कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. याबाबत कंपनीकडूनच माहिती देण्यात आली आहे. आर इन्फ्राने सर्वात कमी बोली लावून हे कंत्राट मिळवले आहे. अनिल अंबानींचं राफेल करारानंतरचं हेआणखी एक यशस्वी उड्डाण ठरलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांनी १०६ कोंटींचा मोबाईल घोटाळा केला: धनंजय मुंडे
ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांच्या केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईलमध्ये तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चिक्की घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा पंकजा यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप लागले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजप खासदाराने भाजप आमदाराला बुटाने मारले, 'मेरा बूट सबसे मजबूत'
भाजप खासदाराने भाजप आमदाराला बुटाने मारले, ‘मेरा बूट सबसे मजबूत’
6 वर्षांपूर्वी -
नवाझ शरीफांना पाकिस्तानातं जाऊन मिठी मारणारे मोदीच पाकिस्तानचे 'पोस्टर बॉय: राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत. पाकिस्तानच्या दौऱ्यावर आम्ही गेलो होतो का, नवाझ शरीफ यांना भेटायला आम्ही गेलो होतो का ?. पठाणकोटमध्ये कोण आले होते ते, ISI वाले, त्यांना आम्ही बोलावलं होतं ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षांनी मोदींना पाकिस्तानचा पोश्टर बॉय म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: अमेरिकन प्लॅनेट लॅब्जने बालाकोट मदरसा संकुलाचे सॅटेलाईट व्हिडिओ प्रसिद्ध केले, भारतीय माध्यमं तोंडघशी?
पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे आणि अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते खुलेआम दावे करत आहेत. भारतीय वायुदलाने कोण आणि किती जण मृत्युमुखी पडले ते आमचं काम नाही असा अप्रत्यक्ष संदेश दिला होता. तर दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य सचिव विजय गोखले यांनी ती ‘बिगर लष्करी कारवाई’ तसेच ‘प्रतिबंधात्मक कारवाई’ असा शब्दप्रयोग करून सामान्यांना बरंच काही सांगितलं होतं. परंतु. भारतीय प्रसार माध्यमांनी विषय वेगळ्या पद्धतीने चिघळवुन सत्ताधाऱ्यांसाठी लोकसभेच्या अनुषंगाने हवानिर्मिती करण्यास मदत केल्याचं पाहायला मिळालं.
6 वर्षांपूर्वी -
'चौकीदार चौकंन्ना' असून देखील 'सगळं चोरीला जातंय' आपल्या देशातून? राहुल गांधी
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची स्तुती करताना तुमच्या देशाचा ‘चौकीदार चौकंन्ना’ असे असं म्हटलं होतं. परंतु आता नुकत्याच घडलेल्या घटनेने ते तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राफेल लढाऊ विमानांच्या डीलमधील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वतः महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. परंतु, या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
'मेरा बूट सबसे मजबूत', भाजप खासदार व आमदारांचा एकमेकांवर 'चप्पल स्ट्राईक'
समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षामध्ये झालेल्या आघाडीने यूपीत भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वादही उफाळून आला आहे. संत कबीरनगर मतदारसंघामध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान भाजपा खासदार शरद त्रिपाठी आणि स्थानिक आमदार राकेश सिंह यांच्यात तुफान हाणामारी झाली. या प्रकाराच्या व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी-शहा म्हणजे सत्तेच्या लालसेने झपाटून उठलेले गुंड: वाजपेयींच्या पुतणी करुणा शुक्ला
देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतणीने नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी सत्तेच्या लालसेपोटी भाजपाची विचारसरणीच बदलून टाकल्याचा आरोप करुणा शुक्ला यांनी केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे गुंड असल्याचा घणाघात करुणा शुक्ला यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने ढापून दाखवलं! निवडणूका भाजपच्या बळावर व विकास मनसेच्या जीवावर
नाशिक ते मुंबई सत्ताधाऱ्यांनी मनसेची विकासाची कामं ढापण्याचा सपाटा लावला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्ष कामाला लागले असताना ५ वर्ष राजीनामा नाट्यात व्यस्त असणाऱ्या शिवसेनेने आता इतरांची कामं स्वतःच्या नावावर दाखवून सामान्यांना टोप्या लावण्याचे उद्योग सुरु केले आहेत. विशेष, म्हणजे ज्या विकासाच्या कामाशी काहीही संबंध नसताना न केलेल्या कामाचं श्रेय देखील शिवसेना घेत असून दादरकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
CRPF शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी मागितले दहशतवाद्यांच्या मृतदेहांचे पुरावे
पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या यूपीतील २ सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांने एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात किती दहशदवादी ठार झाले त्याचे पुरावे मागितले आहेत. भाजपचे नेते आणि प्रसार माध्यमं निरनिराळे आकडे सांगत असले तरी भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेल आहेत यावरुन विरोधक, आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमं तर प्रश्नचिन्ह उपस्थित करतच आहेत. परंतु आता शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी देखील किती दहशदवादी मारले गेले त्याचे पुरावे मागितले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
'चौकीदार चौकंन्ना' असून देखील राफेल संबंधित महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला कशी? नेटकरी
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची स्तुती करताना तुमच्या देशाचा ‘चौकीदार चौकंन्ना’ असे असं म्हटलं होतं. परंतु आता नुकत्याच घडलेल्या घटनेने ते तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राफेल लढाऊ विमानांच्या डीलमधील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वतः महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. परंतु, या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला; सुप्रीम कोर्टात माहिती
राफेल लढाऊ विमानांच्या डीलमधील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वतः महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. परंतु, या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकार साखर सम्राटांवर मेहेरबान: सविस्तर
राज्यातील आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या राज्यातील एकूण १५ सहकारी साखर कारखान्यांना राजगोपाल देवरा समितीच्या शिफारशींचा विचार करून मदत करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय राजकीय हेतूने घेतल्याचा आरोप अनेक विरोधकांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कर्तारपूर कॉरिडॉर संदर्भात पाकचे अधिकारी भारत भेटीवर येणार: पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालय
पुलवामा भ्याड हल्ला आणि एअर स्ट्राईकनंतर भारत पाकिस्तानमधील परिस्थिती नाजूक झालेली असताना आता शांतीवार्ता सुरु होण्याचे अनेक प्रकार पुढे येऊ लागले आहेत आणि तणाव कमी करण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळेच कर्तारपूर कॉरिडॉर हा एक भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर करण्याचा महत्वाचा मार्ग ठरण्याची शक्यता आहे. कारण विषयाला अनुसरून चर्चेसाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच भारत भेटीवर येणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमोल कोल्हे राष्ट्रवादीत जाताच बिथरलेली सेना स्थानिक मनसे आमदाराला फोडण्याच्या तयारीत?
अभिनेते अमोल कोल्हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत जाताच आढळराव पाटलांच्या जय पराजयाच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने आत्तापासूनच जमवाजमव सुरु करण्यास सुरुवात केली आहे. त्यात मनसेचे आमदार शरद सोनावणे यांचा जुन्नर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभेत येत असल्याने सेनेकडून त्यांना फोडण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कॅग पुरावे: अमेठीत ऑर्डनन्स फॅक्टरी २००७ पासून, एके २०३ बंदुकांबद्दल वाचून हसा! मोदींनीं गंडवल?
अमेठीत राजकारण तापू लागलं आहे आणि मोदींच्या कालच्या अमेठीतील सभेनंतर लष्करी उत्पादन करणाऱ्या त्या फॅक्टरीवरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. त्यानंतर सरकार पुरस्कृत नसलेल्या माध्यमांनी सखोल विषयात जाऊन तथ्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी धादांत खोटं बोलतात याचे कागदोपत्री पुरावेच समोर आले आहेत. सध्या लष्कराच्या नावाने भावनिक झालेले वातावरण पाहून मी सांगेन ती पूर्व दिशा लोकं समजतील अशा अविर्भावात ते वावरत आहेत. लष्कराच्या आडून राजकारण खेळत मी म्हणजे भारत आणि मी म्हणजे भारतीय लष्कर असा कांगावा करून लोकशाहीतील सर्व विरोधक म्हणजे पाकिस्तान समर्थक आहेत अशी हवा निर्मिती करून, देशातील सर्वच मोठ्या राजकारण्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करण्याची रणनीती आखात आहेत असंच पुरावे सांगतात. त्यासाठी कितीही खोटं बोलायला तयार आहेत असं पुरावे सांगतात.
6 वर्षांपूर्वी -
डिजिटल भाजपाची वेबसाईट हॅक!
भारतीय जनता पार्टीची अधिकृत वेबसाईट हॅक झाली आहे. ही वेबसाईट उघडताच प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर एंजेला मर्केल यांचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओसोबत अश्लिल शब्दांचाही वापर केल्याचे समोर आले. त्यानंतर काही मिनिटांतच भाजपाची ही वेबसाईट मेंटेनन्सच्या नावाने काही काळासाठी बंद केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तर ती प्रकाश आंबेडकर यांची पहिली व शेवटची राजकीय चूक ठरेल? सविस्तर
महाराष्ट्रासारख्या राज्यात भीमा-कोरेगाव सारखी दुर्दैवी घटना घडणे ही खरंच लाजिरवाणी गोष्ट होती. दोन समाज आणि त्यांची मन त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीने दुभंगली होती. त्यात समाज माध्यमांवरील अफवा आणि विकृत प्रचाराने सीमा ओलांडल्याने परिस्थिती अनेक महिने नाजूक होती. त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भाजप आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांबद्दल वंचित बहुजन समाजात मोठी चीड निर्माण झाली. परंतु, या संपूर्ण घडामोडीत काही ठराविक भागा पुरतं मर्यादित असलेलं प्रकाश आंबेडकर यांचं नैतृत्व राज्यपातळीवर पोहोचलं.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN