महत्वाच्या बातम्या
-
हुकूमशाही? भाजप पक्षाचे झेंडे घरावर लावण्यासाठी कार्यकर्त्यांची जबरदस्ती
हुकूमशाही? भाजप पक्षाचे झेंडे घरावर लावण्यासाठी कार्यकर्त्यांची जबरदस्ती
6 वर्षांपूर्वी -
आम्हाला कमळाने फसवले! कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका: मराठा क्रांती मोर्चा
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आणि उमेदवार निश्चितीला वेग आलेला असताना भाजपाला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. कारण मराठा क्रांती मोर्चाने देखील लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका आहे, असे सांगत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जाहीर घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मराठा समाजावर अन्यायच केला, असे क्रांती मोर्चाने म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवेंद्रराजे व नरेंद्र पाटील यांच्यात मिसळ पे चर्चा! उदयनराजेंविरुद्ध रणनीती?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने वेगवेगळ्या रणनीती अवलंबण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात एनसीपीने विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर विरोधकांमध्ये जोरदार राजकीय वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. या विषयाच्या अनुषंगाने, शिवेंद्रसिंहराजे आणि भाजपाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील आज एकत्र मिसळ खाताना दिसल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरे मर्द होते तर उद्धव ठाकरे घुटने टेकू: अबू आझमी
स्वबळाची शपथ घेणारे आणि मागील साडेचार वर्ष सत्तेत राहून भाजप आणि मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्वच विरोधकांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारत-पाकिस्तान शत्रुत्त्वामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागतील: डोनाल्ड ट्रम्प
पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिस्थिती चिघळताना दिसत आहे. जागतिक बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेतून देखील सतर्कतेचे इशारे दिले जात आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. तसेच भारत आता मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे, असे ट्विटदेखील त्यांनी केले आहे. त्यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून १३० कोटी रुपयांची मदत रोखली आहे. पाकिस्तानने अमेरिकेचा विश्वासघात केला असेही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना ट्रम्प यांनी उचलेलं हे पाऊल म्हणजे भारतासाठी एक प्रकारे मदत समजली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या सांगण्यावर सभेची स्थळं निश्चित? आज शिवाजी पार्कात वंचित आघाडीची जाहीर सभा
मागील ३ महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभांच्या धडाक्यानंतर आज मुंबईत शिवाजी पार्कवर सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस महाआघाडीत सहभागाची अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत. एमआयएमचे अध्यक्ष खा. असुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुरावे! पुलवामा हल्ल्याच्या दिवशी नरेंद्र मोदी संध्याकाळपर्यंत फोटोशूट करत होते?
पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ ३ तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात, त्यामुळे बोलताना विचार करा: फडणवीस
काही दिवसांपासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभांमधून नरेंद्र मोदी यांना चांगलेच लक्ष करत, तिखट प्रहार केले आहेत. त्यामुळे त्यांची टीका भाजपच्या देखील जिव्हारी लागत आहे असं म्हणावं लागेल. विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून त्यांना सभेत नकलाकार आणावे लागतात आणि ती लोक पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची स्टाइल मारत फिरतात. पण मी या नकलाकारांना इतकंच सांगतो की तुम्ही सूर्याकडे पाहून थुंकले की थुंकी आपल्याच चेहऱ्यावर पडते, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे. छगन भुजबळ हे स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगात गेला. अजून तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, किती बोलावं आणि काय बोलावं याचा जरा विचार करा, असेही त्यांनी भुजबळांना सुनावले आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकरांचा नक्की गेम प्लॅन काय आहे? पृथ्वीराज चव्हाण
बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस पहिल्यापासून तयार आहे. परंतु ते आमच्या प्रस्तावावर टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. आंबेडकरांचा नक्की गेम प्लॅन काय आहे हेच अद्याप समजत नाही, असा आरोप काँंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण; प्रेस नोटवरून आदित्य ठाकरेंची प्रसार माध्यमांवर आगपाखड
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेत आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकत्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. गुरूवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने तंबी देताच ते काश्मिरी तरुण सभ्य झाले, काल जय जयकार केलेल्या युवासैनिकांची हकालपट्टी
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेत आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकत्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. गुरूवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आघाडीसोबतचे तर्क केवळ माध्यमांमध्ये, पण राज ठाकरेंची वेगळीच रणनीती आहे?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती आणि त्यानंतर माध्यमांमध्ये या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. त्यात राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, तत्पूर्वी एक घटना दिल्लीत घडली होती आणि ती म्हणजे स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांसमोरच एकमेकांना भिडले
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केलेली असताना, माढा मतदार संघात येणाऱ्या फलटण तालुक्यात एनसीपीमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. दरम्यान, आज स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दौऱ्यावर आले असताना त्यांच्यासमोरच शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वादावादी झाली. कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे कार्यक्रमात गोंधळ आणि तुफान घोषणाबाजी सुरू झाली, त्यामुळे पवारांना देखील आपले भाषण काहीवेळ थांबवावे लागले.
6 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशात अपना दल भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत
एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भारतीय जनता पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. युपी’मध्ये भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी एनडीए सोडण्याचा इशारा दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राइकचे हिरो डी. एस. हुडा यांचा राहुल गांधींना 'हात'
लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसनं राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केली आहे. सर्जिकल स्ट्राइकचं नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्याकडे या कृती दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. देशासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचं काम हुडा यांच्याकडे असेल. ते देशाच्या सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मतं विचारात घेऊन सदर आराखडा तयार करतील. सर्जिकल स्ट्राइक दरम्यान हुडा नॉर्दन आर्मीचे कमांडर होते.
6 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळ यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण
छगन भुजबळ यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण
6 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडे यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण!
धनंजय मुंडे यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण!
6 वर्षांपूर्वी -
युती झाल्याने नगरमध्ये शिवसेनेचे घनश्याम शेलार यांनी शिवबंधन तोडलं
भाजप बरोबर युतीच निर्णय जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत नाराजांची संख्या वाढत जाण्याची शक्यता आहे. त्याचाच प्रत्यय नगर जिल्ह्यात आला आहे. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीगोंद्यात सेनेला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
6 वर्षांपूर्वी -
आली रे आली लोकसभेआधी बाजारात "मोदी साडी" आली
आली रे आली लोकसभेआधी बाजारात “मोदी साडी” आली
6 वर्षांपूर्वी -
राफेल करार; पुनर्विचार याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार
राफेल कराराप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या निकालासंदर्भात दाखल झालेल्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालात राफेल करारात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्रुटी आढळलेल्या नाही, असे स्पष्ट करतानाच या कराराच्या चौकशीची मागणी फेटाळली होती.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL