महत्वाच्या बातम्या
-
मनसे आयोजित ५०० गरीब जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा उत्साहात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जिल्ह्यातील ५०० गरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, येत्या शनिवारी होणाऱ्या या विवाह सोहळ्याला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून मनसेने पालघर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
NRC वरून संपूर्ण आसाम भाजपविरोधात पेटण्याची शक्यता?
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक अर्थात NRC नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवताना, कोणीही भारताला इस्लामिक देश करण्याचा प्रयत्न करु नये असे मत मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांनी याचिकेच्या सुनावणी दरम्यान व्यक्त केले आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर धर्माच्या आधारे भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे होते, परंतु भारताने धर्म निरपेक्ष भूमिका स्वीकारली, असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहांची आज पुणे, बारामती, मावळ व शिरूर मतदारसंघासाठी आढावा बैठक
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुढील आठवड्यात पुणे दौ-यावर येत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ते पुणे, बारामती, मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण आढावा घेणार असल्याचे वृत्त आहे. तसेच संबंधित मतदारसंघातील बुथ प्रमुखांना ते मार्गदर्शन सुद्धा करणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
प्रभू रामचंद्र हे हिंदूंचेच नाही, मुस्लिमांचेही वंशज: रामदेवबाबा
प्रभू रामचंद्र हे केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा पूर्वज आहेत, त्यामुळे उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर काही करून होणारच. अयोध्येत राम मंदिर होणार नाहीतर काय मक्का मदिना किंवा व्हॅटिकनमध्ये होणार का? असा प्रति प्रश्न सुद्धा योगगुरू रामदेवबाबा यांनी उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात महायुद्ध जिंकली, पण लष्कराचा स्वतःच्या प्रचारासाठी वापर नाही केला
भारतीय लष्कर म्हटलं की तो सामान्य भारतीयाचा एक भावनिक आणि जिव्हाळ्याचा विषय. वास्तविक भारतीय लष्कराला कोणतीही जात धर्म आणि भाषा नसते. पाकिस्तानसोबत २ महायुद्ध आणि १ चीनसोबत असा भारतीय लष्कराचा मोठा इतिहास आहे. त्यात पाकिस्तानला २ महायुद्धात धूळ चारण्याऱ्या भारतीय लष्कराच्या गाथा तितक्याच भव्य आहेत. त्यावेळचा काळ म्हणजे काँग्रेसचा आणि काँग्रेसी राजकारणाचा अशीच तत्कालीन राजकीय परिस्थिती होती. तरी लष्कर हे सार्वभौम समजून त्या भारतीय लष्कराला थेट राजकीय पक्षाशी जोडून स्वतःचा किंवा स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्याचा किळसवाणा प्रकार कधी घडला नाही, किंबहुना सध्या जसं सुरु आहे त्याप्रमाणे तर नक्कीच नाही.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात स्मारक व पुतळ्यांवर खर्च केलेले पैसे परत करा: सुप्रीम कोर्ट
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाकडून बसपा अध्यक्षा मायावतींना जोरदार झटका मिळाला आहे. उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान असताना, आपल्या पदाच्या गैरवापर करत स्मारक तसेच पुतळ्यांवर वारेमाप खर्च केलेले पैसे परत करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पदाचा गैरवापर करत मायावतींनी सामान्य जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करून लखनौ आणि नोएडामध्ये स्वतःच्या पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीचे पुतळे बांधले होते, हा सामान्य जनतेच्या पैशाचा मोठा गैरवापर आहे असा निर्णय CJI रंजन गोगाई यांच्या खंडपीठाने दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
'चौकीदार ही चोर है' असं आता संरक्षण मंत्रालय सुद्धा म्हणतंय: राहुल गांधी
राफेल लढाऊ विमानांच्या करारात पंतप्रधानांनी थेट हस्तक्षेप केला. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलचं कंत्राट मिळावं म्हणून त्यांनी समांतर वाटाघाटी सुरु केल्या, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पंतप्रधानांनी फ्रान्ससोबत थेट वाटाघाटी केल्यानं भारतीय संरक्षण मंत्रालयाची बाजू कमकुवत झाली, असं वृत्त आज ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आणि त्यानंतर खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गर्व आहे मोदीजी आम्हाला! सत्ता जाण्यापूर्वी अशी कबुली देणारे भारताचे पहिले पंतप्रधान तुम्हीच
देशातील विरोधकांनी नेहमीच नरेंद्र मोदींवर देशातील महत्वाच्या मोठ्या संस्था उध्वस्थ केल्याचा आरोप केला आहे. अर्थात मोदींनी ते कधीच मान्य केलं नसलं तरी त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाने ते एका ट्वीटमध्ये मान्य केल्याचे म्हणावे लागेल. कारण याट्विटमध्ये मोदी स्वत:वरच आरोप करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काय स्टाईलमध्ये! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांची निवेदन स्वीकारण्याची नवी संस्कृती
राज्याच्या जवाबदार मंत्र्यांची अनेक असंस्कृत प्रकरणं समोर आल्याचे पहिले आहे. परंतु, विषय तेव्हाच गंभीर होतं जेव्हा राज्याचे सांस्कृतिक मंत्री स्वतःच्या असंस्कृत वागण्याचं सार्वजनिकरित्या प्रदर्शन मांडतात. सामान्य माणूस देखील एखाद्याची हात मिळवताना सुद्धा उभा राहून सभ्यतेचे दर्शन घडवतो.
6 वर्षांपूर्वी -
यंदा मनसे कार्यकर्त्यांचे तात्या हडपसर मतदारसंघात विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणार बहुतेक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सध्या प्रसार माध्यमं गृहीत धरत असली, तरी अनेक मतदारसंघातील त्यांची तगडी फिल्डिंग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसते. त्यातीलच एक म्हणजे, मनसेचे पुण्यातील विद्यमान नगरसेवक वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांचे लाडके तात्या हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठी फिल्डिंग लावून आहेत. त्यांची मागील काही महिन्यांपासूनची तयारी पाहता स्वतः राज ठाकरेंनी तयारीला लाग असे आदेश आधीच दिले आहेत, असच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान कार्यालयाची ट्विटवरून कबुली, नरेंद्र मोदींनी देशातील संस्था नष्ट केल्या
देशातील विरोधकांनी नेहमीच नरेंद्र मोदींवर देशातील महत्वाच्या मोठ्या संस्था उध्वस्थ केल्याचा आरोप केला आहे. अर्थात मोदींनी ते कधीच मान्य केलं नसलं तरी त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाने ते एका ट्वीटमध्ये मान्य केल्याचे म्हणावे लागेल. कारण याट्विटमध्ये मोदी स्वत:वरच आरोप करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सत्तेचं दबाव तंत्र? पण प्रियांका गांधी रॉबर्ट वाड्रानां नेण्यासाठी बिनधास्त ईडी कार्यालयाकडे आल्या
काल ईडीने प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरांची मुख्यालयात तब्बल ९ तास चौकशी केली. परंतु, त्यांना नेण्यासाठी वढेरा यांच्या पत्नी प्रियंका गांधी ईडीच्या कार्यालयात बिनधास्त आल्याने सर्वच प्रसार माध्यमांना धक्का बसला. त्यांनाही काळा सूट परिधान केला होता आणि थेट ईडीच्या कार्यालयाबाहेरच येऊन थांबल्या.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिराचा विषय हिंदुत्ववाद्यांनीच गुंडाळून ठेवला: शिवसेना
अयोध्येत राम मंदिराबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून होत असलेला वेळकाडूपणा आणि RSS आणि विहिंपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलेल्या भूमिकेवर शिवसेनेने सामनामधून टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राम मंदिराचे काय ते पाहू, असे बोलणे म्हणजे शरयू नदीत बलिदान देणाऱ्यांचा अपमान असल्याचं सामनात म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेच अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करणार: अशोक चव्हाण
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सध्या सत्ताधाऱ्यांच्या गोटात सुरू आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे २८ फेब्रुवारी रोजी राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने जोरदारपणे तयारीला लागा असे आदेश अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करू
सत्तेत आल्यावर तिहेरी तलाक कायदा आम्ही रद्द करू अशी जाहीर घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दिल्लीत आयोजित अल्पसंख्यांक अधिवेशनात महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव यांनी ही घोषणा केली. यावेळी स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून करण्यात आलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरू शकते.
6 वर्षांपूर्वी -
केजरीवाल सरकारचा अर्थसंकल्प 'आधुनिक शाळांचा' तर योगी सरकारचा 'गोशाळांचा'
आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा तिसरा अर्थसंकल्प युपीच्या विधानसभेत सादर झाला. दरम्यान, लवकरच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने योगी सरकारची मोठी कसोटी लागणार होती आणि त्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. युपीचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला.
6 वर्षांपूर्वी -
ईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी झाली
प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात उतरताच त्याचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या पाठीमागे ईडी’चा ससेमिरा लागल्याचे विरोधक आरोप करत आहेत. दरम्यान आज मनी लाँड्रिंगप्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांदी यांचे पती रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीकडून त्यांची तब्बल ५ तास सखोल चौकशी झाल्याचे सांगण्यात येते.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO जम्मू: दूरदूर निर्मनुष्य दल लेक'मध्ये मोदी शूटिंग'साठी माशांना अभिवादन करत होते? नेटकरी
नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे त्यांच्यासोबत फोटोशूट आणि व्हिडिओशूट करणारी विशेष टीम असते हे अनेक वेळा अनुभवण्यात आले आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर मोदी गेले असता पुन्हा आला आहे. कारण मोदींची अभिवादन करण्याची स्टाइल सर्वपरिचित आहे. रविवारी नरेंद्र मोदींनी जम्मूमधील दल लेकमध्ये फेरफटका मारला. परंतु, या बोटीमधून मारलेल्या फेरफटक्यादरम्यानही नरेंद्र मोदी हात वर करुन अभिवादन करतांना दिसत होते.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील सुद्धा: निलेश राणे
भारतातील निवडणूक रणनीतीकार आणि जेडीयू’चे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट काल मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पोस्टमन कर्मचारी सुद्धा अडचणी घेऊन कृष्णकुंज'वर, सत्तेत भाजप-शिवसेना की मनसे?
भारतीय टपाल विभागाचे कर्मचारी म्हणजे सर्वांना माहित असलेले पोस्टमन कर्मचारी उद्या कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध अडचणी त्यांच्या समोर मांडणार असल्याचे वृत्त आहे. भारतीय पोस्ट खात्यातील GPO मध्ये काम करणा-या अनेक पोस्टमन कर्मचा-यांची वेतनवाढ झालेली नाही. त्यात इतर राज्यात त्याच कामासाठी किमान भत्ता ५९३ रूपये असताना आम्हाला त्यापेक्षा कमी भत्ता का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M