महत्वाच्या बातम्या
-
राहुल गांधींनी घेतली पर्रिकरांची सदीच्छा भेट, केली तब्येतीची विचारपूस
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री आणि पूर्व संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची सदीच्छा भेट घेतली. राहुल गांधी हे सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत गोव्यामध्ये सुट्यांसाठी आले आहेत. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अनौपचारिक स्वरुपाची होती, अशी माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी केवळ मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या हेतूने सदर भेट घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन मंदिर समितीला द्या, केंद्राची न्यायालयात मागणी
केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाकडे अयोध्येतील राम मंदिरासाठीची वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन रामजन्मभूमी मंदिर समिती न्यासाला द्यावी, अशी मागणी करणारी याचिका केली आहे. सदर विषयासंबंधित याचिका केंद्राने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. एकूण ६७ एकर जमिनीचे केंद्र सरकारने अधिग्रहण केले होते, परंतु सुप्रीम कोर्टाने त्या अधिग्रहणाला कायदेशीर स्थगिती दिली होती. त्यातच आता पुन्हा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत ६७ एकरातील वादग्रस्त जमिनीचा भाग वगळता शिल्लक राहणारी जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी याचेकेद्वारे कोर्टात मागणी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभेच्या तारखा जाहीर होणार?
आगामी लोकसभा निवडणुकांची तारीख अद्याप जरी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकापूर्व सर्व तयारी सुरु केली आहे आणि त्यामधून हे संकेत मिळत आहेत. देशातील सर्व राज्यसरकारांना २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रशासकीय तयारी आणि तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
माजी संरक्षण मंत्री आणि बंदसम्राट जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन
देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे काल सकाळी दिल्लीतील इस्पितळात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. कामगार नेते, मुंबईच्या सामान्यांशी जोडलेले आणि उभ्या हयातीत मोठी पद भूषवून देखील जमिनीवर राहिलेले, तसेच एकेकाळचे बंदसम्राट अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज एनसीपी’त जाहीर प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात राहिलेल्या वाघेला यांनी आता एनसीपी’सोबत पुढचा राजकीय प्रवास सुरु करण्याची तयारी केली आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी तशी अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी मुलांसाठी एक शाळाही उभारलेेली नाही: अरविंद केजरीवाल
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी थेट शिक्षणव्यवस्था तसेच नव्या शाळांचा दाखल देत दिल्लीतील पालकांना ‘देशभक्ती’ आणि ‘मोदीभक्ती’ या दोन्हीपैकी एक पर्याय निवडण्याचे आवाहन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मलकापूर नगरपालिकेत पृथ्वीबाबांनी भाजपला लोळवलं
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भोसले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. परंतु, मतदानानंतरचे प्राथमिक कल पाहता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात घमासान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
MIM आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे घेतली
महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाच्या आडून समाजात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे, असा आरोप करत MIM चे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान, सदर मराठा आरक्षणा संदर्भातील दाखल झालेल्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी आमदार इम्तियाज जलील यांनी दाखल केलेली मराठा आरक्षणाविरोधातील याचिका अखेर मागे घेतली आहे. तसेच, महाराष्ट्र मागास प्रवर्गाचा संपूर्ण अहवाल मूळ याचिकाकर्ते तसेच विरोधकांना देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
श्रीगोंदा नगरपालिका : काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी
भारतीय जनता पक्ष व काँग्रेस-एनसीपी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. काँग्रेस-एनसीपी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे दणदणीत विजयी झाल्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा एकूण २१०० मतांनी पराभव केला.
6 वर्षांपूर्वी -
मलकापूर नगरपरिषद निवडणूक; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भोसले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आहे. परंतु, मतदानानंतरचे प्राथमिक कल पाहता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात घमासान होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
जिंद पोटनिवडणूक : काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला रिंगणात
हरयाणातील जिंद विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तब्बल २१ उमेदवार या पोटनिवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यात काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला मैदानात उतरल्याने काँग्रेसने सुद्धा ही पोटनिवडणूक प्रतिष्टेची केली आहे. जिंद’ची जागा राखण्यासाठीच काँग्रेसने मोठा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकांना केवळ स्वप्नं दाखवणारा नेता चांगला वाटतो!....गडकरींचा हा टोला कोणाला?
मागे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या रोखठोक वक्तव्यातून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये हेतु पुरस्कर जाहीर खोटी आश्वासने सामान्यांना दिल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले होते. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष देशात सत्तेवर येणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री होती. त्यामुळेच विचाराअंती आम्हाला जाहीर खोटी आणि मोठमोठी आश्वासने देण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु, आता जेव्हा कधी आम्ही देशात सत्तेत आलो आहोत, तर सामान्य जनता आम्हाला दिलेल्या खोट्या आश्वासनांची बरोबर आठवण करून देत आहेत. परंतु, आम्ही केवळ त्यांना एक स्मित हास्य देतो आणि पुढे चालत राहतो, असे त्यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांच्यवर पुन्हा स्वतःच्या वक्तव्यावर खुलासा करण्याची वेळ आली होती.
6 वर्षांपूर्वी -
नाशिक प्रवेशद्वार; तत्कालीन प्रकल्प मनसेचा, त्यावर जल्लोष भाजपचा? सविस्तर
फडणवीसांच्या भाजपने दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये अजून एका स्मार्ट जल्लोषाची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे. याआधी सुद्धा स्मार्ट सिटीच्या नावाने मनसेच्या सत्ताकाळातील प्रकल्प स्वतःचे असल्याचे भास निर्माण करणारी ‘स्मार्ट’ नाशिक भाजप अजून एका स्मार्ट प्रदर्शनाच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांमध्ये फंडिंग चर्चा? बवंआ'च्या सभांना भाजप'प्रमाणे महागडे मंच, एलईडी, मैदानं व संसाधनं?
भाजपच्या प्रत्येक सभा आणि सभेदरम्यान सहज नजरेस पडणारी महागड्या सभेची संसाधनं म्हणजे भव्य मंच, त्यामागील भव्य एलईडी डिस्प्ले, भव्य मैदान आणि अगदी आदेशाप्रमाणे करण्यात येणारे सभेचे थेट प्रक्षेपण हे डोळे दिपवून टाकणारं आहे. परंतु, त्यासाठी खर्ची करावा लागणारा प्रचंड पैसा विरोधकांच्या मनात वेगळीच शंका व्यक्त करत आहे. कारण, कोणत्याही केंद्रीय, राज्य, महानगरपालिका, नगरपालिकामध्ये सत्तेत नसलेल्या दोन पक्षांकडे नेमका पैसा कुठून येतो आहे, असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
FDI नियम; फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, पेटीएम, अमेझॉनचे मेगा सेल बंद
ईकॉमर्स क्षेत्रातील जाईंट फ्लिपकार्ट, पेटीएम, अमेझॉन १ फेब्रुवारीपासून निरनिराळ्या दिवसांच्या निमित्ताने आयोजित करणारे मेगा सेल यापुढे बंद करावे लागणार आहेत. दिवाळी, दसरा, नवीन वर्ष, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा अनेक महत्वाच्या दिवशी ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी खरेदीवर मोठी सूट देऊन एकूण विक्री वाढवायचे. परंतु, सरकारच्या नव्या एफडीआय नियमांमुळे यापुढे या कंपन्यांना हे सर्व येत्या १ फेब्रुवारीपासून करता येणार नाही.
6 वर्षांपूर्वी -
#GoBackModi ट्विटरवर ट्रेंड; 'गो बॅक मोदी', तामिळनाडू दौऱ्याला विरोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडुतील मदुराईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते ऑल इंडिया इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या (AIIMS) इमारतीच्या पायाभरणीचा कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानिमित्त संपूर्ण तामिनाडूत ट्विटवर गो बॅक मोदी #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड करत त्यांना जोरदार विरोध केला जातो आहे. त्यानिमित्त लाखो तमिळ नेटीझन्स आक्रमक झाले असून ट्विटवर मोदींविरोधात रान पेटवण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चंदा कोचर यांच्यावर FIR घेणाऱ्या CBI अधिकाऱ्याची १२५० किमी दूर बदली
आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडियोकॉन समूहाचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांच्यावर FIR दाखल करणाऱ्या CBI अधिकाऱ्याची दुसऱ्याच दिवशी १२५० किलोमीटर दूर बदली करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियांका गांधी मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमीला कुंभमेळात, भाजपची झोप उडण्याची शक्यता
उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुक हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करून लढणार यात अजिबात शंका नाही. त्यामुळे त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांनी कुंभमेळादरम्यान त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कृष्णकुंज'वर आता दोन राजकन्या, अमित व मिताली यांचा आज मराठमोळा विवाह सोहळा
कृष्णकुंज हे महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आज अमित आणि मिताली यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त सजवण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासूनच घराचा परिसर प्रकाशाच्या झगमगाटात उजळून निघाला आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त कृष्णकुंजवर यापुढे उर्वशी आणि मिताली अशा २ राजकन्या असतील. राजकारणातील एक मोठं कुटुंब असलं तरी साधेपणा हा त्यांच्या कुटुंबातील उत्तम गुण आहे.
6 वर्षांपूर्वी -
चपराक! लोकसभा निवडणुकांशी संबंध जोडून लेखिका गीता मेहतांनी 'पद्मश्री' नाकारला
सुप्रसिद्ध वरिष्ठ लेखिका गीता मेहता यांनी नुकताच घोषणा करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार घेण्यास केंद्र सरकारला स्पष्ट नकार दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सदर मानाचा पुरस्कार स्विकारण्याची ही योग्य वेळ नसल्याचे कारण गीता मेहता यांनी पुढे केले आहे. विशेष म्हणजे गीता मेहता या ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या मोठ्या बहिण आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC