महत्वाच्या बातम्या
-
मोदींच्या कार्यकाळात सरकारचे कर्ज ४९ टक्क्यांनी वाढले, तरी घोषणा काही संपेना!
केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. परंतु, देशावरील एकूण कर्जाचा बोजा बघता भविष्यात सर्वकाही आर्थिक दृष्ट्या फारच कठीण आहे असंच म्हणण्याची वेळ आली आहे. त्यात, महसुली तोटा ही दुसरी मोठी आर्थिक अडचण सुद्धा डोकेदुखी ठरणार यात शंका नाही. एखाद्या घोषणेची अंमलबजावणी म्हटल्यास सरकारी तिजोरीत पैसा असणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु, सध्या अर्थमंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार ते सर्वच कठीण आहे असं म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिराचा जाहीरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देतो; विहिंप'ची काँग्रेसला ऑफर
सलग ५ वर्षे एकपक्षीय असे बहुमताचे केंद्र सरकार चालवून सुद्धा भाजप’ला अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नावर मार्गी लावता आलेला नाही. भारतीय जनता पक्षाने अयोध्येतील राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे देशभरातील हिंदुत्ववादी संघटनांमध्ये प्रचंड संताप आणि संशय निर्माण करणारं वातावरण निर्माण झाल्याने या संघटना आता मंदिराबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजपकडून शत्रुघ्न सिन्हांवर कारवाईचे संकेत, लवकरच ‘खामोश’ करणार
कोलकाता येथे विरोधकांच्या महारॅलीमध्ये शनिवारी अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी, खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असं म्हणत मोदींनाच आवाहन दिलं आणि स्वपक्षा विरोधात रणशिंग फुंकले होते. मागील अनेक वर्षांपासून सिन्हा स्वपक्षाच्या आणि विशेष करून मोदींच्या विरोधात रान पेटवत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदार केवळ चोरच नाही तर चंपक देखील आहे : कन्हैया कुमार
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि इतर अनेकांवर २०१६ मधील प्रकरणात देशद्रोहाचे आरोपपत्र तब्बल तीन वर्षांनंतर दाखल करताना याचिका कर्त्यांकडून दिल्ली राज्य सरकारची कोणतीही अधिकृत परवानगीच घेतली नसल्याचा मुद्दा पुढे करून, सुप्रीम कोर्टाने सर्वांवर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलली असून पोलिसांच्या कृत्यावर कोर्टाने कडक ताशेरे ओढत एकूण याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधक माझ्याविरोधात नव्हे, तर देशवासीयांच्या विरोधात आहे : नरेंद्र मोदी
देशभरातील विरोधकांची आघाडी माझ्याविरोधात नव्हे, तर देशवासीयांच्या विरोधात आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. आमचं केंद्रातील सरकार केवळ एका कुटुंबासाठी काम करत नाही. ते १३० कोटी देशवासीयांसाठी मेहनत करतं आहेत. खरंतर लोकशाहीचा गळा दाबणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करत आहेत, अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर भाषणादरम्यान जोरदार निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत अंधेरी पूर्व भाजपकडून मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
भारतीय जनता पक्षाचे अंधेरी पूर्व येथील कार्यसम्राट नगरसेवक मुरजी पटेल, नगरसेविका केसरबेन पटेल आणि त्याची समाजसेवी संस्था ‘जीवन ज्योत प्रतिष्ठान’ यांच्या सहकार्यातून भव्य मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून विशेष उपस्थिती होती.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेत माझ्यावर अन्याय, मनसेने आवाहन केलं होतं, पण निर्णय योग्य वेळी : केदार दिघे
सध्या रत्नागिरीचे माजी खासदार निलेश राणे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर केदार दिघेंकडे प्रसार माध्यमांचे कॅमेरे फिरले आहेत. केदार दिघे यांचं वय सध्या ३८ वर्ष असून आनंद दिघेंचे पुतणे या नात्याने त्यांनी वयाच्या १९व्या वर्षी आनंद दिघेंना अग्नी दिला होता. सध्या ते ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेमार्फत ठाणेकरांशी जोडले गेले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात संजय दीना पाटीलांचे किरीट सोमैयांना मोठे आवाहन?
आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे यंदा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दीना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे किरीट सोमैय्या खासदार असून त्यांच्यापुढे संजय दीना पाटील हे तगडं आवाहन उभं करतील अशी शक्यता आहे. किरीट सोमैयांची मुख्य मतपेटी ही मुलुंडमधील गुजराती वस्ती असलेला भाग आहे, तर संजय दीना पाटील यांची मुख्य मदार ही भांडुप आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं: उद्धव ठाकरे
बेस्ट कामगारांनी तब्बल ८ दिवसांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संप मागे घेतला. मात्र मुंबई बेस्ट कामगारांच्या संपात भारतीय जनता पक्षाने तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावाने शहरभर बोंबाबोंब करण्यास सांगितले, अशा रोखठोक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात वेटरची १३ पद आणि ७००० अर्ज, राज्यातील बेरोजगारीचं भीषण चित्र
भाजप सरकार कितीही रोजगार निर्मितीचे मोठं मोठे दावे करत असलं तरी मंत्रालयातील वेटर या पदासाठी सुरु झालेल्या भरती प्रक्रियेवरून बेरोजगारीचे भीषण वास्तव उघड होत आहे. अगदी चौथी पास पात्रता असलेल्या १३ जागांसाठी तब्बल ७००० अर्ज आले असून, त्यात धक्कादायक म्हणजे सुशिक्षित पदवीधर उमेदवारांची संख्या त्यात सर्वाधिक आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा: उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक संजय निरुपम यांना स्थानिक कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध?
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता उत्तर पश्चिम मुंबईतून संजय निरुपम सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे. संजय निरुपम यांच्या जुन्या लोकसभा मतदारसंघातून लढविण्यापेक्षा ते स्वतःसाठी नवख्या आणि काही प्रमाणात भरवशाच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून समजते.
6 वर्षांपूर्वी -
मंत्री गिरीश बापट यांच्याकडून कर्तव्यात कसूर आणि मंत्रीपदाचा गैरवापर: न्यायालय
राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचे ताशेरे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं ओढले आहेत. सेवाप्रदान करताना दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य पुरवठादाराला परवाना बहाल केल्याप्रकरणी कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २०१६च्या मधील एका प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी काही स्वस्त धान्यांच्या दुकानांची चौकशी करुन देखील मोठ्या प्रमाणावर सरकारी नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवला होता.
6 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्याने पैसे घेऊन सुद्धा नोकरी न दिल्याने तरुणाची अखेर आत्महत्या
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि लोकविकास सहकारी बॅंकेचे संस्थापक जे.के. उर्फ जगन्नाथ खंडेराव जाधव यांच्या विरोधात तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा ऊर्फ किशोर रतन चिलघर या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी सदर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत तरुण हा जाधव यांच्याकडे चालक म्हणून तात्पुरत्या कामाला होता.
6 वर्षांपूर्वी -
आता डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी मुंबई नाइट लाइफची मागणी देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार पुन्हा चालू झाले, अशी बोचरी टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका: उद्धव ठाकरे
इतरवेळी राज्य सरकार राजकीय निर्णय प्रचंड वेगाने घेतात, परंतु राज्यातील बहुचर्चित शिवस्मारकाबद्दल हलगर्जीपणाच आहे. भारतीय जनता पक्षाला आडवे येतील त्यांना ‘पटकून’ टाकू अशी भाषा वापरणाऱ्यांचे राज्य सध्या महाराष्ट्रात आहे. तसं असेल तर मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांना सुद्धा पटकून टाका, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोणतेही युद्ध सुरू नसताना सीमेवर जवान शहीद का होत आहेत? : मोहन भागवत
सध्या प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये आरएसएस’चे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी अयोध्येतील राम मंदिर मुद्द्यावरून मोदी सरकारवर बोचरी टीका केली. तर दुसरीकडे आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शहीद होण्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘कोणतेही युद्ध सुरू नसताना देखील सध्या भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत?’ असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ज्योतिष्याने सांगितले 'जानेवारीत मुख्यमंत्री पदाचा योग आहे', म्हणून येडियुरप्पा फोडाफोडीत उतरले?
कर्नाटकच्या विधानसभा निवडणूका पार पडून केवळ ७ महिनेच झाले आहेत. परंतु, भारतीय जनता पक्षाचे पायउतार झालेले माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अजून मुख्यमंत्री पदाचा मोह सोडवत नाही. केवळ ७ महिन्याच्या कालावधीत कर्नाटक भाजपानं २ वेळा काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मात्र दोन्ही वेळा ते प्रयत्न असफल ठरले.
6 वर्षांपूर्वी -
मोबाइल-सोनसाखळी चोर निघाला शिवसेना शाखाप्रमुखाचा मुलगा, स्थानिकांनी चांगलच झोडलं
अंधेरी पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा मुलगा विनायक याला तेथील स्थानिक लोकांनी तुफान तुडवून चांगलाच राग व्यक्त केला. त्याला भर रस्त्यात मार दिल्यानंतर स्थानिक पोलिसांच्याही स्वाधीन केलं. दरम्यान, विनायक विरोधात याआधी ५० पेक्षा अधिक मोबाइल चोरी तसेच सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला धक्का; डान्स बार'मधली छमछम सुरु होणार
राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने डान्स बारसाठी घालून दिलेली नियमावली सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालात रद्द केले आहे. त्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा डान्स बारमधील छमछम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमांविरोधात अनेक डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील घाटावर राहणाऱ्या घाटी लोकांना नोकऱ्यांमध्ये स्थान नको, केवळ भूमिपुत्रांना: गोवा पर्यटनमंत्री
गोव्यात लोकसभा निवडणुकीआधी परप्रांतीयांच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याला अनुसरून गोव्याचे विद्यमान पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी केलेल्या एका विधानानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. गोव्यातील नोकऱ्यांमध्ये परप्रांतीय, विशेषत: महाराष्ट्रातील लोकांना स्थान दिले जाणार नाही. केवळ गोव्यातील लोकांनाच इथे प्राधान्य दिले जाईल, असे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय मुद्दा तापण्याची चिन्ह आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार उसळी, मजबूत खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL