महत्वाच्या बातम्या
-
कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काँग्रेस आमदारांना खरेदी करण्याच्या हालचाली?
कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारवर पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु असून, वाट्टेल ती किंमत मोजून त्यांची खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आमदारानेच हा दावा केला असून पक्षाचे तीन आमदार सध्या भारतीय जनता पक्षाच्या थेट संपर्कात असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
#कुंभमेळा: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात आग, योगी सरकारचे ढसाळ नियोजन सिद्ध
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात आज आग लागली आहे. दम्यान, उद्यापासून येथे कुंभमेळ्यास सुरुवात होत असून, आज इथल्या ढसाळ नियोजनातून सरकारी अनास्था आणि सुरक्षेबाबत योजलेले उपाय समोर आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
BEST संप: लोकांना वेठीला का धरता? उच्च न्यायालयाने कामगारांना सुनावलं
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सलग ७व्या दिवशीसुद्धा सुरूच असल्याने सामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरुच आहेत. दरम्यान, या संपाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबद्दल कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप: मनसे रस्त्यावर उतरली, कोस्टल रोडचं काम बंद पाडलं, पहिला दणका सत्ताधाऱ्यांना
बेस्ट संपावर तोडगा न काढल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे आणि पहिला दणका कोस्टल रोडच्या बांधकामाला आणि काँट्रॅक्टरला दिला आहे. कालच मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे रस्त्यावर उतरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप: 'बाबा किती खायचे ओ?' नितेश राणेंची व्यंगचित्रातून शिवसेनेवर टीका
आमदार नितेश राणे यांनी चक्क व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंवर बेस्ट संपाच्या विषयाला अनुसरून जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सलग ७व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे. त्यावरुन, नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
BEST संपाबाबत तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थोड्याच वेळात बैठक
BEST कामगारांचा संप न मिटल्यानं मुंबईकरांच्या समस्या संपण्याचं नाव घेत नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सलग ७वा दिवस आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर चर्चा केल्यानंतर सुद्धा लेखी आश्वासन मिळेपर्यंत BEST कामगार संघटना अजून माघार घेण्यास तयार नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
राजकारण्यांनी कोणत्याही सांस्कृतिक संस्थामध्ये हस्तक्षेप करू नये : गडकरी
आधीच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नंतर रद्द केल्यामुळे वादात अडकलेल्या यवतमाळ येथील ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी सायंकाळी समारोप झाला. दरम्यान, उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समारोपाच्या भाषणात राज्य सरकारचे चांगलेच खडे बोल सुनावले आणि राजकारण्यांना दोन मोलाचे सल्ले दिले.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस उत्तर प्रदेशात सर्व जागा स्वबळावर लढवणार
महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी यूपीत सपा आणि बसपा आघाडी केल्यानंतर बाजूला सारल्या गेलेल्या काँग्रेसनं सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे. यूपीत लोकसभेच्या सर्वच्या सर्व ८० जागा मतदारसंघात काँग्रेस उमेद्वार उभे करणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संपामधील एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही : उद्धव ठाकरे
मुंबईमधील बेस्ट संप चर्चेच्या मार्गानं तडीस लावण्यात येईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे. तसेच या संपात सहभागी झालेल्या एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही, असं आश्वासन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांसमोर दिलं.
6 वर्षांपूर्वी -
‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सीबीआय संचालक आलोक वर्मा प्रकरणी मोदी सरकारवर व्यंगचित्रातून बोचरी टीका केली आहे. व्यंगचित्रामध्ये एका बाजूला पंतप्रधान मोदी खड्डा खोदताना रेखाटले आहेत. या भागाला त्यांनी ‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ असे नाव दिले आहे. तसेच यात वर्मा प्रकरण मृतदेहाप्रमाणे दाखवले आहे. त्यामुळे वर्मा प्रकरण खड्यात गाडून संपवून टाकण्याचे मोदींचे प्रयत्न व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
१० टक्के सवर्ण आरक्षण घटनात्मक पातळीवर टिकेल का? पवार साशंक
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना मोदी सरकारनं दिलेलं एकूण १० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल की नाही, याबद्दल एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला असता ही शंका त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारकडून सदर निर्णय नेमका कोणासाठी घेण्यात आला आहे?, असा प्रश्न विचारत हे आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याचं मत अनेक प्रसिद्ध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे असं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी मोदींवर सुद्धा जोरदार निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागात आले की 'युती गेली खड्ड्यात' अन मुंबईत गुपचूप युतीची बोलणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा राज्याच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर गेले की, ‘युती गेली खड्ड्यात’, अशा घोषणा देतात. त्यानंतर मुंबईत पोहोचले की पाठच्या दाराने गुपचूप मुख्यमंत्र्यांसोबत निवडणुकसंदर्भात युतीची चर्चा सुरु करतात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भर सभेत केली.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप: राऊतांना संगीत व संप यातला फरक कळतो का? 'बेस्ट'च्या संपावर संगीतमय 'चेष्टा'
मागील ५ दिवसांपासून बेस्टचा संप सुरु असून, त्यामुळे बेस्टचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य मुंबईकर असे सर्वच हैराण झाले असताना शिवसेनेचे आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून संताप जनक प्रतिक्रिया आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सकाळी घरचांशी झालेला फोनकॉल शेवटचा संवाद ठरला, संध्याकाळी देशासाठी वीर मरण
सकाळीच घरातील कुटुंबियांसोबत झालेला संपर्क हा नियतीने शेवटचा संवाद ठरवला असावा असं काहीस घडलं आहे. कारण पुण्यातील नायर कुटुंबाला सुद्धा १२ दिवसांपूर्वी कुटुंबासोबत नववर्षाचे आगमन साजरा करणारा आणि लष्कराच्या सेवेत असलेला आपला मुलगा, आज या जगात नसेल याची स्वप्नात सुद्धा कल्पना आली नसावी.
6 वर्षांपूर्वी -
Video बघा! म्हणजे आर्थिक आरक्षणामुळे इतर आरक्षणात बेईमानी होणार? की मोदींनी राज यांचा 'तो' मुद्दा ढापला?
नुकतंच मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत विधेयकाद्वारे सवर्णांसाठी १० टक्के आर्थिक आरक्षणाची तरतूद केली. परंतु, २०१५ साली नरेंद्र मोदी यांनी एका भर सभेत ५० टक्क्यांच्या वर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षण देता येत नाही. जर द्यायचेच असेल तर इतर उपलब्ध आरक्षणात काही ना काही बेईमानी करावीच लागते, असं जाहीर पणे सांगताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
तुम्हाला नेमका कसा प्रधानसेवक हवा?
तुम्हाला देशाचा प्रधानसेवक नेमका कसा हवा आहे? तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का? असे प्रश्न उपस्थितांसमोर उपस्थित करत मोदींनी विरोधकांना आज लक्ष केलं आहे. विरोधकांना केंद्रात एक कमकुवत आणि कमजोर सरकार हवं आहे. त्यांना केवळ स्वत:ची दुकानं थाटण्यात रस आहे. आणि त्यामुळेच त्यांना केंद्रात दुबळं सरकार सत्तेवर हवं आहे, अशा कठोर शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर आजच्या पक्ष मेळाव्यात हल्लाबोल केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
यूपीत ‘बुआ- भतीजा’ लोकसभेसाठी एकत्र; भाजपला किमान ५० जागांवर फटका बसण्याची शक्यता
आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीत मोठी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीत बसपा आणि सपामध्ये मोठी मत विभागणी झाल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाला होता. परंतु, यंदा वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. कारण आजच्या मायावती आणि अखिलेश यांच्यामधील संयुक्त पत्रकार परिषदेतून भाजपची डोकेदुखी वाढणार आहे हे निश्चित दिसते.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO पुरावे: भाजप समर्थकांचं चिमुकल्यांच्या आडून बालिश राजकारण, संरक्षणमंत्री सुद्धा करतात ट्विट
भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल देशभर का बदनाम झाला याचा अजून त्यांना साक्षात्कार झालेला दिसत नाही. कारण, मूळ व्हिडिओमध्ये मोडतोड करणे आणि मूळ फोटोमध्ये एडिटिंग करून त्यांना समाज माध्यमांना व्हायरल करणे हा त्यांचा पूर्णवेळ उद्योग असा इतिहास आहे. मग ते व्हिडिओ स्वतःच्या नेत्यांचे असो किंवा विरोधकांचे, ते वेगळ्यापद्धतीने तरुणाईपुढे आणून त्यांचा सऱ्हास राजकारणासाठी वापर केला. आता याच भाजप समर्थकांनी लहान ज्यांना मुख्यमंत्री, पंतप्रधान, राजकीय पक्ष, मोदी आणि राहुल गांधी म्हणजे कोण हे सुद्धा माहित नसताना, त्याच चिमुकल्या मुलांचे ठरवून आणि सूचना देण्यात आल्या प्रमाणे व्हिडिओ बनवून ते समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सालाबादाप्रमाणे आयोजित होणारा अंधेरी फेस्टिवल लवकरच रसिकांच्या भेटीला
अंधेरी पूर्व येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची पर्वणी असणारा भव्य अंधेरी फेस्टिवल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या फेस्टिवलचे दरवर्षी मुंबई अंधेरी पूर्व येथे भव्य आयोजन करण्यात येते. जीवन ज्योत प्रतिष्ठानचे संस्थापक आणि भाजपचे स्थानिक कार्यसम्राट नगरसेवक मुरजी पटेल त्यांच्या पत्नी व नगरसेविका केसरबेन पटेल यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी या फेस्टिवलचे भव्य आयोजन करण्यात येते.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप; शिवसेनेमुळेच हाेताेय BEST कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार : शशांक राव
आज सलग चौथ्या दिवशीसुद्धा बेस्ट कामगार संघटनेचा संप सुरूच आहे. त्यात महापालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये मागील ४ दिवस केवळ चर्चा सुरू असून सुद्धा काेणताही ताेडगा निघू शकलेला नाही.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC