महत्वाच्या बातम्या
-
बिहारमध्ये भाजप-जनता दल (युनाइटेड) १७-१७ तर पासवान यांना ६ जागा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राजकीय घटनांनी जोर धरला आहे. त्यानिमित्त बिहारमध्ये सुद्धा एनडीए’दरम्यानचे जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जागावाटपावर आज दिल्लीत या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि जागावाटप निश्चित करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकांच्या कॉम्पुटरवर वॉच? हॅकर्सकडून भाजप-IT सेलची वेबसाइटच हॅक आणि तंबी
भारतीय जनता पक्षाची आयटी सेलची वेबसाइट bjpitcell.org हॅकर्सने हॅक केली असून भाजपला डिजिटल दणका दिला आहे. तसेच त्यावर भाजपला तंबी देणारा संदेशसुद्धा देण्यात आला आहे. त्यावर एक संदेश सोडताना म्हटले आहे की, खासगी संगणकावर लक्ष ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे तो मागे घेण्यात यावा. तसेच भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या सरकारचा निर्णय मागे न घेतल्यास आम्ही भाजपच्या गुन्हेगारीचे पुरावे थेट जगासमोर ठेऊ, अशी धमकीच या हॅकर्सने मोदी सरकारला दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ऐन ख्रिसमसमध्ये अमेरिकेत 'शटडाऊन; सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
अमेरिका आणि मेक्सिको दरम्यानच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी ५ अब्ज अमेरिकी डॉलर मंजूर व्हावेत, ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी अमेरिकी काँग्रेसमध्ये नामंजूर करण्यात आल्याने अमेरिकेच्या कारभाराला सरकारी कामकाजाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंना खुलं पत्र; ३ दशकं सत्ता, तरी औरंगाबादचे नाव 'कचराबाद' असे झाले आहे?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेच्यावतीने अनेक विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये हजर झाले आहेत. त्यामुळे एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत एका खुल्या पत्राद्वारे सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
३ राज्यात पराभव; कर नाही तर २०१९ मधील 'डर कमी' करण्याचा प्रयत्न? सविस्तर
हिंदी पट्टय़ातील ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील मोठं अपयश पदरात पडल्यावर सामान्य माणसाचं दुःख सत्ताधाऱ्यांना थोडी समज देऊन गेल्याचा हा प्रत्यय म्हणावा लागेल. लवकरच सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा माहोल द्यानात घेता, नरेंद्र मोदी सरकार तिजोरीवर भार टाकणारे लोकप्रिय निर्णय घेत राहतील अशी अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्वच निर्दोष म्हणजे त्या सर्व हत्या नसून, ते स्वत:च मेले आहेत: राहुल गांधी
गुजरातच्या सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील २२ आरोपी निर्दोष असल्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. यावर राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमाने ट्विट केले आहे. हरेन पांड्या, जस्टिस लोया, तुलसीराम प्रजापती, प्रकाश ठोंबरे, श्रीकांत खंडाळकर, कौसर बी, सोहराबुद्दीन शेख या सर्वांची हत्या नसून ते स्वत:च मेले आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
हे काय सुरु आहे? मुंबई-ठाण्यात स्थानिक मराठी माणूस बेघर केला जातो आहे?
हे काय सुरु आहे? मुंबई-ठाण्यात स्थानिक मराठी माणूस बेघर केला जातो आहे. तर युपी-बिहारींना शिवसेनेकडून थेट बिल्डिंग’मध्ये फुकट घरांच्या चाव्या. उघड्या डोळ्याने मराठी माणूस हे केवळ पाहू शकतो, पण काही करू शकतो का?
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी लोकांच्या घरात डोकावल्यावर त्यांना कळेल की लोकं त्यांना शिव्या घालतात
मोदी सरकारची आता तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके हालचालींवर बारीक नजर असणार आहे. कारण, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील तब्बल १० मोठ्या एजन्सींना तुमच्या खासगी कम्प्युटरवर थेट नजर ठेवण्यासाठी परवानगी बहाल करण्यात आली आहे. या सर्व संबंधित १० एजन्सी एकप्रकारे तुमच्यासाठी गुप्तहेराचेच काम करणार असून त्या केव्हाही तुमच्या खासगी कम्प्युटरमधील माहिती तपासू शकतात.
6 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपच्या सभांची गर्दी आटनं हे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाल्याचं लक्षण
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह ५ राज्यांमध्ये झालेला भारतीय जनता पशाचा पराभव हा सामान्य जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील राग आहे असं मत महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. कारण लोकांचा तो रागच मतांमधून व्यक्त झाला आणि भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असं राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
माहुल प्रकल्पबाधित; फडणवीसांनी समिती स्थापल्याने माहुलकर नाराज
मागील जवळपास ५५ दिवस आंदोलन करणाऱ्या माहुलकरांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ या. परंतु, या भेटीत प्रकल्पबाधितांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे आदेश फडणवीसांनी प्रशासनाला दिले आहेत. परंतु, त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या मनात वेगळीच शंका निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक आंदोलकांना वाटतं आहे की, केवळ आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वेळ मारून नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच काही दिवसांनी हि समिती अहवाल तयार करेल तोपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागेल आणि अखेर हा विषय असाच रेंगाळत राहील असं त्यांचं मत आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजीव गांधींच्या ‘भारतरत्न’वरुन आपमध्ये फूट? आमदार अलका लांबा नाराज?
दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीचा ठपका ठेवत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत सरकारने परत घेण्याच्या ठरावावरुन आपमध्ये वादंग निर्माण झालं आहे. कारण दिल्ली विधानसभेत सदर विषयाला अनुसरून थेट ठराव मांडण्यात आल्यानंतर आपच्या विद्यमान आमदार अलका लांबा यांनी समाज माध्यमांवर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकरी कर्जमाफीसाठी भाजप-सेना सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही: SBI आर्थिक संशोधन विभाग
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सरकारला ग्रामीण भागातून मोठा फटका बसल्याचं समोर आलं. त्यामध्ये शेतकऱ्यांची नाराजी विशेष भोवळल्याचे सत्य समोर आल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर न झाल्यास महाराष्ट्रातील विद्यमान भाजप-शिवसेना सरकारला फटका बसेल अशी, शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकांआधी कर्जमाफीद्वारे शेतकऱ्यांची मते मिळविण्याचा विचार विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विचाराधीन असला तरी, त्यासाठी महाराष्ट्रातील भाजप – शिवसेना सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षमच नाही असं समोर येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
मातोश्री-२ हे शिवसेना पक्षप्रमुखांचं नवं ८ मजली निवासस्थान लवकरच पूर्ण होणार?
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लवकरच त्यांच्या ८ मजली नव्या मातोश्री २ या निवासस्थानी वास्तव्यास जाण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरेंना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे NOC हस्तांतरीत केलं आहे. तर १२ ऑक्टोबरला हे भोगवटा प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं आहे. तसेच अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा २८ सप्टेंबरलाच देण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
तरुणाईचं हे अज्ञान राजकारण्यांच्या पथ्यावर पडतं?
तरुणाईचं हे अज्ञान राजकारण्यांच्या पथ्यावर पडतं?
6 वर्षांपूर्वी -
सावधान! अघोषित आणीबाणी? सरकार तुमच्या कम्प्युटरवर वॉच ठेवणार : सविस्तर
मोदी सरकार आता तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके हालचालींवर बारीक नजर असणार आहे. कारण, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील तब्बल १० मोठ्या एजन्सींना तुमच्या खासगी कम्प्युटरवर थेट नजर ठेवण्यासाठी परवानगी बहाल करण्यात आली आहे. या सर्व संबंधित १० एजन्सी एकप्रकारे तुमच्यासाठी गुप्तहेराचेच काम करणार असून त्या केव्हाही तुमच्या खासगी कम्प्युटरमधील माहिती तपासू शकतात. त्यामुळे तो कम्प्युटर तुमच्या मालकीचा जरी असला तरी त्याचा वापर आणि साठवलेल्या माहितीची काळजी घ्या.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसोबत युती केली तरी लोकसभा निवडणुकीत अपयश: भाजपचा अंतर्गत सर्वे
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली तरी महाराष्ट्रात २०१४ प्रमाणे यश प्राप्त होणार नाही, असा अंदाज भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती झाली तरी युतीला ३० ते ३४ जागांवर समाधान मानावे लागेल, असे या सर्वेक्षणात पुढे आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांनी भगवान हनुमाना'चा वारंवार अपमान केला?
भाजप नेत्यांनी भगवान हनुमाना’चा वारंवार अपमान केला?
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांचा तडकाफडकी राजीनामा
अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅॅटिस यांनी त्याच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ त्यांच्या मातांशी सहमत असणारे लोकं महत्वाच्या पदावर हवे असल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय निरूपम हटाओ, मुंबई कॉंग्रेस नेत्यांची जोरदार मोहीम
आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य काँग्रेसमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आला आहे. मुंबई सर्व वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे यांची आज भेट घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेनचा वसई-विरार शहराला उपयोग नाही, बविआ'चा तीव्र विरोध
वसई-विरार शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला नव्याने निर्माण झालेल्या महापालिकेने तीव्र विरोध दर्शविला आहे. सदर विषयाला अनुसरून बुलेट ट्रेनसाठी महापालिकेकडे संरेखन करण्याचा प्रस्ताव आणि विकास हस्तांतर देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असता पालिकेने तो फेटाळून लावला आहे. त्यांच्यानुसार बुलेट ट्रेनचा वसई-विरार शहराला काहीसुद्धा उपयोग नाही, त्यामुळे केवळ स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होणार आहे अशी भूमिका सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB