महत्वाच्या बातम्या
-
यांच्या फेकलेल्या हजारो-लाखो कोटींच्या आकड्यांनी लक्ष्मी सुद्धा थक्क: व्यंगचित्र प्रसिद्ध
भारतीय जनता पक्षाला मनसे अध्यक्षांनी व्यंगचित्रांची मालिका प्रसिद्ध करून हैराण करून सोडले आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा चार साडेचार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘फेकलेले’ हजारो, लाखो कोटींचे आकडे आकडे पाहून लक्ष्मी सुद्धा थक्क झाल्याचे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; डेमॉक्रेटीक पक्षाची बहुमताकडे घोडदौड
सध्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकी सिनेटमध्ये वर्चस्व राखण्यात यश प्राप्त केले आहे. परंतु, अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने पुन्हा जोरदार मुसंडी मारल्याने तो डोनाल्ड ट्रम्प यांना राजकीय धक्का असल्याचे राजकीय जाणकारांना वाटतं आहे.
6 वर्षांपूर्वी -
भर दिवाळीत भाजपवर 'राज'कीय फटाके, भाजप IT सेल चवताळण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष केलं असून त्यांना नरकासुर असं म्हटलं आहे. व्यंगचित्रात अमित शहा हे भाजपाला पडलेलं दिवाळी स्वप्न असून, अमित शहा हे नरकासूर असल्याचा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अभ्यंगस्नान, साहेब! अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आला आहे पाठवू का?
आज नरकचतुर्दशी म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ. आज प्रथेनुसार या दिवशी केलं घरोघरी अभ्यंगस्नान केलं जातं. नेमका याच अभ्यंगस्नानाचा संदर्भ घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. सध्या राज्यात महागाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या अशा एक ना अनेक विषयांवरून राज्य सरकारवर सामान्य जनता प्रचंड नाराज आहे आणि त्याचा सुद्धा अप्रत्यक्ष संदर्भ यात आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘राफेल डील’ प्रकरणी CBI ठाम राहिल्यास चित्र बदलेल
फ्रेंच बनावटीची राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी संदर्भात CBI यंत्रणा ठाम राहिल्यास देशातील चित्र नक्कीच बदलेल, असं दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री अमी कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सध्या एकूणच हालचालीवरून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे, आगामी लोकसभा निवडणुकात बदल न झाल्यास भारतात हुकूमशाही अंमलात आली तर त्यात नवल वाटणार नसल्याची टीका चव्हाण यांनी भाषणादरम्यान केली.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा कार्यकर्त्यांकडून मला गँगरेपची धमकी: दिया शेटक
गोवा प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव दिया शेटकर यांनी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते सुभाष शिरोडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुभाष शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांनी मला थेट गँगरेपची धमकी दिल्याचा खळबळ जनक आरोप दिव्या शेटकर यांनी केल्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
....मग या सरकारवर पण गोळ्या झाडा: संजय राऊत
शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याने टीकेची झोड उठवली आहे. तसेच मागील ४ वर्षांत कित्येक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या, तर राज्यातील सरकारवर (राज्यात भाजप-सेनेचं युती सरकार आहे) सुद्धा गोळ्या झाडायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशाला राष्ट्रवाद शिकवणाऱ्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना 'राष्ट्रगीत' माहित नाही.
व्हिडिओ पहा: देशाला राष्ट्रवाद शिकवणाऱ्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रगीत’ सुद्धा माहित नाही. सध्या राज्यातील विविध शहरांमध्ये भाजपच्या युवामोर्चातर्फे ‘सीएम चषक’ भरविण्यात आला आहे. त्यादरम्यान घडलेला हा प्रकार आहे.
6 वर्षांपूर्वी -
वनविभाग अव्नीचे शत्रू नाही: सुधीर मुनगंटीवार
रविवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अव्नी वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिल्याबद्दल एकावर एक ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर, आम्ही अव्नी वाघिणीला नाईलाजाने मारल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीयमंत्री मेनका गांधी यांना प्रतिउत्तर देताना म्हटले आहे. त्यामुळे मनेका गांधी यांना अजून सविस्तर माहिती माहित नाही असं वनमंत्री म्हणाले. दरम्यान, वाघिणीला मारण्याचा निर्णय हा राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने घेतला आहे. तसेच वाघिण काय वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची शत्रू नव्हती, असं सुद्धा म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
अवनीला भेकडासारखे मारले, शिवसेनेचं टीकास्त्र
दोन दिवसांपूर्वी अवनी या टी-१ वाघिणीला महाराष्ट्र वन खात्याने विशेष मोहीम राबवून ठार केल्यानंतर संपूर्ण देशात टीकेचा सूर उमटला आहे. अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्याने संपूर्ण देशभर पडसाद उमटत आहेत. आता शिवसेनेने सुद्धा अवनीवरून भाजप आणि वनखात्याविरोधात विरोधात आवाज उठवला आहे. ‘ज्या महाराष्ट्रात माणसं सुद्धा नीट जगू शकत नाहीत, त्याच राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? पण अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारण्यात आले आहे. रात्रीच्या अंधारात उंदरांना सुद्धा वाघाचे बळ येते’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजपवर आणि वन खात्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
देश ‘आयसीयू’त, पण निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा मोदी सरकारच्या मागील चार साडेचार वर्षाच्या कार्यकालावर व्यंगचित्रातून टीका केली आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनच्या त्यांनी भारतात काय परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्यामुळे भारत देशच सध्या आयसीयूमध्ये गेला आहे असं म्हटलं आहे. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच आता तो शुद्धीवर येईल’, अशी टीका व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करण्यात केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जितेंद्र आव्हाड पुन्हा उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तासभर चर्चा झाली
एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा ‘मातोश्री’वारी केली असून त्यांनी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचे म्हटले जात असले तरी तासभर चर्चा झाल्याने इतर राजकीय अंदाज सुद्धा बांधले जात आहेत.
6 वर्षांपूर्वी -
दिवाळीचं औचित्य साधून मी व्यंगचित्रांची एक मालिका घेऊन येत आहे: राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे या दिवाळीत व्यंगचित्रांची एक मालिकाच घेऊन येत आहेत. राज ठाकरे यांनीच स्वतः त्याबाबतची अधिकृत माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ साजरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज सायंकाळी दादरमधील शिवाजी पार्क येथे ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर तसेच अंजली तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुका आल्यावर भाजप - शिवसेनेला राम आठवतो
निवडणुका जवळ आल्या की भाजप आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींना लगेच राम आठवतो, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा युतीबाबत कोणताही निर्णय झाला तरी काँग्रेस आणि एनसीपी’ची आघाडी होणारच आहे, असे सुद्धा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बाबूभय्या ये क्या बोला रे बाबा तुने? मोदींचा 'तो' दावा अप्रत्यक्ष फोल ठरवला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये काँग्रेसने ६०-७० वर्षात देशात काहीच केलं नाही असा दावा करत असतात. त्यात दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये तब्बल ३,००० कोटीच्या आसपास पैसा खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभ्या केल्याने अनेकांनी टीका सुद्धा केली. परंतु भाजपचे खासदार परेश रावल याच पुतळ्याच्या राजकारणावरून टीकाकारांना ट्विट करून उत्तर द्यायला गेले आणि अप्रत्यक्ष रित्या मोदींनाच तोंडघशी पाडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ व्हायरल - भाजपने १.५ करोडला दिलीप मकवानांना निवडणुकीचं तिकीट विकलं?
व्हिडिओ व्हायरल – भाजपने १.५ करोडला दिलीप मकवानांना निवडणुकीचं तिकीट विकलं?
6 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश निवडणूक; मुख्यमंत्र्यांचे मेहुणे काँग्रेसमध्ये दाखल
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे निकटवर्तीय आणि मेहुणे संजय सिंह यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के कमलनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय सिंह यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, के कमलनाथ मध्य प्रदेशात जोमाने पक्ष कामाला लागले असून काँग्रेससाठी सध्या मध्य प्रदेशात पोषक वातावरण आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज-पवारांच्या विमान प्रवासावर टीका, आज उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील एकाच गाडीने प्रवास
शिवसेना दिल्ली ते गल्ली भाजपसोबत सत्तेत बसून राज्यात तब्बल १२ मंत्रिपद उपभोगत आहे आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद आहे. परंतु, स्वबळाचा नारा देताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांवर टीका आणि आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु आज नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी चक्क महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर सुद्धा गाडीत होते.
6 वर्षांपूर्वी -
पैशाच्या जोरावर मोदी सरकार फेक सर्व्हे करत आहे: रणदीप सुरजेवाला
सध्या देशात मोठ्याप्रमाणावर महागाई वाढली आहे, त्यात पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, बेरोजगारी आणि रुपयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर घटलेली किंमत यामुळे मोदी सरकार अडचणीत आले असताना देशात वेगवेगळ्या संस्थांकडून निवडणूक पूर्व सर्व्हे येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सर्वच थरातून सामान्य मतदार नाराज असताना देशात सर्वांना मोदीच हवे आहेत असे एकावर एक सर्वे प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा