महत्वाच्या बातम्या
-
राफेल लढाऊ विमानाची किंमत सांगा आणि ५ कोटी जिंका; बिहारमध्ये सर्वत्र पोस्टर्स
काँग्रेस राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून भाजपला आणि मोदींना लक्ष करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. फ्रान्स मधील प्रसार माध्यमांनी या करारावर आणि विशेष करून अनिल अंबानींच्या कंपनीवर संशय व्यक्त केल्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात आता इतर राज्यातील स्थानिक नेत्यांनी सुद्धा राफेल लढाऊ विमानांच्या किमतींवरून मोदींच्या अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आता का लाज वाटते? कामगारांचे पैसे खातांना लाज नाही वाटली? अंजली दमाणियांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सहार रोड येथे खंबाटा एव्हिएशनच्या कामगारांनी तीव्र आंदोलन पुकारलं होत. परंतु आज त्याला वेगळे वळण मिळालं आहे असच म्हणावं लागेल. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच इतर नेत्यांचा फोटो असलेले रावणाच्या अवतारातील प्रतिकृती लावली होती. त्यावर आज अंजली दमानिया यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोचरी टीका केली आहे. जर उद्धव ठाकरेंना या बॅनरची लाज वाटत असेल तर त्यांनी स्वत: हा बॅनर हटवायला हावे असे थेट आव्हानच ट्विट करत दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यासाठी रवाना होणार आहेत. आज सायंकाळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अमरावती एक्सप्रेसने रवाना होणार आहते. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
राज्यावर दुष्काळाचं सावट तर मोदींच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी २ कोटी खर्च
सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे आणि राज्याच्या तिजोरीत सुद्धा खडखडाट असताना केवळ गर्दी जमविण्यासाठी आणि प्रोमोशनसाठी राज्य सरकारकडून मोदींच्या शिर्डीमधील कार्यक्रमावर तब्बल २ कोटीची उधळपट्टी करण्यात आल्याचे समजते. नियोजित ठिकाणी २० हजार घरकुल लाभार्थी कुटुंबीयांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून, जवळपास ४० हजार लोक उपस्थित राहण्याचे आयोजन सरकारकडून करण्यात आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या काळात महागाई व रुपयाच्या घटणाऱ्या किंमतीवर पत्रकार परिषद....पण आज?
काँग्रेसच्या काळात महागाई व रुपयाच्या घटणाऱ्या किंमतीवर पत्रकार परिषद….पण आज?
7 वर्षांपूर्वी -
'५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’, मोदींना राष्ट्रवादीचे खोचक प्रश्न
एनसीपीने आपल्या ‘जवाब दो’ मोहिमेअंतर्गत आता थेट पंतप्रधानांना लक्ष्य करत त्यांच्या परदेश वारी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. लवकरच पंतप्रधानांच्या परदेश वारीचे शतक पूर्ण होत असले तरी देशाने त्यातून काय साधले असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना विचारला आहे. युपीएच्या काळात ९ वर्षात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्यांवर ६४२ कोटी रुपये खर्च झाले होते. तर दुसरीकडे मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आज पर्यंत तब्बल १४७४ कोटी रुपये खर्च झाले तरी त्यातून देशाला काय सध्या झालं असा सवाल केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
गोव्यात भाजप काँग्रेसचे आमदार फोडून 'काँग्रेस मुक्त गोवा' नारा देणार?
गोव्यात सध्या राजकीय घडामोडींना जोर आला आहे. विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे; पण त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजप तसेच सत्ताधारी मित्र पक्षांकडून मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली वेगाने वाढल्या आहेत. लवकरात लवकर पर्यायी नेतृत्वाचा शोध पूर्ण करून नव्या मुख्यमंत्र्यांकडे सूत्र सोपविण्याची जय्यत तयारी सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; खोट्या विहिरींची राज ठाकरेंकडून पोलखोल
सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे आणि ग्रामीण भागावर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने जलयुक्त शिवार आणि १ लाख २५ हजार विहिरी बांधल्याचा दावा सुद्धा त्यामुळे फसवा ठरल्याने राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीसांना लक्ष केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
#MeToo : उद्या तसे आरोप मोदींवर सुद्धा होतील : शक्ती कपूर
#MeToo मोहिमेवर सध्या देशभर वादंग निर्माण झालं असताना अभिनेते शक्ती कपूर यांनी वेगळीच शंका या मोहिमेवर उपस्थित केली आहे. त्यांच्या नुसार या प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली या केवळ ब्लॅकमेल करत असल्याची टीका तसेच शंका शक्ती कपूर यांनी व्यक्त केली आहे. उद्या असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा होतील अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
कायदा सुव्यवस्थेवरून शिवसेनेची सामना'तून फडणवीसांवर बोचरी टीका
शिवसेना आमदारावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री फडणवीसांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सध्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचे सुद्धा अधोरेखित केले आहे. राज्यातील पोलिसांना पक्ष कार्यकर्त्याचा दर्जा तर पक्षातील वाल्यांना कायदा-सुव्यवस्थेचे रखवालदार बनवले गेले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रोच्या कामाला विरोध करणाऱ्या शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर २ दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्याची गंभीर दखल शिवसेना पक्ष प्रमुखांनी घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस जाहीर
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले करून त्यांना गुजरातबाहेर पळवून लावणाऱ्या आमदार अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये एका १४ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपी बिहारचा असल्याचे समोर येताच उत्तर भारतीयांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आले तसेच त्यांना गुजरात सोडण्याचे आदेश हिंसक जमावाकडून देण्यात आले होते.
7 वर्षांपूर्वी -
खंबाटा एअरलाईन्स; देशोधडीला लागलेल्या कर्मचाऱ्यांचा उद्धव ठाकरे व विनायक राऊतांच्या नावाने शिमगा
खंबाटा एअर लाईन्स कंपनी कायमची बंद होऊन तब्बल २ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र त्यामुळे देशोधडीला लागलेले कामगार आज सुद्धा त्यांच्या हक्काच्या देयकांच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी कंपनीच्या ५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी मुंबईतील सहार रोड परिसरात आंदोलन सुरु केले होते. तब्बल ५ दिवस चाललेल्या आंदोलनादरम्यान अन्यायग्रस्त कामगारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार विनायक राऊत यांच्या नावाने अक्षरशः सार्वजनिक शिमगा केला.
7 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार 'पी-तू' मोहीम राबविणार...आता दारु सुद्धा घरपोच मिळणार?
दारूच्या शौकिनांसाठी राज्य सरकार आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र सरकार आता एक नवीन धोरण अंमलात आणण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारुची डिलिव्हरी सुद्धा थेट तुमच्या घरपोच दिली जाईल. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ केसचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे असं समजत. त्यामुळे दारू घरपोच देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरू शकत.
7 वर्षांपूर्वी -
बिहारी खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांचे पृथ्वी शॉ आणि मनसेच्या नावाने स्टंट?
पृथ्वी शॉ’च्या क्रिकेटमधील जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या मदतीचा मोलाचा वाटा आहे. अगदी प्रथम श्रेणी क्रिकेट पासून ते अंडर- १५ आणि अंडर-१९ क्रिकेट पर्यंत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा पृथ्वी शॉ नेहमीच एका मुंबईकरांसारखा महाराष्ट्रात एकजीव झाला होता तसेच तो आणि त्याच संपूर्ण कुटुंब उत्तम मराठी सुद्धा बोलतात हे सर्वश्रुत आहे. असं सर्व असलं तरी महाराष्ट्राने खेळाकडे आणि खेळाडूंकडे कधीच संकुचित दृष्टिकोनातून पाहिले नाही. अगदी आज त्याची ख्याती जगभरात पोहोचली तरी सर्वांनी पृथी शॉ या नम्र आणि गुणी खेळाडूंकडे केवळ भारतीय क्रिकेटचा उगवता तारा असच पाहिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मतदाराला आमिष? मतदार यादीत नाव नोंदवून आम्हाला कळवा आणि मिळवा.....
मतदाराला आमिष? मतदार यादीत नाव नोंदवून आम्हाला कळवा आणि मिळवा…..
7 वर्षांपूर्वी -
वीज कर्मचा-यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्य शासनात ३ वर्षे कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचार्यांची ३ वर्षांची कंत्राटी सेवा, सेवानिवृत्ती वेतनासाठी, सेवानिवृती इतर लाभांसाठी तसेच पदोन्नतीसाठी ग्राह्य धरली जाते. पण महावितरण कंपनीने नियुक्त केलेल्या कंत्राटी कामरचार्यांना हा लाभ मिळत नाही. कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा, असे साकडे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांना घातले.
7 वर्षांपूर्वी -
सबरीमाला मंदिरात जाणाऱ्या महिलांचे तुकडे करा, अभिनेता व भाजप समर्थक तुलसीधरन नायरच वक्तव्य
सबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या आदेशावर नाराजी व्यक्त करत मल्याळम अभिनेत्याने वादग्रस्त विधान केल्याने खळबळ माजली आहे. अभिनेता, तसेच भाजप समर्थक तुलसीधरन नायर यांनी सबरीमाला मंदिरात येणाऱ्या महिलांचे तुकडे केले पाहिजे असे धक्कादायक विधान केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे आमदार तुकाराम कातेंवर जीवघेणा हल्ला, थोडक्यात बचावले
शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून आमदार काते थोडक्यात बचावले आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षारक्षका सहित अन्य २ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुंबई मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील मेट्रो-३च्या कारशेड परिसरात ही घटना घडल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्हाला मोदी भक्त म्हटलं जातं अंध भक्त नाही: भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ
भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नवा जावई शोध लावला आहे. त्यांच्या महान अध्यात्म ज्ञानानुसार नरेंद्र मोदी म्हणजे भगवान विष्णूचा ११ वा अवतार असल्याचं वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं आहे. भारताच्या हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुतं आहेत, तसेच भारतमातेला आपण देव मानतो. पंतप्रधान हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्याप्रमाणे करत आहेत त्याचा विचार करता आमच्यासाठी ते देवासमानच आहेत, असे वाघ यांनी म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंकडे आयआरबीच्या उपकंपनीची कार - टोल माफी हा जुमला?
एकनाथ शिंदेंकडे आयआरबीच्या उपकंपनीची कार – टोल माफी हा जुमला?
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL