महत्वाच्या बातम्या
-
ठाण्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मनसेने भर पत्रकार परिषदेत तुडवलं
ठाण्यात एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर पत्रकार परिषदेत तुडवून पोलिसांच्या हवाली केले आहे. गुजरातमध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. पण किती दिवस या असल्या लोकांना सहन करायचे ?. जर हे असले विकृत प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू, असा थेट इशाराच मनसेने दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधूनच मुंबईत रोज घाण येते आहे, अशा शब्दात मनसेने उत्तर भारतीयांवर टीका केली.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा व शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित
शिवसेनेच्या स्वबळाचा नारा आणि त्यामुळे भाजपची झालेली राजकीय गोची आता स्पष्ट दिसू लागली आहे. भाजपा शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही पक्षांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा आघाडीला होईल. त्यामुळे भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांचा आगामी निवडणुकीत पराभव होऊ शकतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातींना धमकी? गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे, मोदींनाही वाराणसीला जायचे आहे
चिमुकलीवर गुजरातमध्ये झालेल्या बलात्कारानंतर सध्या उत्तर भारतीयांना गुजरातमधून मारहाण करून हुसकावून लावण्यात येत आहे. अगदी गुजरात मध्ये पोलिसांना फ्लॅगमार्च करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या संजय निरुपम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसेच गुजराती समाजाला अप्रत्यक्ष धमकावत आहेत अशी चर्चा राजकीय निरुपम यांच्या नागपूरमधील वक्तव्यावरून रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमधून यूपी-बिहारींचे मिळेल त्या गाडीने पलायन, पोलिसांचा फ्लॅग मार्च
बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमधील वातावरण यूपी-बिहारींच्या विरोधात प्रचंड तापले असून उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांनी मिळेल त्या गाडीने पळ काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून सुद्धा सध्या अनेक ठिकाणी फ्लॅगमार्च करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे हल्ला झाल्याने आतापर्यंत एकूण ४२ गुन्हे दाखल झाले असून ३४२ जणांना अटक करण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हिंसेच्या भीतीने परराज्यांतून विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांनी गुजरातच्या अनेक भागातून पलायन करण्यास सुरुवात केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
महागाई नियंत्रणात असून मध्यमवर्गाची स्थिती सुधारत आहे: नरेंद्र मोदी
भारताची अर्थव्यवस्था मागील काही वर्षांपासून अत्यंत स्थिर असून आर्थिक तूट सुद्धा कमी झाली आहे. दरम्यान, महागाई नियंत्रणात असून देशातील मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारत असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थितांसमोर बोलताना म्हणाले. भारत सध्या महत्वाच्या सामाजिक तसेच आर्थिक बदलातून जात आहे. परंतु, त्या बदलातून निर्माण झालेला नवा भारत हा जागतिक विकासासाठी उत्प्रेरक ठरेल, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान केले. उत्तराखंड इव्हेस्टर्स समिटमध्ये रविवारी मोदी उपस्थितांना संबोधित करत होते.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांवरील लाठीहल्ला; यूपीच्या त्या गावात भाजपला बंदी, थेट फलक लावून इशारा
भाजपच्या नेत्यांना आणि पक्षाला उत्तर प्रदेशातील धनौरा तालुक्यातील रसूलपूरच्या गावकऱ्यांनी गावाच्या सीमेवर थेट फलक लावून भाजपच्या नेत्यांना इशारा दिला आहे. शिवाय गावात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते फिरकू नये म्हणून पहारा सुद्धा देण्यात येत आहे. “जर आमच्या गावात भाजप नेते मतं मागण्यासाठी आले, तर ज्याप्रकारे दिल्लीच्या सीमेवर आम्हा शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला, त्याचप्रकारे भाजप नेत्यांचं आमच्या गावात स्वागत केले जाईल” अशा कडक शब्दात हा इशारा देण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या आढाव्याबाबत खासदारांनी मौन बाळगलं?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोतोश्रीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीला अनेक खासदारांनी हजेरी लावली खरी, परंतु त्याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे पक्ष प्रत्येक खासदाराच्या मतदार संघाचा आढावा घेतल्या शिवाय स्वबळ की एकत्रित निवडणुका याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आढावा बैठकीला येणारे खासदार कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीआधी ३ राज्यांमध्ये राहुल गांधी मोदींना जोरदार धक्का देणार, सर्वे रिपोर्ट
कालच मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगण या ५ राज्यांमध्ये १२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत मतदान तर, ११ डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याधर्तीवर प्रसारित करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या ३ तीन राज्यांमध्ये मोदींनी सभा घेताल्यातरी सत्तापरिवर्तन अटळ आहे असं म्हटलं आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल आणि त्यात राजस्थानमध्ये भाजपचा धुव्वा उडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
५ राज्यांच्या निवडणूका जाहीर; ११ डिसेंबर रोजी मतमोजणी
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम या चार राज्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम तसेच तेलंगाणा या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत आयोजित करून प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या सभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली: काँग्रेसचा थेट आरोप
लवकरच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा पूर्ण कार्यक्रम अधिकृत पणे जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने या नियोजित पत्रकार परिषदेच्या वेळात ऐनवेळी बदल करून ही पत्रकार परिषद दुपारी ३.३० वाजता होणार असल्याचे जाहीर केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीडिते महिलेच्या संदर्भात आणि शिवसेना आ. उदय सामंतविरोधात पत्रकार परिषद घेणार: निलेश राणे
सध्या कोकणातील वातावरण महिलांसंबंधित गुन्ह्यांवरून तापताना दिसत आहे. काही दिवसांपूवी सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये मुलीवर बलात्काराची घटना समोर आली होती आणि त्यात शिवसेनेच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची नाव त्या हॉटेलच्या मालकीवरून समोर आली होती. त्यात आता कोकणातील अजून प्रकरण आमदार नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असल्याचे सूतोवाच देण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जो संसार करत नाही त्याला घरी गेल्यावर काय काम नसते, मग महागाई काय समजणार?
जो स्वतः संसार करत नाही, मग अशा माणसाला महागाई काय समजणार अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. देशात प्रचंड महागाई वाढली आहे आणि जो स्वतः संसार करत नाही त्याला घरी गेल्यावर काही काम नसते असं अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांना हसू आवारता आलं नाही.
6 वर्षांपूर्वी -
ब्राह्मणांनी राजकारणात यावं आणि आरक्षण मागावं: महादेव जाणकार
पुण्यात आज ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असता दुग्धविकास मंत्री महादेव जाणकार यांनी अनेक वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस चांगलं काम करत असून ते भविष्यात पंतप्रधान होतील असं वक्तव्य केलं आहे. ब्राह्मणांमुळे चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी राजकारणात यावं आणि आरक्षण मागावं असं आवाहन जानकरांनी ब्राह्मण समाजाला केलं.
6 वर्षांपूर्वी -
रशियाकडून एस-४०० खरेदी केल्यास अमेरिका भारतीय उत्पादनांवर कर लादणार?
भारताने रशियासोबत महत्वाकांक्षी असा एस-४०० वायु संरक्षण प्रणाली खरेदी करार केल्यास अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन भारतातील उत्पादनांवर मोठे कर लादण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजून आर्थिक संकटात जाईल अशी शक्यता आहे. भारतीय लष्कराला हवाई सुरक्षेसाठी रशियाकडून मिळणारी एस-४०० वायु संरक्षण प्रणाली सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. त्यात आधीच अमेरिका आणि रशिया यांच्यात पूर्वीपासून तणावाचे संबंध राहिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ मध्ये सत्तेत येण्याची खात्री नव्हती, म्हणून आश्वासनं देत सुटलो: नितीन गडकरी
आम्हाला २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्याची खात्री नसल्याने काही जणांनी मतदाराला आश्वासने द्यायला सांगितली. त्यानंतर आम्ही इतकी आश्वासने दिली लोकांना की ती आता आठवत सुद्धा नाहीत अशी कबुली खुद्द केंद्रीय दळणवळन मंत्री नितीन गडकरी यांनी मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमा दरम्यान दिली. परंतु, त्यांच्या या विधानाने भाजपच्या अडचणी वाढणार असून गडकरींच्या या कबुलीने भाजपची एक प्रकारे पोलखोल झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी २०१२ - मोदी सरकार तर भ्रष्ट नाही, मग भारतीय रुपया पूर्ण आशियात तळाला का गेला?
मोदी २०१२ – मोदी सरकार तर भ्रष्ट नाही, मग भारतीय रुपया पूर्ण आशियात तळाला का गेला?
6 वर्षांपूर्वी -
भारत मोठ्या आर्थिक संकटात: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
जागतिक बाजारपेठेत तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक संकटात असल्याचं वक्तव्यं खुद्द केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरत असून देशात महागाई प्रचंड वाढत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी या मुलाखतीदरम्यान दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'शिवसेनाच राम मंदिर उभारू शकते'; पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार
लोकसभा निवडणूक जवळ आल्याने पुन्हा राम मंदिराचा भावनिक मुद्दा उचल खाण्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेने या मुद्याचा निवडणुकीत आधार घेऊन फायदा करून घेतला, तरी राम मंदिर अजून जैसे थे स्थितीत आहे. शिवसेना सुद्धा आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराच्या मुद्याला पुन्हा हात घालून भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे असं वाटत.
6 वर्षांपूर्वी -
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन २ दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम खरेदी कराराच्या दृष्टीने पुतिन यांचा हा भारत दौरा महत्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारत रशियाकडून ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणार असून या खरेदी कराराला गुरुवारी भारतीय अधिकारी आणि रशियन अधिकारी स्वाक्षऱ्या करून अंतिम स्वरूप देतील असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ खुलासा! तो राजकीय पक्षाचा जमाव होता हे रेणुका शहाणेंना कोणी सांगितलं? सविस्तर वृत्त
समाज माध्यमांवरील अति उतावळेपणाचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. कोणाला समर्थन द्यावं आणि कोणाला देऊ नये हा ज्याचा त्याचा लोकशाहीतील अधिकार. परंतु लोकशाहीत स्वतःचे अधिकार समाज माध्यमांवर इतक्या अंध पणे सुशिक्षित लोकं गाजवतात की आपल्या हातून एखाद्याची पाठराखण करताना दुसऱ्या बाजूला आपण काय अफवा पसरवत आहोत याचं भान त्यांना होताना दिसत नाही अशी परिस्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC