महत्वाच्या बातम्या
-
ते 'गुंड' की? कायदा पायदळी तुडविणाऱ्यांच्या मनमान्या सहन करणारे आपण षंड?
कालची पुण्यातील पीव्हीआर सिनेमात घडलेली घटना ही जर कायद्याच्याच नजरेतून बघायची तर तो ‘MRP’ कायदा पायदळी तुडवला गेला नसता तर अशी घटना आणि किव्हा आंदोलनं का होतील? अगदी दगदगलेल्या रोजच्या दैनंदिन आयष्यातून वेळ काढून अनेक कुटुंब किव्हा जोडपी या मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमे बघण्यासाठी जात असतात. अगदी दोघे जण गेले असं जरी गृहीत धरलं तरी तिकीट असतं १००-२०० रुपये आणि पोपकोर्न २५० आणि समोसे – वडापाव १०० रुपये. बाहेरून खिशाला परवडतील असे खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याला बंदी असते.
7 वर्षांपूर्वी -
रामदास कदमांकडून शिवसैनिकांना प्रभावी भाषण करण्याचे प्रशिक्षण: जालना
जालन्यातील बीज शीतल सीडस्च्या सभागृहात मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यांमधील शिवसैनिकांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या मेळाव्यात शिवसैनिकांना प्रभावी भाषण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने कोकणात शिवसेनेला धूळ चारली, तर सेनेने मुंबईची जागा पुन्हा राखली
मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा राखण्यात शिवसेनेला यश आलं आहे. पण दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आले, त्यात भाजपने शिवसेनेवर मात केली आहे. त्यामुळे भाजपने कोकणात आयत्यावेळी आखलेले ‘डाव’ खरे ठरले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने नाणार'ला जाऊन अध्यादेश रद्द केल्याचे सांगितले, मग करार कसा झाला? राष्ट्रवादी
आधीच नाणार प्रश्नी अडचणीत असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीने काही प्रश्न उपस्थित करून कोंडीत पकडले आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या स्थळी जाऊन नाणार’संबंधित अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केली होती. मग नाणार प्रकल्पाचा करार कसा झाला असा थेट सवाल करत पत्रकार परिषदेत केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचं मुंबईत नक्की काय चाललंय? मराठी शाळा घटत आहेत, तर हिंदी शाळांसाठी भव्य इमारती
मुंबई महानगर पालिकेवर १९९७ पासून शिवसेना सतत २१ वर्ष सत्तेत आहे. परंतु मुंबईमधला केवळ मराठी माणसाचा टक्काच नाही तर शहरातील शिक्षण व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा घटक असलेल्या मराठी शाळांचा टक्का सुद्धा झपाट्याने घटत चालला आहे. परंतु याच मुंबईमध्ये हिंदी भाषिकांसाठी हिंदी भाषेच्या शाळांचे अनेक माजली इमारती महापालिका उभ्या करत आहेत आणि थाट त्याची उदघाटन सुद्धा केली जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे व माझ्या कामाची 'स्टाइल' एकच, त्यामुळे आमची गट्टी होऊ शकते: बच्चू कडू
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचंड अभ्यासू आहेत आणि मी “फिल्ड वर्क’शी जोडलेला असल्याने भविष्यात त्यांच्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीला माझ्या “फिल्ड वर्क’ ची जोड मिळाल्यास, राज ठाकरेंना सुद्धा राजकीय सूर गवसेल अशी आशा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! मोदींच्या गुजरातमध्येच भाजप पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?
गुजरात’मध्ये लवकरच भाजपमध्ये बंड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मोदी आणि अमित शहांना गुजरातमधूनच मोठा राजकीय धक्का बसण्याची स्थित निर्माण झाली आहे असं राजकीय वातावरण आहे. कारण भाजपचे तब्बल २३ आमदार बंडाच्या पवित्र्यात असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘नाणार’ संदर्भात कितीही करार करा, प्रकल्प सुरु होणार नाही म्हणजे नाही: नारायण राणे
नाणार रिफायनरी संदर्भात केंद्र सरकारने नुकताच करार केला असून त्याला प्रतिउत्तर देताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी ‘केंद्राने नाणार संदर्भात कितीही करार करावेत प्रकल्प सुरु होणार नाही’ असा सज्जड दम भरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्लास्टिकबंदी विरोधात शिवसैनिकाची मुस्लिम वस्त्यांमध्ये अधिकाऱ्यांना दमदाटी
चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण खात्याने अंमलात आणलेल्या प्लास्टिकबंदी आणि त्यावरील अवाजवी दंडा विरोधात मुस्लिम वस्त्यांमध्ये शिवसैनिकाने आवाज उठवला खरा, परंतु नांदेडच्या पालिकेतील कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी या शिवसैनिकाला नांदेड पोलिसांनी तुरुंगवारी घडवली.
7 वर्षांपूर्वी -
सेनेचा वचक हरवला? स्थायी समितीचे अध्यक्ष व सभागृह नेत्यांना अवमानकारकरित्या व्यासपीठावरून खाली उतरवल
मुंबई महानगर पालिकेने आयोजित केलेल्या प्लास्टिकबंदीच्या प्रदर्शना दरम्यान मुंबई स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव व सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अपमानजनक वागणूक देत व्यासपीठावरून खाली उतरविण्यात आलं. विशेष म्हणजे महापालिकेत प्राबल्य असून सुद्धा इतर विरोधी पक्षांना सुद्धा सेनेच्या सन्मानासाठी मैदानात उतरावं लागलं.
7 वर्षांपूर्वी -
‘प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का? मनसेची कदमांवर खोचक टीका
प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर पर्यावरण मंत्र्यांनी चारच दिवसात प्लास्टिक बंदीतून किराणा दुकानदारांना दिलासा दिल्याने मनसेने रामदास कदमांवर ‘प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का? असा खोचक सवाल करत प्रश्न विचारला आहे आणि प्लास्टिकमधून खाऊ पोहोचल्यानेच रामदासाचा ‘कदम’ लगेचच घसरला, असा सणसणीत खोचक टोलाही मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात आणा; नेते व पदाधिकाऱ्यांची जोरदार मागणी
आज मुंबईतील एम.आय.जी क्लबवर पार पडलेल्या नेते, सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंना सक्रिय राजकरणात आणण्यासाठी जोरदार मागणी करण्यात आली.
7 वर्षांपूर्वी -
प्लास्टिक बंदीबाबत राज ठाकरेंचं भाष्य खरं ठरलं, पर्यावरण मंत्र्यांचा ४ दिवसात पहिला यू-टर्न
किराणा दुकानावरच्या आणि छोट्या दुकानदारांना लागणाऱ्या पॅकेजिंगवरची बंदी उठविण्याचा निर्णय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतल्याने हा निर्णय राज्यातील प्लास्टिक बंदी संबंधित पहिला यू-टर्न ठरला आहे. कालच राज ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असं भाष्य केलं होत की, कोणतीही पूर्व तयारी न करताच अंमलात आणलेल्या प्लास्टिक बंदीच नोटबंदीसारखंच होणार आणि एक एक निर्णय फिरवले जाणार.
7 वर्षांपूर्वी -
हतबल शिक्षक अखेर न्यायासाठी राज ठाकरेंच्या दरबारी, घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न
रहेजा कॉलेजमधील कला विषयाचा शिक्षक असलेल्या हा तरुण, रहेजा कॉलेज प्रशासनाने बंद केलेला कला विभाग पुन्हा सुरु करण्यासाठी मागील ४ वर्षांपासून एकाकी लढा देत होता. कॉलेज प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रार करुन सुद्धा ढिम्म प्रशासन काहीच हालचाल करत नसल्याची या तरुणाचं तक्रार आहे.
7 वर्षांपूर्वी -
सदाभाऊ खोत म्हणजे छोटा व्हायरस, शेतकऱ्यांना कोणतं औषध फवारायच चांगले माहीत आहे: राजू शेट्टी
राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटने नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी बोचरी टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देण्याची चांगली क्षमता आहे. आम्ही सर्व हाडाचे शेतकरी असल्याने आमच्या पिकावर आलेल्या रोगांवर कोणतं उपायकारक औषध मारायचं ते आम्हाला चांगलं अवगत आहे अशी थेट टीका त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाचा करार सुद्धा झाला, आता पुन्हा 'मी मंत्रिपद सोडेन'
स्थानिकांचा तीव्र विरोध असताना सुद्धा नाणार प्रकल्प लादण्यात आला आहे. नाणार मध्ये सभा घेऊन ‘मी नाणार संबंधित अध्यादेश रद्द करण्याची घोषणा करतो आहे’ अशी घोषणा करणारे राज्याचे उद्यीगमंत्री सुभाष देसाईंना दिल्लीत पारपडलेल्या घडामोडीं विषयी विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिपद सोडून राजीनामा देईन असा इशारा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीत भाजप, मनसे व शिवसेना असे सर्वच गट भरडले जाणार
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात जळगाव महानगरपालिकेवर सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे. सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने महापालिकेतील सर्वच म्हणजे ७५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात भाजपमध्ये सर्व सूत्र गिरीश महाजन यांनी घेतल्यामुळे त्यांच्यात सुद्धा एकनाथ खडसे यांच्या गटामुळे दुही माजण्याची चिन्ह आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची प्लास्टिकबंदीवरील संपूर्ण पत्रकार परिषद
राज ठाकरेंची प्लास्टिकबंदीवरील संपूर्ण पत्रकार परिषद
7 वर्षांपूर्वी -
निर्णय सरकारचा आहे, त्यामुळे सरकारने सरकारसारखं प्लास्टिक बंदीच्या उपाय योजनांवर बोलावं, नात्यांवर नाही: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सरकार काय उपाययोजना आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणार आहे यावर बोलावं. प्लास्टिक बंदीचा निर्णय नात्याशी जोडू नये असं उत्तर देत रामदास कदमांना त्यांची जागा दाखवून दिली.
7 वर्षांपूर्वी -
चर्चांना उधाण, कृष्णकुंजवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि राज ठाकरेंची भेट
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटी मागे सदिच्छा भेट असल्याचे कारण देण्यात असले तरी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने काही चाचपणी सुद्धा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येते.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार उसळी, मजबूत खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL