महत्वाच्या बातम्या
-
ED, CBI दोन्ही तपास यंत्रणा राज्यभरात ठिकठिकाणी देशमुखांना शोधण्यासाठी छापेमारी करण्याची शक्यता
शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावूनही ते गैरजर राहिले आहेत. तसेच त्यांचा ठावठिकाणाही लागत नाहीय. यामुळे ईडीने त्यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे.
3 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसीच होतील - विजय वडेट्टीवार
ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात चांगलाच वाद उफाळून आला होता. राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक भुमिकेत आहे. विद्यमान सरकारवर भाजप नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 3 वाजता होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक | मोठ्या निर्णयाची शक्यता
ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात चांगलाच वाद उफाळून आला होता. राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक भुमिकेत आहे. विद्यमान सरकारवर भाजप नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 3 वाजता होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाली आहे. पटेल यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. ही बैठक दुपारी 3 वाजता प्रदेश भाजपचे मुख्यालय कमलम येथे झाली होती. नवा नेता राज्यापालांना भेटणार आणि सरकार स्थापनेचा दावा करणार.
3 वर्षांपूर्वी -
भूपेंद्र पटेल यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येताच उपमुख्यमंत्री नितीन पटेलांची बंडाची भाषा? | भाजपमध्ये धाकधूक
गुजरातमध्ये भाजपची नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. राजधानी गांधीनगरला भाजपाचे आमदार जमा झालेत. भाजपचे पर्यवेक्षक तोमर, प्रल्हाद जोशी हेही ह्या बैठकीत आहेत. ज्यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे ते मनसुख मांडवीय, नितीन पटेलही यांनीही बैठकीला हजेरी लावलीय. गुजरातचा नवा मुख्यमंत्री कोण याची देशभरात उत्सुकता आहे. अशातच ट्विटरवर #Nitin असं ट्रेंड होतंय. हा ट्रेंड आहे उपमुख्यमंत्री राहीलेल्या नितीन पटेल यांच्याबद्दल.
3 वर्षांपूर्वी -
म्हाडाच्या जमिनीवर अनिल परब यांनी बांधलेले बेकायदा ऑफीस पाडणार | लोकायुक्तांचा आदेश
ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब यांनी म्हाडाच्या जमिनीवर पूर्व बांद्र्याला बांधलेले ऑफिस पाडण्यात येणार आहे. लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही एन कानडे यांनी यासंदर्भातला आदेश दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं - बाळासाहेब थोरात
काँग्रेसची अवस्था एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. पवारांच्या या विधानाशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असहमती दर्शविली आहे. तसेच पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असं खुलं आवतनच बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना दिलं आहे. त्यामुळे थोरात यांच्या या आवतनावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
3 वर्षांपूर्वी -
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करणार
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | मुख्यमंत्री स्तरावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणावर चर्चा होईल - जयंत पाटील
राज्यातील ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीत आरक्षणाच्या बाबतीत निर्णय़ होईल, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज संस्थेतील ओबीसी आरक्षण कमी होता कामा नये, ही सरकारची भूमिका असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. ते सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
योगी यांच्यासाठी उत्तर प्रदेशचा विकास म्हणजे प. बंगालच्या पायाभूत सुविधांचे फोटो चोरून वापरने - अभिषेक बॅनर्जी
देशात सर्वांचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ अगदी काही महिन्यावर येऊन पोहोचल्या आहेत. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही तयारीला लागले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे उध्दभवलेल्या आणि गंगा घाटातील वास्तवामुळे योगी सरकारची जगभर पोलखोल झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच उत्तर प्रदेशात कोरोनामुळे स्थिती अत्यंत भीषण असल्याचं देखील देशाने अनुभवलं आहे. परिणामी योगी सरकारसाठी आगामी निवडणुका कठीण झाल्याचं म्हटलं जातंय.
3 वर्षांपूर्वी -
फेकावं तर भाजपनेच | उत्तर प्रदेशच्या विकासाच्या जाहिरातीत प. बंगालचे रस्ते आणि फ्लाय-ओव्हर
देशात सर्वांचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ अगदी काही महिन्यावर येऊन पोहोचल्या आहेत. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही तयारीला लागले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे उध्दभवलेल्या आणि गंगा घाटातील वास्तवामुळे योगी सरकारची जगभर पोलखोल झाल्याचं पाहायला मिळालं.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये भाजपची स्थिती बरी नाही | ५ वर्षापूर्वी भाजपला काठावरचं बहुमत मिळालं - संजय राऊत
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा भाजपने घेतलेला राजीनामा ही रणनीती आहे की अचानक घेतलेला निर्णय आहे? विजय रुपाणी यांचा राजीनामा अचानकपणे घेण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. विजय रुपाणी आणि पक्षाच्या संघटनात खूप दिवसांपासून मतभेद सुरू होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध नव्हते. त्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकदा हस्तक्षेप केला होता. सुत्राच्या माहितीनुसार 2021 मध्ये भाजपच्या प्रदेश नेत्यांनी रुपाणी यांच्याविरोधात पक्षाच्या वरिष्ठांना अहवाल दिला होता.
3 वर्षांपूर्वी -
RSS व भाजपाच्या ऑगस्टमधील गुप्त सर्वेक्षणातील धक्कादायक आकडेवारीमुळे रुपाणींचा राजीनामा? - सविस्तर वृत्त
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा भाजपने घेतलेला राजीनामा ही रणनीती आहे की अचानक घेतलेला निर्णय आहे? विजय रुपाणी यांचा राजीनामा अचानकपणे घेण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. विजय रुपाणी आणि पक्षाच्या संघटनात खूप दिवसांपासून मतभेद सुरू होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध नव्हते. त्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकदा हस्तक्षेप केला होता.
3 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | निवडणुकीचे पूर्ण अधिकार आयोगाचे | सुप्रीम कोर्टाचा निर्णय | सर्वच राजकीय पक्षांची अडचण
मागील काही दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यात सुप्रीम कोर्टातून नुकत्याच आलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या अडचणी आणि विशेष करून राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपकडून दिशाभूल | कोरोनामधील अराजकता व अपयशामुळे लोकांमध्ये नाराजी वाढल्याने रुपाणींचा राजीनामा - हार्दिक पटेल
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरातच्या विकासाची ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवा उत्साह, नवी ऊर्जेसह पुढे जावी. हे लक्षात घेत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं रुपाणी यावेळी म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
कार्यकाळ पूर्ण होण्याच्या वर्षभरापूर्वीच रुपाणींनी मुख्यमंत्रीपद सोडले | आता मनसुख मंडाविया आघाडीवर
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्षातील जबाबदाऱ्या काळानुसार बदलत राहतात. पक्षात ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला 5 वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sakinaka Rape Case | राज्य सरकारने हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलून फास्ट ट्रॅकवर खटला चालवावा - देवेंद्र फडणवीस
मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. अशी प्रकरणं वारंवार होत राहिली तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन फाशीच झाली पाहिजे, असं मत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत यादव-मुस्लिम वोट बँके फोडून एमआयएम अप्रत्यक्षरीत्या भाजपाला मदत करतंय?
उत्तर प्रदेशात वर्षानुवर्षे मुस्लिम समाज समाजवादी पार्टीला मतदान करतो आहे. मुलायम सिंग यादव यांच्या काळापासून त्यांनी 11% यादव आणि 19 टक्के मुस्लिम मतांची गोट बँक समाजवादी पार्टीबरोबर घट्ट बांधून टाकली आहे. ही वोट बँकच फोडण्याचा हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा प्रयत्न आहे.
3 वर्षांपूर्वी -
जिल्हा परिषद निवडणुकांच्या सोबतच होणार विविध महामंडळांवरच्या नेमणुका | महाविकास आघाडीत 40:40:20 सूत्र
आघाडी सरकारला सत्तेत येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी राज्यातील विविध महामंडळांच्या नेमणुकांना मुहूर्त मिळालेला नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महामंडळाच्या नेमणुका होतील, अशी नवी तारीख मंडळांवर वर्णी लावण्याकडे डोळे लावून बसलेल्या पदाधिकाऱ्यांना दिली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
बंद करून दाखवलं'चं श्रेय घेणार का? | आ. नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा बंद केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना विमा बंद केल्याच्या कारणावरून खोचक पत्र लिहिल आहे. कोविडच्या कठीण प्रसंगांमध्ये या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य अचूक बजावलं. या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली तेव्हा, “करून दाखवलं” अशा घोषणा देण्यात आल्या. मग आता हा विमा बंद केल्यानंतर याचे श्रेय कोण घेणार, असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH