महत्वाच्या बातम्या
-
ठाणे | मराठा विद्यार्थी वस्तीगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात मराठा समाजाच्या समन्वयकामध्ये वाद | पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यातील माजिवडा येथे ठाण्यातील पहिले मराठा विद्यार्थी वस्तीग्रहाचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. दरम्यान, येथे मराठा समन्वयकामध्ये आपापसात वाद सुरू झाला.
3 वर्षांपूर्वी -
OBC आरक्षण | नांदेड-हिंगोलीत खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन | केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे विविध ओबीसी संघटनांकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी आज नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं.
3 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्य सरकार कोर्टात गेलं तरी राज्यपाल म्हणाले 'राज्य सरकारचा आग्रह नाही' ?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज पुण्यातील विधान भवन येथे ध्वजारोहण पार पडले. यानंतर राज्यपाल उपस्थित अधिकारी आणि नेत्यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न विचारला. तेव्हा राज्यपालांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले.
3 वर्षांपूर्वी -
काही लोक काहीतरी विधान करून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करतात, त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतील - जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच राज्यात जातीयवादी राजकारण वाढल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून, काही लोक काहीतरी बोलून केवळ लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करीत असतात. त्याकडे राज्यातील लोक दुर्लक्ष करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. सांगली येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
मंत्री दत्तात्रय भरणे भर कार्यक्रमातील संवादात म्हणाले, 'मुख्यमंत्री मरु द्या' | शिवसेना-राष्ट्रवादीत वाद पेटणार
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचे कार्यक्रम होते. सोलापूर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव देगाव रोड येथे 43 एकर जागेवर वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला. वंचितचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा भांडवली निधीतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री दत्ता भरणे बोलताना मुखमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे सोलापुरातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकमंत्र्यांनी ताबडतोब दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर घसरलेली जीभ बाहेर काढू अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची आडकाठी नाही, पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न | खासदार भावना गवळींनी सांगितलं वास्तव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बवर वाशिम-यवतमाळ मतदारसंघाच्या शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील नॅशनल हायवेची जवळपास 90 टक्के कामे ही पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी ही कामे राहिलेली आहेत. ती फॉरेस्ट किंवा काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, तर काही ठिकाणी शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे तेथील काम थांबवलेले आहे. शिवसेनेने कुठल्याही कामात आडकाठी केली नाही, किंवा कोणतेही काम थांबवलेले नाही. गडकरी साहेबांकडे काहीतरी चुकीची माहिती गेली असावी, मी स्वतः गडकरी साहेबाना भेटून या सम्पूर्ण विषयावर चर्चा करणार असल्याचे स्पष्टीकरण खासदार गवळी यांनी दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
संजय राठोड प्रकरणात चौकशीअंती वस्तुस्थिती समोर येईल, अनेकदा बिनबुडाचे आरोप होत असतात - अजित पवार
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.
3 वर्षांपूर्वी -
गडकरींच्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, परंतु, कुठल्याही....
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना शिवसेनेचे स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगितले होते. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी आज (रविवारी) 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या, यावेळी ते बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंची पक्षातून हकालपट्टी करावी | तृप्ती देसाईंची राज ठाकरेंना विनंती
राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना महत्वाच्या अशा नवी मुंबई महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अडचणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. ज्या गजानन काळेंवर शहराची जवाबदारी होती तेच कौटुंबिक आरोपांमुळे अडचणीत आले आहेत आणि परिणामी मनसेच्या राजकीय अडचणीतही वाढ झाल्याचं समोर येतंय.
3 वर्षांपूर्वी -
स्वातंत्र्यदिनी सुद्धा? | भारतीयांनो, मोदींनी २०१९ पासूनची जुनी घोषणा नामकरण करत पुन्हा २०२१ मध्ये चिकटवली - पोलखोल
75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’
3 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्तींसदर्भात राज्यपालांवर अदृश्य दबाव - छगन भुजबळ
आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीवर दबाव असल्याचा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले असता, राज्यपालांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील. परंतू त्यांच्यावर अदृश्य दबाव असल्याचा टोला लगावत भुजबळांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२२ | भाजपची जोरदार तयारी | 'समर्थ बूथ अभियाना'साठी विशेष रणनीती
शिवसेनेला कोंडीत पकडायचे असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धक्का देणे गरजेचे आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप लागलेली आहे. याबाबत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वाची बैठक आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावली होती.
3 वर्षांपूर्वी -
परवानगी मिळण्यासाठी गोपीचंद पडळकरांकडून बंदी झुगारुन बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा आणि शेतीमातीसाठी एकत्र यावं लागणार आहे, अशी साद घालत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या विरोधात भव्य बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे. 20 ॲागस्ट रोजी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथे बंदी झुगारून शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
नितीन गडकरींच्या पत्रावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया आली, म्हणाले नितीन गडकरी...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पत्रामुळे शिवसेनेच्या शिस्तबद्ध पदाधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत मात्र, अकोल्याचे पालकमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे हे योग्य भूमिका घेतील, असे ते म्हणाले. तसेच गडकरी साहेबांचा मी पण एक चाहता आहे, असेही ते म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
ओबीसींचं आरक्षण वाचवा | मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका - पंकजा मुंडेंचा इशारा
ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये आज ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिलाय.
3 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींवर राजकीय हल्ल्यांसोबत डिजिटल हल्ले सुरु? | आता इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाईची मागणी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या ट्विटरवर कारवाईची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आता गांधींच्या इन्स्टाग्राम अकाउंटकडे मोर्चा वळविला आहे. एनसीपीसीआरने राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याने ही कारवाई करावी, असे एनसीपीसीआरने फेसबुकला पत्र लिहिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
BHR Scam | सुनील झंवर'सोबत माझा कोणताही संबंध नाही | माझ्या कंपन्यांचा उद्योग २०० कोटींचा - भाजप आमदार
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था अर्थात बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे अटक केली. सुनील झंवर हा गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जात असल्याने तसेच त्यांच्या कार्यालयातील झडतीमध्ये महाजन यांच्या शस्त्र परवान्याच्या झेरॉक्स मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | नवी मुंबई मनसेच्या आंदोलनाचं सत्य मांडलं | कामगारांच्या आंदोलनानंतर ठराविक रक्कम घेतली - संजीवनी काळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच गंभीर आरोप करताना तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
3 वर्षांपूर्वी -
25 वर्षे शिवसेना -भाजप एकत्र होती | तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?
केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तक्रार केली आहे. राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले. तसेच शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामे बंद पडतील. असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच त्यांनी उद्धव मुख्यमंत्र्यांकडे महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी काही भारताचे राजे नाहीत | भाजप खासदाराने प्रतिक्रिया देताना झापलं
पंतप्रधान मोदी हे काही भारताचे राजे नाहीत”, हे शब्द विरोधी पक्षाच्या नेत्यांचे नाहीत तर भाजपाच्या एका खासदाराचे आहेत. विशेष म्हणजे तुम्ही मोदीविरोधी आहात असं म्हटल्यानंतर एका भाजपा समर्थकालाच या शब्दांमध्ये थेट ट्विटरसारख्या सार्वजनिक माध्यमातून हे खडे बोल या खासदाराने सुनावले आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH