महत्वाच्या बातम्या
-
102 व्या घटना दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत | ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल न केल्यास केंद्राचा हेतू स्पष्ट होणार?
102 व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकार आज लोकसभेत मांडणार आहे. मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नवे एस. ई. बी. सी. प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांनाही मिळणार आहे. मात्र 50 टक्क्यांची निर्बंधाची अट शिथील करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. 50 टक्के मर्यादेचं काय? या प्रश्नावरुन विरोधक आज संसदेत गदारोळ करण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणूक २०२२ | डिसेंबरमध्ये राहुल गांधी यांची शिवतीर्थावर सभा
काँग्रेस पक्षाची सभा डिसेंबरला शिवाजी पार्क मध्ये होणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होत आहे. डिंसेबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे येत्या 28 डिसेंबरला कॉंग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली वारी | संजय राऊत-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला आहे. शिवसेना युपीएचा भाग नाही. मात्र, दिल्लीत राहुल गांधी आणि राऊत यांच्यात जवळकी वाढलेल्याचे चित्र दिसून आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा | कोरोना निर्बंधात मोठे बदल
पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो - नारायण राणे
राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपूर्वी भेटले होते आणि त्यानंतर राऊत आणि गांधी यांच्या फोटोची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्ष रसातळाला जातो, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यसभेत 8 विधेयके विरोधकांशी चर्चेशिवाय झाली मंजूर | संजय राऊतांकडून चिंता व्यक्त
संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात होऊन तीन आठवडे होत आले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांचा पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदा आणि महागाईवरुन गदारोळ कायम आहे. परंतु, संसदेच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यसभेत 8 विधेयके मंजूर करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाज तासनतास तहकूब करावे लागत आहे. या आठवड्यात कामकाजामध्ये वाढ झाली असून 13.70% वरुन हे 24.20% आले आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 32.20 टक्के काम पहिल्या आठवड्यात झाले.
3 वर्षांपूर्वी -
ओबीसी राजकीय आरक्षण | आम्ही आघाडी सरकारला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देतोय अन्यथा...काय म्हणाले बावनकुळे?
भारतीय जनता पक्ष अपेक्षेप्रमाणे आता जातीय मुद्यांवर लक्ष केंद्रित करू लागल्याचं समोर येतंय. मराठा आरक्षणावरून १०२’वी घटना दुरुस्ती करून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेवून गुंता वाढवला आहे. तर दुसरीकडे राजकीय ओबीसींच्या आरक्षणावरून केवळ ‘ओबीसी आरक्षण’ हा शद्बप्रयोग करून संभ्रम वाढवत असल्याचं पाहायला मिळतंय.
3 वर्षांपूर्वी -
हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या करतंय - आ. नितेश राणे
महाराष्ट्रात हिंदू सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या परिपत्रकावरील तारीख फक्त बदलली. निर्बंध तेच असून हा हिंदूंवर अन्याय आहे, असं सांगतानाच ममता बॅनर्जी यांनी जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण केली. तिच परिस्थिती ठाकरे सरकारला राज्यात घडवायची आहे, असा घणाघाती हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांनी चढवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपची जोरदार तयारी | शहा-शेलार बैठकीत चर्चा
मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर बदल करण्यासाठी राजधानी दिल्लीत हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र या सर्व घडामोडीत वांंद्रे पश्चिमचे आमदार तथा भाजपचे मुख्य प्रताेद आशिष शेलार यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची धुरा येण्याची दाट शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात दाखल | प्रकृती स्थिर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या रुग्णालयात असल्याची माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
इंधन दर, महागाई, बेरोजगारी मुद्द्यांवर निवडणुका कठीण | भाजप राज्यात आखतंय फक्त 'जात' युद्ध? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दिल्लीत महत्वाची बैठक | कारण गुलदस्त्यात
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपच्या आक्षेपानंतर ट्विटरची कारवाई | राहुल गांधींचे दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील ट्विट हटवले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचे फोटो शेअर केल्याप्रकरणी ट्विटरने कारवाई केली. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख समोर येत असल्याने ट्विटरने हे फोटो हटवले आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे.
3 वर्षांपूर्वी -
2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल - देवेंद्र फडणवीस
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे-भाजप युती होण्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील-राज यांची भेट निष्फळ ठरलीय का? असा सवाल केला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | चक्क 'नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद' | नेमका विषय काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मीडियासमोर यायला घाबरतात अशी टीका मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून केली जाते. असं असतानाच आज मात्र महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पत्रकार परिषदेतील फोटो पोस्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलेल्या या फोटोची सध्या समाज माध्यमांवर चर्चा आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजप चंद्रकांतदादांना पदावरून हटवणार? | भाजप नेत्यांच्या दिल्लीवारीवर फडणवीसांनी दिली माहिती
पुढील वर्षी महाराष्ट्रात मुंबईसह इतर अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष तयारीला लागला आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यावर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीची देखील चाचपणी केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये देखील बदलांची चर्चा सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांचा हात? | आरोपींची कबुली | पोलीस नोटीस पाठवणार
झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात आले असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात झारखंड पोलिसांनी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता. तर रांची येथील डीएसपी प्रभात रंजन यांनी याप्रकरणात शुक्रवारी आरोपी अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद यांची चौकशी केली. यावेळी या आरोपींनी महाराष्ट्रातील नेत्यांशी आपले संबंध असल्याची कबुली दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
आता लोकच यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत म्हणतील 'लाव रे तो व्हिडिओ' | वडेट्टीवार यांचा टोला
आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोलेबाजी केली. दोघांच्या भेटीचे व आतापर्यंतचे व्हिडिओ लोकच लावतील, सोशल मीडियावर आता “लाव रे व्हिडिओ” सुरू होईल असे म्हणत राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला.
3 वर्षांपूर्वी -
हे फक्त नावच बदलू शकतात, उद्या भारताचं नाव USA करतील | ऑलिम्पिक विजेत्याकडून मोदींची खिल्ली
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली होती. मोदींनी यासंदर्भातील ट्विट केल्यानंतर गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची नावं बदलून प्रसिद्ध खेळाडूंची नावं द्याची अशी मागणी जोर धरू लागताच भाजप नेते शांत झाले.
3 वर्षांपूर्वी -
युपी विधानसभा २०२२ | सोशल मीडिया हा एक बेलगाम घोडा आहे, तयार रहा | योगींचा IT सेलला सल्ला
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका काही महिण्यावर आल्या आहेत. एका बाजूला मोठा दावेदार असलेला समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांच्या नैत्रुत्वात जोरदारपणे कामाला लागला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दौरे सुरु झाले आहेत. तसेच समाज माध्यमांचा देखील मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अँटिइन्काबंसीचा फटका बसण्याची शक्यता असलेलं योगी सरकारही खळबळून जागं झालं आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN