महत्वाच्या बातम्या
-
भाजपमध्ये भूकंप होणार? | खडसेंप्रमाणे गेम होतोय, पंकजांनी शिवसेनेत जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव - सविस्तर वृत्त
फडणवीस राज्याचे मुंख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी स्वपक्षातील दिग्गज नेते आणि एखाद्या समाजाचा चेहरा असणाऱ्या नेत्यांना शिस्तबद्ध संपवण्याचा घाट घातला आणि तो प्रत्यक्षात देखील उतरवला आहे. पक्षांतर्गत सर्व ज्येष्ठ नेत्यांचं राजकीय महत्व संपूष्टात आणून आयात नेत्यांना पुढे करण्याचा सपाटा लावल्याची भावना राज्य भाजपात निर्माण झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
GDP'चा अर्थ गॅस-डीझेल-पेट्रोल असा झालाय | २०२४ मधील निवडणुकीत मोदी विरुद्ध देश असेल - ममता बॅनर्जी
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. १० जनपथ मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधीही तेथे उपस्थित होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पहिला दिल्ली दौरा आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या दत्तक नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा | भाजपसोबत युती नाहीच - संदीप देशपांडे
शिवसेनेसोबत राजकीय अंतर वाढल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या जवळीक वाढण्यावर वारंवार वक्तव्य करताना दिसत आहेत. अगदी फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात जर तर जोडत मोठी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे मोठा राजकीय संभ्रम पाहायला मिळत होता. मात्र याच संभ्रमावर मनसेतून मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कारण या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पत्रकार फोटोग्राफरकडून राज यांचे वारंवार फोटोज | राज गमतीने म्हणाले 'मी काय कुंद्रा आहे का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणावर बैठका आणि पक्ष बळकटीच्या अनुषंगाने पक्षांतर्गत चर्चा देखील सुरु आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला मूळ विषयावर केंद्रित असलेले राज ठाकरे पत्रकारांसोबत वेळ खर्ची घालताना दिसत नसल्याने अनेक पत्रकारांच्या रिपोर्टींग संदर्भात अडचण होतं आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोठा संभ्रम | पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रानं जाहीर केलेली ७०१ कोटीची मदत 2020 सालची
काल केंद्र सरकारने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०१ कोटीची मदत जाहीर केल्याचं वृत्त झळकलं. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केंद्राच्या तत्परतेचे गोडवे गाण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता आलेल्या वृत्ताप्रमाणे मोठा संभ्रम झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण स्वतः राज्य सरकारकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ | राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीची युती
भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये नेहमीच वाद असतात. काँग्रेस पक्षाने आता भाजप विरोधात वेगळीच खेळी खेळली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाबरोबर मैदानात उतरणार आहे. उत्तर प्रदेशच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस समाजवादी पक्षाबरोबर युती करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस केके शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी मंगळवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना आ. प्रताप सरनाईकांचा उपक्रम | रिकामा सिलेंडर आणा मोफत ऑक्सिजन भरा
आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहराची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी स्वखर्चातुन ‘ऑक्सिजन प्लांट’ उभारला आहे . पुढील 3 ते 4 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. काल पालिका आयुक्त, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘ऑक्सिजन प्लांट’मधून सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे प्रात्यक्षिक झाले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्लांटची पाहणी केली.
4 वर्षांपूर्वी -
पेगॅसस हेरगिरी प्रकरण | मोदी सरकारची कोंडी | संसदेच्या आयटी समितीची आज बैठक
देशात आणि जगभर गाजत असलेल्या पेगॅसस प्रोजेक्ट प्रकरणावरून काँग्रेस समविचारी पक्ष सरकारची संसदेच्या दोन्ही सभागृहात कोंडी करण्याची चिन्हं आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच मोबाईलच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचं प्रकरण समोर आल्यानं भारतातील राजकीय वातावरण घुसमळून निघालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी नाशिक आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी
महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसलेली आहे हे दिसून येतंय. मनसे नेते अमित राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगालप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी - नाना पटोले
बहुचर्चित पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील महत्वाचे राजकीय नेते, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आले आहेत. या लोकांवर हॅकिंगच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशी आदेश अद्याप दिले नसले तरी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने या हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ममतादीदी-पंतप्रधान भेट | लोकसंख्येप्रमाणे कोरोना लस आणि पेगासस प्रकरणी सर्वपक्षीय बैठकीची मागणी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी संध्याकाळी भेट घेतली आहे. दरम्यान, ममता यांनी देशातील कोरोनाची स्थितीवर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. बंगाल राज्याला मिळणारी लसीची मात्रा वाढवण्यास सांगितले असून बंगालला लोकसंख्येनुसार लस मिळावी अशी मागणीदेखील ममता यांनी पंतप्रधानांना यावेळी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा करू नका असं आवाहन केलं आहे. ते राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी त्यांना गेली ४५ वर्षे ओळखतो. मुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत, मात्र या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालादेखील अपेक्षा आहेत. आजच्या दिवशी हे माझं म्हणणं मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. राष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत. आणि ते करतील याची मला खात्री आहे.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिवसेनेच्या जाहिरातीचा १ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल करत भाजप IT सेलचं बदनामी तंत्र
महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोपली असताना भाजप-सेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नसल्याचे दिसून येते. आता भाजपने पुन्हा एकदा समाज माध्यमावर पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपने शिवसेनेने केलेल्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर करत सेनेवर निशाना साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांच्या उपस्थितीत चर्चा व्हावी | पेगासस प्रकरणी संसदेत गदारोळ, प्रचंड घोषणाबाजी
पावसाळी अधिवेशनात आजही पेगासस हेरगिरी प्रकरणी गदारोळ सुरूच आहे. राज्यसभेचे कामकाज 11 वाजता सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी करण्यात आली. याच गदारोळात संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर पुन्हा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
देशाची तरुणाई २०२४ मध्ये मोदी सरकार उलथवून लावेल - सुनील केदार
देशातील वाढत्या महागाईने लोकांचे नुकसान केले आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर सर्वाधिक युवकांचे नुकसान झाले आहे. देशातील तरुण हे बेरोजगार झाले आहे. यामुळे हे युथ येणाऱ्या 2024 निवडणुकीत हे भाजपचे सरकार उलथून लावतील आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असा इशारा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला. ते नागपुरात संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या हल्ला बोल आंदोलना दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार | पवारांची माहिती
महाराष्ट्रात पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. कोल्हापूर, कोकण, सातारा, सांगली या भागात पूर आल्याने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. लवकरच मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. यावेळी अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादी पक्ष जीवनाश्यक वस्तू पुरवणार | पवारांची मुंबईत घोषणा
महाराष्ट्राला पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक कुटूंब देशोधडीला लागली आहेत. तर स्थानिक पातळीवरील छोटे उद्योग कोलमडून पडले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष, सामान्य लोकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आसाम-मिझोराम सीमेवरील रक्तपात | हेच महाराष्ट, प. बंगालच्या सीमेवर घडलं असतं तर शहांनी...
आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. याच वादातून सोमवारी पुन्हा एकदा सीमेवर संघर्षाचा उद्रेक झाला. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार विरोधात बोलण्यासाठीच राणेंना केंद्राचा लाडू मिळाला - गुलाबराव पाटील
राज्य संकटात असताना राजकारण करणाऱ्यांनी थाेडा तरी विचार करायला हवा, असा सल्ला देत नारायण राणे हे मंत्री झाल्यापासून काेकणावर संकट आले. त्यामुळे तेच पांढऱ्या पायाचे असल्याचा टाेला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
आमदार खरेदी प्रकरण | झारखंड पोलिस पथक मुंबईत | बावनकुळे, चरणसिंग, बेलखेडे चाैकशीच्या फेऱ्यात
झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today