महत्वाच्या बातम्या
-
तुटण्याआधीच भाजपशी जुळवून घ्या | आ. सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र
ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्यासाठी पत्रातून साकडे घातले आहे. सरनाईक यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या पत्रातील मुद्द्यावर बोट ठेवत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणे म्हणाले तिथे राडाबिडा काही झाला नाही | नितेश राणे म्हणाले, नाईकांना शिवप्रसाद दिला?
सिंधुदुर्गातल्या कुडाळ पेट्रोल पंपावर झालेल्या राड्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या पेट्रोल पंपावर वैभव नाईक थांबला कुठे, तो पळाला. तिथे राडाबिडा काही झाला नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं
4 वर्षांपूर्वी -
पोलिसांवरील कारवाई | अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे पुन्हा आमने-सामने
भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांचा वाद काही नवीन नाही. पोलिसांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील भाजप कार्यालयाची झडती घेतल्याने केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरून पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान, पोलिसांचे निलंबन आज मागे घेण्यात आलं असून, पोलिसांवरील ही कारवाई मागे घेतल्याने अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला रामराम, सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले | गोंदियाचे माजी आमदार दिलीप बंन्सोड सुद्धा काँग्रेसमध्ये
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुनील देशमुख यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे आमची तिकीटं कापली जायची, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाही, ते नुसतेच बोलतात - चंद्रकांत खैरे
एकाबाजूला सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुकांना अजून ३ वर्ष शिल्लक | त्याआधीच युती, आघाडी, स्वबळाची भाषा करणं शहाणपणा नाही
मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फटकारले आहे. निवडणुकांना अजून अवकाश आहे. त्या आगोदरच काहीही भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असा टोला लगावतानाच 2024’मध्ये मुख्यमंत्री कुणाचा असेल याचा फॉर्म्युलाही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात पेट्रोल पंपावर राडा | शिवसेना आ. वैभव नाईक भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले
दरम्यान, आता सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
4 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वासाठी आजही शिवसेनाच समोर येते | हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे - संजय राऊत
शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने पक्षाच्या नेतेमंडळींकडून आणि इतर राजकीय पक्षांकडून देखील शिवसेनेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या गेल्या ५५ वर्षांच्या प्रवासाविषयी भूमिका मांडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची खास ऑफर | पेट्रोल मोफत मिळवा तो देखील नारायण राणेंच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर?
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात पुन्हा ठिणगी उडण्याची शक्यता आहे. शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करुन भारतीय जनता पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा आज 55 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे पेट्रोल वाटप भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर होणार होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड देण्याचा कार्यक्रमच वैभव नाईक यांनी आखला होता.
4 वर्षांपूर्वी -
नवनीत राणांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड | सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली
अमरावतीच्या भाजप समर्थक खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने २ लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. खासदार नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती मिळतेय.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई लसीकरण फसवणूक | लोकांना फेक इंजेक्शन देणाऱ्या रॅकेटचे 4 लोक मुंबई पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या हीरानंदानी सोसायटीमध्ये बनावट व्हॅक्सीनेशन ड्राइव्ह चालवून 390 लोकांना इंजेक्शन देणाऱ्या 4 आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका मोठ्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या फसवणुकीचा मास्टरमाइंड 10 वी नापास व्यक्ती आहे. लसींचा जुगाड करणे आणि कँपची जबाबदारी सांभाळण्याचे काम त्याच्या खांद्यावरच होते. ज्या लोकांना पकडण्यात आले आहे, त्यामध्ये एक व्यक्ती मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. त्याने MP च्या सतना येथून लसींचा पुरवठा केला होता.
4 वर्षांपूर्वी -
मराठा नंतर OBC'वरही भाजपचं अजब राजकारण | केंद्राकडे इम्पिरिकल डेटा उपलब्ध असताना राज्याकडे मागणी
मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलेले असल्याचे पहायला मिळत होते. आता यानंतर राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आरक्षणासंदर्भात राज्यातील ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात भाजपची बैठक झाली. या बैठकीनंतर येत्या 26 जून रोजी ओबीसी आरक्षणासाठी राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने, काँग्रेस-एमआयएम'च्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे - गिरीश महाजन
राम मंदिराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं असून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी घणाघाती टीका केली आहे. श्रीराम जन्मीभूमीतील मंदिर पूर्ण होण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना प्रयत्न करीत आहे. आता तर ‘शिवसेनेने, काँग्रेस एमआयएमच्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे,’ अशी घणाघाती टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय
कोरोना संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत (Approval Rating) घट झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरलं आहे. मोदींच्या गुणांकनात घट झालेली असली तरी इतर जागतिक नेत्यांना त्यांनी मागे टाकलं आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने ( Morning Consult) केलेल्या सर्व्हेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार
केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. कारण, केंद्राकडे असलेला हा डेटा मिळाला तर ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल”, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट म्हटले आहे. तसेच हा मिळावा म्हणून आम्ही केंद्राला दोन पत्रे लिहिली पण डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुंबई येथे भेट घेतली. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या समर्थकांवर बीएचआरकडून झालेली कारवाई आणि खडसेंकडून घेण्यात आलेली भेट यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका
पुण्याच्या लौकिकाला साजेसा उपक्रम काँग्रेसने शहरात राबवला आहे. नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी याची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. त्याहीपेक्षा सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा २०२४ | रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांची तयारी
मराठवाड्यातील सर्वाधिक चर्चेत असणारं म्हणजे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव असंच म्हणावं लागेल. तेच हर्षवर्धन जाधव पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि ते सुद्धा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधातच असं दिसतंय. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. कारण, हर्षवर्धन जाधव यांनी आता थेट जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
इंद्रदेव वाराणसीत अतिवृष्टी करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचत आहेत | त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल व्हायला हवेत
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अब्दुल समद नावाच्या एका वृद्ध व्यक्तीवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटरसह 9 जणांवर एफआयआर दाखल केली होती. या घटनेला चुकीच्या पद्धतीने जातीय रंग दिल्यामुळे या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका वयोवृद्ध मुस्लिमांना मारहाण करत दाढी कापण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील - प्रकाश आंबेडकर
कोरोनाकाळात नागरिकांना सोयी सुविधा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल, असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. देशात दंगे होऊ नयेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकराने ‘प्रॉफिट मोहम्मद अँड अदर रिलिजियस हेड्स प्रोहायबीशन ऑफ स्ल्यानंडर ऍक्ट, 2021 कायदा’ मंजूर करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. हा कायदा विधानसभा, संसदेत मांडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE