महत्वाच्या बातम्या
-
मराठा आरक्षण | भाजप नेते समाजाला भडकवण्यात व्यस्त | तर मुख्यमंत्री उद्या पंतप्रधानांना भेटणार
मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर यांची काय लायकी राहिली असती - निलेश राणे
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष करण्याचा सपाटा लागल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला चंद्रकांत पाटील रोज नवनवी विधानं करून अजित पवारांना लक्ष करत आहेत. त्यावर अजित पवार यांनी तिखट शब्दात प्रतिउत्तर दिल्यावर भाजपचे इतर नेते देखील संतापल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं सांगून फडणवीस व चंद्रकांतदादा आमदारांना थोपवत आहेत
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा चिमटा खडसे यांनी काढला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ | सरकार स्थापन करायला तळमळत आहेत - खडसेंची टीका
राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार | जयंत पाटलांचं मोठं विधान
मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन - नाना पटोले
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | काठी नगरपालिका सरकारी साहित्य चोरी प्रकरणी शुभेंदू अधिकारी आणि बंधूंवर गुन्हा दाखल
पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचा भाऊ सोमेंदू यांच्यावर काठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर नगरपालिकामधून सरकारी साहित्य चोरुन नेण्याचे आरोप लावण्यात आले आहे. हा गुन्हा काठी नगरपालिका प्रशासकीय मंडळाचे सदस्य रत्नदीप मन्ना यांनी 1 जून रोजी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत - उदयनराजे भोसले
खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पहिला मराठा मोर्चा 16 जूनला | छत्रपती संभाजीराजेंची रायगडावर घोषणा, ठिकाणही निश्चित
खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ही लोकं काही काळ आमच्यासोबतही होती, त्यामुळे त्यांचा आवाका किती आहे हे आम्हाला ठाऊक आहे - अजित पवार
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | भाजप नगरसेवकाची महिला तलाठ्याला शिवीगाळ करत मारहाण
नंदुरबारमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या पथकातील महिला तलाठी निशा पावरा यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे
4 वर्षांपूर्वी -
संघाला कोरोनापेक्षा मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता अधिक | सचिन सावंत यांचं टीकास्त्र
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांचा मृत्यू झाला असून आजही प्रतिदिन ३ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होतोय. त्यात भाजपची सत्ता असलेल्या काही राज्यातील भीषण वास्तव समोर आल्याने जगभरातून मोदी सरकारवर टीका झाली आहे. मात्र यामध्ये मोदी आणि गंगा नदीवरील कोरोना मृतांच्या तांडवामुळे भाजपच्या हिंदुत्वाची देखील पोलखोल झाली आहे. परिणामी भाजप सहित आरएसएसची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवराज्याभिषेक दिनी भगवा फडकवण्याला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना भाजपाची फूस - हसन मुश्रीफ यांचा आरोप
मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारच्या आणखी एका निर्णयावर आक्षेप घेतला आहे. भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते असं मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलं आहे. ६ जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तशा प्रकारचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोर्चातील मेटेंच्या भाषणात केंद्राच्या जवाबदारीचा उल्लेखच नाही | फक्त फडणवीसांचा जयजयकार अन राज्य सरकारवर टीका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. येत्या 5 जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा 7 जुलैला सुरु होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशा शब्दात मेटे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहणार, ही तर फक्त सुरुवात आहे, असंही मेटे यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसानं दिला याचंच आश्चर्य - विनायक राऊत
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिले लावले हे सर्वांनाच माहीत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हातून दिला गेला याचंच आश्चर्य वाटतं, अशा शेलक्या शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण का दिले नाही? - अजित पवारांचा सवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (४ जून) मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण का नाही दिलं. पवार साहेब समोर आलं की वाकून नमस्कार करायचा आणि नंतर असं बोलायचं, असं ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
योगी सरकारची वारंवार पोलखोल | माजी IAS अधिकाऱ्याच्या ट्विटर अकाउंट कारवाईसाठी केंद्राचा पुढाकार
उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर हँडलवर ट्विटरचा सावळा गोंधळ उघड झाला. नायडूंचं जे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट आहे, त्याची ब्लू टिक हटवत आधी अनव्हेरिफाईड केलं गेलं आणि नंतर काही तासात ते पुन्हा व्हेरिफाईड केलं गेलं. पण उपराष्ट्रपतीपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीबद्दल ट्विटरची ही कारवाई झाल्याने भाजपने थयथयाट केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी
केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजपमधील अंतर्गत वाद पेटला, प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा गोंधळ
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आमदार, खासदार, पदाधिकारी ते कार्यकर्ते सर्वच असंतुष्ट असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ममता बॅनर्जींचं राजकीय वजन वाढल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बीड | मराठा मोर्चा सांगून भाजपच मोर्चा काढण्याच्या तयारीत?
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. अशात आज (५ जून) मराठा मोर्चा निघणार आहे. “बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार,” असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा निघणार आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC