महत्वाच्या बातम्या
-
ममतादीदी इन ऍक्शन! पाडणार म्हणजे पाडणार | यूपीत निवडणुकीपूर्वी पिके आणि अखिलेश यांच्यात उच्चस्तरीय बैठक
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोदी-शहा यांच्यासहित देशभरातील भाजपाला धूळ चारणाऱ्या ममता बॅनर्जी आता देशभरात मोदी-शहांच्या हात धुवून मागे लागल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आगामी म्हणजे २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पराभूत झाल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तापालट होऊन मोदी पायउतार होतील हे जवळपास निश्चित होणार आहे. तसेच मेहनती आणि आक्रमक स्वभावाच्या तसेच राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या ममतादीदी पंतप्रधान पदाच्या उमेदवार होण्याची शक्यता आता बळावली आहे. परिणामी त्या आक्रमक झाल्या असून संपूर्ण यंत्रणा कामाला लावत असल्याचं दिसतंय.
4 वर्षांपूर्वी -
तो निर्णय चुकीचा होता, पाठीत खंजीर खुपसला गेला | सकाळच्या शपथविधीवर फडणवीसांची प्रतिक्रिया
लोकसत्ता’तर्फे आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली झालेल्या निवडणुकांनंतर अजित पवार यांच्यासोबत भल्या सकाळी घेतलेला शपथविधी अजूनही चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ८० दिवसांच्या चाललेल्या सरकारची चर्चा अजून देखील होत असते. त्यावर फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर खुद्द भाजपामधून देखील चर्चा किंवा नाराजी किंवा पाठिंबा अशा संमिश्र भूमिका व्यक्त होत असतात.
4 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल | मोदींचा फोटो नव्हे, आता लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर ममतांचा फोटो दिसणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पाहायला मिळायचे, मात्र आता लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बंगालच्या 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरण प्रमाणपत्रात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फोटो ठेवले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BMC निवडणूक | श्रेत्रीय अस्मितेसंदर्भातील मनसेसोबत मतं जुळत नसल्याने युती करण्याचा प्रश्नच नाही - फडणवीस
लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत आज देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी महाराष्ट्रामधील आगामी काळामध्ये येणारी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी भारतीय जनात पार्टी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार का या प्रश्नावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर | आता पुनर्विचार याचिकेकडे लक्ष
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अलाहाबाद हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची समिती स्थापन केली होती. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी या समितीने काम केलं. त्यानुसार या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन गोंधळ | वडेट्टीवार यांचीही बाजू सावरत अजितदादा म्हणाले, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केलं. अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचं असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असतं,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचीही बाजू सावरून घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई | आदर्श भाडेकरु कायद्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन
केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन भाडेकरार कायद्याविरोधात शिवसेनेनं आंदोलन पुकारलं आहे. या कायद्यानुसार घरमालक आणि भाडेकरूंच्या संमतीने भाडेकरार संपुष्टात आणण्याची मुदत ठरवण्यात येणार आहे. शिवसेनेनं या कायद्याविरोधात मुंबईयेथे आंदोलन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि शेतकरी आंदोलनामुळे संघ भाजपासाठी चिंतेत | मोहन भागवतांसह RSS'च्या मोठ्या नेत्यांची बैठक
कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन, महागाई यासारख्या अनेक मुद्यांवरुन मोदी सरकार सध्या बॅकफूटवर येताना दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारची विश्वासार्हतादेखील कमी होत आहे. त्यासोबतच विरोधी पक्षांकडूनही सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. पार्श्वभूमीवर भाजपची मदर विंग असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल | भाजपचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर | मोदी-शहांची डोकेदुखी वाढणार
प. बंगालमधील वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू होतं. परंतु, तृणमूलनं तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ | भाजपमध्ये भूकंपाचे संकेत | १२६ विद्यमान आमदार पक्षांतराच्या तयारीत
उत्तर प्रदेशाच्या राजकारणातून भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत. कोरोना आपत्तीत देश आणि जगभरात योगी सरकार आणि मोदी सरकारच्या कामांची पोलखोल झाली आहे आणि परिणामी जनता भाजपवर प्रचंड नाराज असल्याचे संकेत भाजपच्या आमदारांना मिळाले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील २०२२ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आमदार समाजवादी आणि बसपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. परिणामी भाजपमध्ये देखील धावपळ सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश | विदर्भ विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती
प्रसिद्ध गायिका वैशाली माडेनं नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वैशालीने पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वैशालीचं अभिनंदन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
समाजालाही वाटलं पाहिजे ना तुम्ही राजे आहात ! राणेंचा संभाजीराजेंवर प्रहार | पण कोणाच्या सांगण्यावर?
संभाजीराजे छत्रपती हे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाची आक्रमकता देखील वाढत चालली आहे. अशातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. “ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलो म्हणजे आरक्षणही मिळत नाही आणि कोणी पुढरीही होत नाही. समाजाला वाटलं पाहिजे ते राजे आहेत. लोकांमध्ये आस्था, आपुलकी, प्रेम निर्माण होण्यासाठी तसं कार्य करावं लागतं.
4 वर्षांपूर्वी -
इस्त्रायल | ट्रम्प'नंतर मोदींचे परममित्र पंतप्रधान नेतन्याहू युगाचा अस्त | इस्त्रायलमध्ये महाविकास आघाडी फॉर्मुला
मोसादसोबतच्या संघर्षानंतर इस्त्रायलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. अध्यक्ष बदलल्यानंतर आता इस्त्रायलमध्ये नरेंद्र मोदींचे मित्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू युगाचा अस्त झाला आहे. विरोधी पक्षांनी एकजूट होत नवीन सरकार बनविण्याची घोषणा केली आहे. यामुळे नेतन्याहू यांना बऱ्याच वर्षांपासूनची सत्ता सोडावी लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर | यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी - संदीप देशपांडे
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो शिवसैनिकाचा राग होता, परंतु ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका ट्विटराईटने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल - नाना पटोले
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी घोषणाची नाना पटोले यांनी केली केली आहे. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे; परंतु २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. प्रसार माध्यमांशी बोलताना नानांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ | सत्ता जाण्याच्या भीतीने सरसंघचालक आत्तापासूनच स्वतः राजकीय बैठकांच्या मैदानात
कोरोना आपत्तीत योगी सरकारवर जनतेचा संताप वाढला असून हिंदुत्वाच्या राजकारणालाही फटका बसला आहे. तसेच मोदींसहित सर्वांनाच याचा फटका बसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे योगीच्या भरोसे निवडणूक लढविण्यात काहीच अर्थ नाही हे आरएसएसला देखील समजल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश हातून गेला तर देश देखील जाणार हे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना देखील माहिती आहे. परिणामी संघ तसेच मोदी-शहा तिसरी लाट सोडून भाजप विरोधी लाट थोपविण्याच्या कामाला लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले, तो शिवसैनिकाचा राग होता | महापौरांचं स्पष्टीकरण
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो शिवसैनिकाचा राग होता, परंतु ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका ट्विटराईटने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत जगभरातून टीका झालेल्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना आत्तापासूनच निवडणुकांचे वेध
संपूर्ण देशात कोरोना काळात सर्वात भयावह स्थिती पाहायला मिळाली ती उत्तर प्रदेश राज्यात. जगभरात ते चित्र उमटले. परंतु, आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. “आम्ही कोरोनाला हरवलं, आता विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू”, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचे कोरोना काळातही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सुरूच, हायकोर्टाकडून संताप | दिले हे आदेश
लोकांचे कोरोना काळातही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सुरूच असल्यामुळे केवळ आर्थिक दंड आकारण्यासोबतच लोकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावरही भर द्या, असे निर्देश राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांपासूनच याची सुरूवात करावी, कारण तेही याबाबतीत गंभीर दिसत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची तक्रार करण्याऱ्या नागरिकांना गंभीरतेने घेतले जात नाही.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC