महत्वाच्या बातम्या
-
राणे स्वतः पत्रकारितेत | तरी लिखाणावरून लोकपत्र वृत्तपत्राच्या कार्यालयावर समर्थकांचा हल्ला
नारायण राणे स्वतः पत्रकारितेत असून प्रहार नावाचं वृत्तपत्रं चालवतात. मात्र आज घडलेल्या धक्कादायक प्रकारातून त्यांनी स्वतःच पत्रकारितेची मूल्य आणि स्वातंत्र्य बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळालं. कारण लोकपत्र’ वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी तहकीक यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र असो किंवा प. बंगाल | वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरून केंद्रीयं अडथळ्यांचे राजकारण सुरूच
वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य आणि पक्षीय राजकारण स्वतःच्या ताब्यात घेण्याचं मोदींच गुजरातमधील तंत्र देश पातळीवर देखील राबवलं गेल्याचे अनेक दाखले आहेत. अगदी उत्तर प्रदेशात देखील त्यांनी माजी प्रशासकीय अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री पदी बसवून तिथलं राजकारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतःकडे ठेवण्याची योजना आखल्याचं वृत्त आहे. तर महाराष्ट्रात देखील राज्यातील नेमके जे वरिष्ठ IPS अधिकारी केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर गेले त्यांनीच राज्य सरकारला अडचणीत आणल्याचं राजकारण देखील ताजे आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान असावेत का? | ५३ टक्के लोकं म्हणाले 'नाही' - सर्व्हे
मोदी सरकारच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला तुम्ही किती स्टार द्याल? या प्रश्नावर ३६.४२ टक्के लोकांनी १ स्टार दिला आहे. म्हणजेच ३६.४२ टक्के लोक मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. १४.९३ टक्के लोकांनी २ स्टार दिलेत, १०.७८ टक्के लोकांनी ३ स्टार दिलेत. १४.३७ टक्के लोकांनी ४ स्टार दिलेत. तर २३.५० टक्के लोकांनी ५ स्टार देत मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात संभाजीराजे आणि भाजपमध्ये तीव्र मतभेद?
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेऊन राज्यभर दौरा करत असलेले कोल्हापूर राजघराण्याचे वारसदार संभाजीराजे भोसले नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच कोल्हापुरातील राजकीय समीकरणे पाहता ते आगामी लोकसभा लढवतील, तीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मराठा आरक्षणाच्या मुद््द्यावर संभाजीराजे सध्या महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. त्यांनी शरद पवार ते राज ठाकरे अशा सर्व राजकीय पक्षप्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत भाजपाला धक्का | कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांचा मनसेत प्रवेश
भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी मागील काही काळापासून पक्षाला राम राम ठोकून इतर पक्षात प्रवेशाचा सपाटा लावल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये भाजपाला सर्वाधिक राजकीय धक्के हे शिवसेना राष्ट्रवादीने दिल्याचं पाहायला मिळतंय. आता त्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भर टाकून भाजपाची चिंता वाढवली आहे. आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
आपत्तीत भाजप कार्यकर्ते मदतकार्यात अन विरोधक कॉरंटाईन, नेटीझन म्हणाला श्रीनिवास एकटाच भारी पडेल भाजपला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रामध्ये सत्तेत दुसऱ्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांच्यापासून सर्वच नेत्यांनी यासंदर्भात ट्विट करून मोदींची स्तुती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आर्थिक अधोगती, जगात नाचक्की, द्वेष, महागाई आणि बेरोजगारी | मोदी सगळ्यात अपयशी व नापास नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रामध्ये सत्तेत दुसऱ्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांच्यापासून सर्वच नेत्यांनी यासंदर्भात ट्विट करून मोदींची स्तुती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | दारूबंदी तो बहाणा है, 'मालपाणी निशाना है | रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
साडेसाती मधील ७ वर्षे सरलीयत | यशोमती ठाकूर यांचं खोचक ट्विट
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर विविध उपक्रमांचा कार्यक्रम राबवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्याच पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज - संजय राऊत
केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोदी सरकारच्या आजरवच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मोदी सरकारला आत्मचिंतानाची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. मोदी सरकारच्या आजवरच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मोदी सरकारला आत्मचिंतानाची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. देश काँग्रेसच्याच पुण्याईवर तरला आहे असं सांगताना राऊत यांनी मोदी सरकारला आणखी मेहनत घ्यायची गरज असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजितदादा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल - चंद्रकांत पाटील
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 18 महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही 18 महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले
4 वर्षांपूर्वी -
संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घेतला तर मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे - प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं हा एक मार्ग आहे. ही याचिका फेटाळल्यानंतर दुसरी याचिका करता येते. हा एक मार्ग आहे. पण सत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच राजसत्तेसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ममतांनी मोदींना ऑन कॅमेरा झापलं | म्हणाल्या, आमचा विजय झाला हे तुमच्या चिंतेचं कारण आहे का?
यास’ चक्रीवादळामुळे ओदिशात झालेल्या हानीचा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला, तेव्हा वरचेवर येणाऱ्या वादळांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन तोडगा काढण्याची व आपत्कालीन यंत्रणेची तरतूद करण्याची मागणी ओदिशा सरकारच्या वतीने करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
मंत्र्यांवर आरोप करायचे, मग राज्य सरकार काही करणार नाही असे भासवायचे, मग हायकोर्टामार्फत CBI चौकशीची मागणी करायची
नाशिकच्या परिवहन विभागातील निलंबित अधिकाऱ्यानं राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन जोरदार राजकारण पेटलं असताना आता खुद्द अनिल परब यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच्याविरोधात 'वन मेरिट वन नेशन' या संस्थेला भाजपने रसद पुरवली - अरविंद सावंत
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास एक वर्ष प्रयत्न करुनही संभाजीराजे छत्रपती यांना भेट दिली नाही. संभाजीराजेंची ही अवहेलना भारतीय जनता पक्षाच्या अंगाशी येणार आहे, असा थेट इशारा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिला. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
PM केअरचे वादग्रस्त वेंटिलेटर | मोदींना महागडा सूट देणारा याच कंपनीचा मालक | केंद्राकडून कोर्टात होतोय बचाव
देशभर वादग्रस्त ठरलेली “ती’ व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवलेली नाहीतच, असा धक्कादायक दावा केंद्र सरकारच्या वतीने औरंगाबाद खंडपीठापुढे सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत करण्यात आला. विशेष म्हणजे, या वादग्रस्त व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणाऱ्या आणि दुरुस्तीसाठी सहकार्य न करणाऱ्या राजकोट येथील ज्योती सीएनसी कंपनीची यात चूक नसून, ही “मॉडर्न’ व्हेंटिलेटर्स वापरण्याचे “प्रशिक्षण’ असलेले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी औरंगाबादमध्ये नसल्याचा युक्तिवाद करत केंद्र सरकारने कंपनीची पाठराखण केली.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र झोपेत असताना सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांतदादांनी जागे असताना केलं की झोपेत - अजित पवार
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 18 महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही 18 महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | भाजप नेते अजूनही केंद्राची भूमिका नाकारत आहेत? | काय म्हणाले दरेकर?
आजपर्यंत शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारने नेहमीच आपल्याकडची कुठलीही गोष्ट केंद्रावर ढकलायचेच काम केले. आताही मराठा आरक्षणासंदर्भात हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणत आहेत. हुकूमाची पानं त्यांच्या हातातच असतील तर मग तुमची गरजच काय, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | घटना दुरुस्ती करून मराठा समाजाच्या मागणीला संरक्षण द्यावे लागेल - दिलीप वळसे पाटील
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एखाद्या समाजाला मागासवर्गीय ठरवायचे असल्यास केंद्रीय मागसवर्गीय आयोगाची स्थापना होणे गरजेचे आहे. मात्र, त्याची घटना दुरुस्ती दिल्लीतच करावी लागेल. वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करून मराठा समाजाच्या मागणीला संरक्षण द्यावे लागेल, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाला दिलेल्या भेटी दरम्यान व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही संभाजीराजेंच्या भूमिकेशी सहमत | राज्यातील सर्व नेते भेटले आता मोदींनी भेट द्यायला हवी - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE