महत्वाच्या बातम्या
-
गौप्यस्फोट की राजकीय पुड्या? | रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत फडणवीसांना भेटायला तडफडत होते - निलेश राणे
शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान निलेश राणे लोकसभेत दोनवेळा रत्नागिरी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. मात्र याच मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्री, खासदार आणि आमदारांची मजबूत पकड असल्याने केवळ राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी असं ट्विट केल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | टूलकिट प्रकरणावरून भाजपची पोलखोल होताच दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलची ट्विटर कार्यालयावर धाड
देशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल झालं होतं. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील नेत्यांसहित राज्यातील भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | …तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईन, संभाजीराजे छत्रपती आक्रमक
राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशाराच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय. संभाजीराजे छत्रपती यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे राज्य दौऱ्यावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे तोडणारे कोकणात जाऊन झाडांची चिंता व्यक्त करत आहेत - आ. भाई जगताप
महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असताना राजकीय वर्तुळात अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सूरु आहेच. महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करत आहेत. जरा तपासून घ्या स्वत:ला’ अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांनी टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारचे प्रयत्न अपुरे, कामगार-मजुरांना योजनांचा लाभ मिळत नाही, आम्ही समाधानी नाही - सुप्रीम कोर्ट
देशातील कोरोनाची दुसरी लाट हळुहळू कमी होताना दिसत आहे. देशात रविवारी 2 लाख 22 हजार 704 नवीन संक्रमित आढळले. हा आकडा मागील 38 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 15 एप्रिलला 2.16 संक्रमितांची नोंद झाली आहे. तर, रविवारी 4,452 संक्रमितांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3 लाख 2 हजार 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
छत्रपती संभाजीराजेंच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे - काँग्रेस
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी संभाजीराजेंना भेटले का नाही यावर देखील पाटील पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
अजब | राज्य सरकार देत असलेल्या मोफत लसीवर मुंबई भाजपची लोकांना 'मोफत लस ऑफर'
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून महाविकास आघाडी सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला होता. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय २८ एप्रिलला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी अदाणींना श्रीमंत तर भारतीयांना गरीब बनवण्यासाठीच ७ वर्ष प्रतिदिन १८ तास काम करत होते - काँग्रेस
अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 33 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. म्हणजेच जवळपास 100% वाढ झाली. आशियात पहिल्या क्रमांकावर रिलायन्सचे मुकेश अंबानी आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 76.5 अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या बिलिनेयर इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींना काय वाटतं ते संभाजीराजेंना नव्हे तर चंद्रकांतदादांना कळवलं होतं? का भेट दिली नाही त्यावर अजब प्रतिक्रिया
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनासंबंधित सर्वोत्तम नियोजन | उद्धव ठाकरेच देशात Best CM | एकूण मतांपैकी ६२.५ % मतं मिळाली
मागील दीड-दोन महिन्यांपासून कोरोना संकटाशी दोन हात करणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी जून महिना आनंदाची झुळूक घेऊन येणारा ठरणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव घटताना दिसतो आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा अाकडाही कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे संकेत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्याने केल्याने उपाय योजनांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
२०२२ मधील यूपीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये चिंता | मोदी-शहा आणि RSS दरम्यान गुप्त बैठका
सध्या कोरोना आपत्तीमुळे देशात चिंतेचं वातावरण असलं तरी देखील उत्तर प्रदेशात अत्यंत भीषण परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना आपत्तीमुळे उत्तर प्रदेशात हाहाकार मजल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत आणि कोरोना आपत्ती २०२२ पर्यंत लांबणार असेच संकेत मिळत आहेत. परिणामी भाजप आणि आरएसएस’मध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातचे अकार्यक्षम मॉडेल देशापुढे उघड झालंय | भाजपशासित राज्यातच मोदी मॉडेलचा फज्जा उडाला
भारतातील भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्येच ‘मोदी मॉडेल’चा फज्जा उडाला असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय पॅनल प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे. “२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ज्या ‘गुजरात मॉडेल’ चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली, त्याच गुजरातमधे कोरोनाची दूसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल तिथल्या स्थानिक प्रसारमाध्यमांनीच वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाडे काढले आहे.
4 वर्षांपूर्वी -
एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी | राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र
काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. रोज काही ना काही ट्विट करून त्यांनी मोदी सरकार विरोधात एक प्रकारचे ट्विटर वॉरच सुरू केलं आहे. आजही त्यांनी नवं ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीकेचे बाण सोडत असल्याने सत्ताधारी भाजपाही त्याला प्रत्युत्तर देत आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान अहंकारी असल्याचा अप्रत्यक्ष टोला हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपाल सचिवालयाकडे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची यादीच नाही | RTI'ने धक्कादायक माहिती
मागील अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. दरम्यान यावरून महाविकास आघाडीने सातत्याने राज्यपाल व भाजपला यामुळे घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
प.बंगाल | तृणमूल सोडून भाजपात गेलेले नेते काही दिवसातच भाजपाला कंटाळले | ममतांना पत्र
प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आटोपून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं असलं, तरी राजकीय घडामोडींचा सपाट सुरूच आहे. तब्बल चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र लिहिलं आहे. “भारतीय जनता पक्षात प्रवेश करून चूक केली, दिदीशिवाय राहू शकत नाही,” असं म्हणत घरवापसी करून घेण्याची विनवणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | अँड ऑस्कर गोज टू | मोदींची चित्रपट क्षेत्रातूनही फिरकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरातील जिल्हाधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्सं यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधत आहेत. याच एक भाग म्हणून मोदींनी शुक्रवारी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. यावेळी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांच्या डोक्यात काय आहे तेच माहीत होत नाही – गुलाबराव पाटील
मागील अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. दरम्यान यावरून महाविकास आघाडीने सातत्याने राज्यपाल व भाजपला यामुळे घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजब | केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी या मागणीवरूनही राष्ट्रपती राजवटीची मागणी
तौते चक्रीवादळाच्या तडाख्याने कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी १० वर्षे तरी मी पुन्हा येईनची स्वप्ने पाहू नयेत - हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पुढील दहा वर्षे तरी पाहू नयेत,असा सल्ला दिला आहे.ते पुढील साडेतीन वर्ष नव्हे तर १० वर्षात देखील महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू शकणार नाहीत असा टोला लगावून, महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने फडणवीस यांची गोव्यात जास्त आवश्यकता आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदींना अखेर वाराणसी आठवली आणि अश्रू अनावर? लाखो लोकं मरत असताना निवडणुकीत होते मग्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काशी म्हणजे वाराणसीतील डॉक्टर्स आणि फ्रॉन्टलाईन वर्कर्ससोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीला काशीतील डॉक्टर्स आणि फ्रॉन्टलाईन वर्कर्स यांनी उपस्थिती लावली होती आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC