महत्वाच्या बातम्या
-
Gulabrao Patil | ED ब्रह्मास्त्र वारंवार वापरू नये, अन्यथा पुराणकालातील ब्रम्हास्त्राप्रमाणेच बोथट होईल - गुलाबराव पाटील
ईडीकडून होत असलेल्या कारवायांवर जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आज ईडीचा वापर होत आहे. मात्र ब्रह्मास्त्र हे वारंवार वापरता कामा नये याचे पुराणकालापासून दाखले आहेत. याच प्रमाणे ईडचे ब्रह्मास्त्र वापरले की, ते बोथट होणारच, अशा शब्दात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) टोला लगावला.
3 वर्षांपूर्वी -
ज्याचा बाप मास्तर होता त्याची मालमत्ता १२०० कोटी | मी BHR ठेवीदारांचा प्रश्न उचलला म्हणून ED चौकशी - खडसे
ईडीच्या कारवाईवरून एकनाथराव खडसे यांनी घणाघात टीका केली आहे. ज्याचा बाप ‘मास्तर’ होता त्यानं हजार बाराशे कोटीची मालमत्ता जमवली त्यांची चौकशी होतं नाही आणि मी बीएचआरच्या ठेवीदारांचा प्रश्न उचलला म्हणून मला ‘ईडी’ माध्यमातून नाहक त्रास दिला जात असल्याचा घणाघात खडसे यांनी केला.
3 वर्षांपूर्वी -
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखविणाऱ्या विश्वास नांगरे-पाटील यांना सोमैय्या माफिया म्हणाले
मुंबईवर झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला हा आपल्या देशासाठी एक वाईट आठवण आहे. पण याच हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांनी दाखवलेले शौर्य आणि स्वतःचे प्राण धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड याचे मोल ठरवणेही शक्य नाही. दहशतवाद्यांनी हल्ला करून जेव्हा काही दहशतवादी ताज हॉटेलमध्ये घुसले तेव्हा त्याठिकाणी अनेक लोक होते. त्या सर्वांचे प्राण धोक्यात होते. त्यांना वाचवण्यासाठी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे कशाचीही पर्वा न करता केवळ एका बॉडीगार्डसह ताजमध्ये घुसले.
3 वर्षांपूर्वी -
MP Bhavana Gawali | भावना गवळी वर्षावरून मुख्यमंत्र्यांची भेट न होताच परतावे लागले
ईडीच्या नोटिशीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी म्हणून भावना गवळी (MP Bhavana Gawali) मुंबईला वर्षावर गेल्या. त्यांना एक तास प्रतिक्षा करावी लागली पण अखेर मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. या भेटीविनाच त्यांनामाघारी परतावे लागले असे समजते
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh Missing? | परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर पत्रकार परिषदा अन फरार होण्यावर फडणवीसांची धावती प्रतिक्रिया
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह नेमके कुठे आहेत? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंह यांना देशाबाहेर (Parambir Singh Missing) जाण्यासाठी केंद्रानं मदत केल्याची भूमिका नाना पटोलेंनी मांडल्यानंतर त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sharad Shatnam Health Scheme | शरद शतम: योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य चाचणी - धनंजय मुंडे
शरद पवार यांच्या नावानं राज्यातील वृद्धांसाठी आरोग्य योजना प्रस्तावित आहे. लवकरच तसा प्रस्ताव राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, अशी घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. वयाची साठी ओलांडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना विविध आजार बळावतात. त्यासाठी त्यांना वेळोवेळी तपासणी करण्याची गरज असते. या सगळ्यांसाठी हजारो रुपयांची आवश्यकता असते. मात्र अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयात जाणं त्यांना शक्य होत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh Missing? | परमबीर सिंग भारत सोडून पळाले असतील तर त्यात निश्चितच भाजपची भूमिका असणार - काँग्रेस
एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Missing) यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Deglur Biloli Bypoll | देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडे उमेदवार नाही | भाजप शिवसेना नेत्या भरोसे?
काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे (Deglur Biloli Bypoll) आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथील राजकारण तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Chipi Airport Inauguration | चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर राणे ३ नंबरला | विनायक राऊत म्हणाले..
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण (Chipi Airport Inauguration) पत्रिकेवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे नाराज असल्याचं वृत्त आहे. निमंत्रण पत्रिकेवर नारायण राणे यांचं नाव तीन नंबरला आहे. यामध्ये राजकारण झाल्याच्या राणेंचा सूर आहे. यावरुनच शिवसेनेने राणेंवर निशाणा साधलाय. शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण पत्रिका तयार केलीय. तीन नंबरच्या स्थानावरून रणकंदन करतील तर त्याचं ते अज्ञान आहे. त्यांनी चांगला गुरु ठेवावा, चांगले मागदर्शन घ्यावं”, असा निशाणा खासदार विनायक राऊत यांनी साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gujarat Fake Development | गुजरातच्या भाजप खासदाराने गुजरातचा विकास दाखवताना न्यूझीलंडचे फोटो शेअर केले
गुजरातचे पोरबंदर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे खासदार रमेशभाई धाडुक यांनी काल (30 सप्टेंबर) रोजी एक इन्फोग्राफिक ट्विट केली. इन्फोग्राफिकमध्ये चकाचक रस्ते आणि फ्लायओव्हर तसेच दिव्यांची रोषणाई असल्याचं दिसत होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, ‘राष्ट्रीय महामार्ग -२, उमवाडा चौकडी, रामनाथ धाम गोंडल जवळच्या रस्त्यावर अंधार असल्याने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे उंच दिव्यांचा टॉवर उभारण्याचा प्रस्ताव दिला होता.
3 वर्षांपूर्वी -
Dipesh Mhatre Vs Raju Patil | मनसे हाच खड्ड्यात गेलेला पक्ष, त्यांनी खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये - दीपेश म्हात्रे
राजू पाटील यांनी काल मलंगगड रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि पालिकेवर जोरदार टीका (Dipesh Mhatre Vs Raju Patil) केली होती. कल्याण-डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्याबाबत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर 114 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च केल्याचं दिसतंय का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. खड्डय़ाचे सोडा पालिकेतील अधिकारी बिले काढण्यासाठी 2 टक्के घेतात.
3 वर्षांपूर्वी -
Bhartiya Jai Hind Party | भ्रष्टाचार बाहेर काढायचे असतील तर दिल्लीला जाऊन गुजरातच्या भाजपा नेत्यांचे काढा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखाना आणि पाटबंधारे खात्यात होत असलेल्या तथाकथित भ्रष्टाचाराबद्दल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जय हिंद पार्टी (Bhartiya Jai Hind Party) तर्फे ठाण्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आला होता.
3 वर्षांपूर्वी -
Amrinder Singh Plan | अमरिंदर सिंग भाजप प्रवेश करणार नाहीत | पण भाजप पुरस्कृत 'या' योजनेवर काम करणार
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तत्पूर्वी ते भाजपमध्ये सामिल होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, अशी शक्यता फार कमी आहे. कॅप्टन थेट भाजपमध्ये सामिल (Amrinder Singh Plan) होणार नाहीत. भाजपमध्ये जाण्याची कॅप्टन यांची इच्छा नाही. मग, काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये न जाता पंजाब कसे साधणार हाच कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मास्टर प्लॅन आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jalyukt Shivar Abhiyan | जलतज्ज्ञ म्हणाले जलयुक्त शिवार’मुळे मराठवाड्यात महापूर | भाजपने जलतज्ज्ञांना मनोरुग्ण म्हटलं
पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. राज्यात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. त्यानंतर गुलाब चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. गावं जलमय झाली आहे. नद्यांनी पात्रं सोडली आहेत. धरणं भरली आहेत. नाले ओसंडून वाहत आहेत. मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. आता मराठवाड्यातील महापुरावरुन जलतज्ज्ञांनी फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार अभियानावरून (Jalyukt Shivar Abhiyan) अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महापुराची अनेक कारणं पर्यावरण अभ्यासकांनी मांडली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
BMC Road Potholes | ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का? - संदीप देशपांडे
राज्यभरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन आता राजकीय पक्ष आक्रमक झाल्याचं दिसतंय. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खड्ड्यांच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक बोलावली होती. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही खड्ड्यांबाबत आपली भूमिका मांडली आहे. अमित ठाकरे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी (BMC Road Potholes) राज्य सरकार, महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाला जबाबदार धरत टीका केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Border Khatre Me Hai | घरात घुसून मारणारे मोदी आता स्वत: घरात घुसले आहेत | चिनी घुसखोरांना क्लीन चिट - काँग्रेसचं टीकास्त्र
सीमेच्या वादासंदर्भात चीन आपल्या कृत्यांना रोखताना दिसत नाही. एकीकडे चीन चर्चेतून वाद मिटवण्याविषयी बोलतो, दुसरीकडे तो घुसखोरी सोडत नाही. ताजी घटना उत्तराखंडच्या बाराहोटी (Border Khatre Me Hai) सेक्टरच्या सीमेवरील आहे, जिथे 100 चीनी सैनिकांनी गेल्या महिन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) ओलांडली होती. ही माहिती आता समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Raj Thackeray | पंचनामे होत राहतील, त्याआधी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा | राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तर अनेक भागात चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
MLA Ravi Rana | आ. रवी राणांविरुद्धच्या कलम १०-ए अंतर्गत कारवाईचे काय झाले? | हायकोर्टाची निवडणूक आयोगाला विचारणा
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेच्या बाहेर खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कारवाईचे काय झाले? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे, तसेच यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून दोन आठवडे वेळ वाढवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
ED'च्या रडारवरील अमरिंदर यांचे पुत्र आणि समर्थक 26 आमदारांना गुजरात वॉशिंग पावडरने स्वच्छ करण्याची तयारी सुरु?
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सांगितले जात आहे, की अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
भेट झाली | अमरिंदर सिंग यांना थेट राज्यसभेवर पाठवून महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी मिळण्याची शक्यता
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सांगितले जात आहे, की अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH