महत्वाच्या बातम्या
-
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक | भगीरथ भालकेंचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे - जयंत पाटील
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचाराचा आज रांजणी, पंढरपूर येथे शुभारंभ करण्यात आला. भगीरथ यांंना विजयी करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघाने मेहनत घेत आहे. मला खात्री आहे की रात्रीचा दिवस करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा विजय मिळवेल,असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन की कडक निर्बंध? | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची फोन पे चर्चा
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय.अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातही कोरोनाचा प्रसार झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली.रश्मी ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे.यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंच्या तब्येतीबद्दल चौकशी केली आहे. तसेच राज्यातील वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
परिस्थतीमुळे लॉकडाऊन निर्णय झाल्यास सहकार्य करावं | मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रात समोर येत असल्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांनी बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन की कडक निर्बंध? | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
राज्यात कोरोना रुग्णांनाचा स्फोट झाला आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात समोर येत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा घट्ट होत असणारा विळखा पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे यामध्ये आता कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा, माध्यमांची भूमिका महत्वाची - मुख्यमंत्री
राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात ४७ हजार ८२७ नवीन करोनाबाधित आढळले असून, २०२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९१ टक्के एवढा आहे.
4 वर्षांपूर्वी -
शालिनी ठाकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक | हॅकरने अश्लील व्हिडिओ स्टेटस ठेवलं
मनसेच्या सरचिटणीस शालिनी शालिनी ठाकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे हॅकरने त्यांच्या अकाउंटवर पॉर्न व्हिडिओ स्टेटस ठेवल्याने अनेकांना धक्का बसला आहे. स्वतः शालिनी ठाकरे यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वतःविरुद्धच्या न्यायालयातील दाव्याला देखील किरीट सोमैय्या यांनी 'वसुली' संबोधलं
सध्या सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA आणि राज्य ATS करत आहेत. त्यासंबंधित विषय न्यायालयात देखील असून त्याबाबतीत पुरावे गोळा करण्याचं देखील काम चौकशी यंत्रणांकडून सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणात ज्या आर्थिक घडामोडी समोर आल्या आहेत त्याचा देखील तपास अजून सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी पंढपुरात लोटसचं ऑपरेशन करणार | किंगमेकर कल्याणराव काळे राष्ट्रवादीसाठी मैदानात?
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत अनेकांनी बंडाचे निशाण फडकवल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार असला तरी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सध्या ते कोणत्याच पक्षांच्या बैठकीला उपस्थित रहात नव्हते. काळे अद्यापही तटस्थ असल्याने ते कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. एकंदरीतच या निवडणुकीत कल्याणराव काळे हे ‘किंगमेकर’ ठरणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स तरीही ते जवाबदारीने...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. ते म्हणाले की, “बंगाल, आसाम अशा आणखी काही राज्यात निवडणूका आहेत तिथे कोरोना वाढत नाही का? तर मी त्यांना सांगू इच्छितो की मला तिथे काय सुरू आहे त्याबद्दल बोलायचं नाही
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही - देवेंद्र फडणवीस
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला होता.
4 वर्षांपूर्वी -
भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीनचं प्रकरण | अमित शहांची प्रतिक्रिया
काल निवडणूक आयोगाची गाडी बंद पडल्याने भाजप उमेदवाराच्या गाडीतून इव्हीएम मशीन नेल्याचा प्रकार आसाममध्ये घडला होता. यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला आहे. यानंतर वाद निर्माण झाला असून रातबारी मतदारसंघातील मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी चार अधिकारी निलंबितदेखील करण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते इंडिया टुडेशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या मास्कवरील टीकेला मनसे Facebook LIVE वरून प्रतिउत्तर देणार
राज्यातील कोरोनस्थिती बिकट होत चालली आहे. दिवसेंदिवस खळवणाऱ्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “मास्क न वापरण्यात काय शौर्य आहे?”, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील फरक कळतो? पॅकेज निमित्ताने भलतेच सल्ले
सध्या देशभरात कोरोनामुळे चिंता वाढताना दिसत आहे. मात्र परदेशात भारतापेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं दिसत आहे. परिणामी मागील अनुभव पाहता तिथल्या देशातील सरकारने लॉकडाउन करण्यापूर्वी सामान्यांच्या दृष्टीने आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. एका बाजूला अशी स्थिती असताना स्वतःला अभ्यासू नेते म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील नेते देखील सल्ले देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. फडणवीसांनी देखील तसाच सल्ला महाराष्ट्र सरकारला दिला आहे. मात्र फडणवीसांना सल्ला आठवला तेव्हा त्यांना देशातील सरकार आणि राज्य सरकार यातील फरक समजला नसल्याची टीका सुरु झाली आहे. कारण जो सल्ला त्यांनी मोदी सरकारला द्यायला हवा होता तो ते राज्य सरकारला देताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबतही कोत्या मनाचे राजकारण केले - नारायण राणे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
तामिळनाडू | DMK'च्या अनेक उमेदवारांचे थेट मोदींना आव्हान | माझ्या विरोधात प्रचाराला या
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. द्रमुकचे नेते आणि माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही DMK चा आत्मविश्वास दुणावल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाची गाडी खराब | भाजपाची नियत खराब | लोकशाहीची अवस्था खराब - राहुल गांधी
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी भरभरून मतदान झाले. पश्चिाम बंगालमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८०.४३ टक्के तर आसामच्या ३९ जागांसाठी ७४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नंदिग्राममध्ये मतदान झाले असून, ममता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी या दोघांनीही विजयाचा दावा केला. बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या.
4 वर्षांपूर्वी -
भाजप आमदाराच्या गाडीत EVM मशीन सापडली | निवडणूक आयोग भाजपला मदत करतंय का? - अतुल लोंढे
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी भरभरून मतदान झाले. पश्चिाम बंगालमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८०.४३ टक्के तर आसामच्या ३९ जागांसाठी ७४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नंदिग्राममध्ये मतदान झाले असून, ममता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी या दोघांनीही विजयाचा दावा केला. बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमध्ये लोटसचं ऑपरेशन | भाजपचे माजी आमदार नितीन पाटील शिवसेनेत
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून इतर सर्वच पक्षातील नेतेमंडळी राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तत्कालीन मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ केल्याचा शेरा मारून फाईल सरकवायचे पराक्रमी मंत्री - सविस्तर
सध्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांवर पदाच्या गैरवापर केल्याचा आरोप भाजपकडून करणं सुरु आहे. मात्र भाजपमधील म्हणजे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे पराक्रम देखील मोठे आहेत ज्याचा अनेकांना विसर पडला असावा. तत्कालीन फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना नेमकं का हटविण्यात आलं होतं, याचं कोणताही स्पष्टीकरण तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी अद्यापही दिलेलं नाही.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? | पवारांची अहमदाबादला भेट? | जयंत पाटील यांचं उत्तर
राज्यात सध्या अनेक विषयांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असं वृत्त समोर आलं आणि महाराष्ट्रात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली. अर्थात राष्ट्रवादीने ही भेट झाली नसल्याचे म्हटले असले तरी चर्चा या सुरुच आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार उसळी, मजबूत खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL