महत्वाच्या बातम्या
-
ईशान्य मुंबई लोकसभा: भाजपकडून किरीट सोमैयांऐवजी मनोज कोटक यांचा विचार सुरु?
ईशान्य मुंबईमधून भाजपचा अधिकृत उमेदवार कोण हे अजून गुलदस्त्यात आहे आणि त्यात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विद्यमान खासदार किरीट सोमैया यांना तीव्र विरोध असल्याने भाजपकडून मुलुंडमधील स्थानिक नगरसेवक मनोज कोटक यांचा देखील गांभीर्याने विचार केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यात आधीच मुलुंड’मध्ये भाजपचे अनेक गट असल्याने किरीट सोमैया यांना अंतर्गत देखील विरोध असल्याचं समजतं.
6 वर्षांपूर्वी -
भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांना २४ लाखांचा दंड, न्यायालयात माफीनामा देण्याची वेळ
अंधेरी पूर्व येथील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांना मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. अंधेरी पूर्व येथे बेकायदा होर्डिंग लावल्या प्रकरणी तसेच पालिका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्या प्रकरणी न्यायालयाने ही कडक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे ही मुंबई पालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: मोदी'लाटे पुर्वी विधानपरिषदेसाठी कृष्णकुंजचे उंबरठे झिजवले, आज आव्हान?
रंग शारदामध्ये नेहमी नाटकाचे प्रयोग होतात तसाच १ नाटकाचा प्रयोग काल झाला आणि तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेला पदाधिकारी मेळावा अशी टीका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. पुढे ते असेही म्हणाले मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख बारामतीचा पोपट असा केला होता आणि ते अधोरेखित करणारे त्यांचे आजचे भाषण होते.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी लोकांना मूर्ख समजणे बंद करा: प्रियंका गांधी
काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पलटवार केला आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मूर्ख समजणे बंद करावे, मागील ५ वर्षांमध्ये मोदी सरकारने भारतातील घटनात्मक संस्थांवर हल्ला केला, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवण्यासाठी प्रचार करा, असे आदेश काल दिल्यानंतर आज लगेचच मनसेप्रमुखराज ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. राज ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज ठाकरे आणि शरद पवार यांची गेल्या काही महिन्यांपासूनची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल २६ वर्षानंतर अनिल गोटे-शरद पवार भेट
भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्बल २६ वर्षांनंतर भेट घेतली आहे. एकमेकांचे कायम टीकाकार राहिलेल्या गोटे-पवार भेटीने राजकीय वर्तुळात मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सुभाष भामरेंचा पराभव करण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतली आहे, अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ७ उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या यादीत यात महाराष्ट्रातील एकूण ७ उमेदवारांचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड तर यवतमाळमधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना संधी देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'चाय संपली' आता 'चौकीदार से चर्चा', मोदी साधणार २५ लाख चौकीदारांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील तब्बल पंचवीस लाख चौकीदारांशी चर्चा म्हणजे संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ४:३० वाजता मोदी ऑडिओच्या माध्यमातून चौकीदारांशी संवाद साधतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ‘मैं भी चौकीदार’ कॅम्पेन सुरू केलं आहे. होळीच्या पूर्वसंध्येला मोदी चौकीदारांशी साधत असलेला संवाद याच कॅम्पेनचा भाग असेल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाला अरुणाचल प्रदेशात जोरदार धक्का, ८ आमदारांचा पक्षाला रामराम
लोकसभा निवडणुकीपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला हादरा बसला असून पक्षातील तब्बल आठ आमदारांनी नॅशनल पीपल्स पार्टीत प्रवेश केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार असून भाजपाला सोडचिठ्ठी देण्याऱ्यांमध्ये दोन मंत्र्यांचा देखील समावेश आहे. भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुलीच्या विनयभंगाच गांभीर्य नाही, सेनेला भाजपची मैत्री महत्वाची? भाजपचा उल्लेख टाळून मनसेवर पूर्ण बातमी
काल भाजपचे विक्रोळीचे नेते आणि महापालिकेचे नगरसेवक पदाचे उमेदवार मंगेश सांगळे यांनी चालू गाडीमध्ये एका परिचयातील १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार ऐरोलीमध्ये घडला आहे. सदर प्रकरणी रबाळे पोलिसांनी सांगळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून ते पुढील तपास करीत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सोलापुरात मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर?
लोकसभा मतदारसंघ माढा इथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. परंतु, त्यातदेखील माढ्याच्या जागेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. माढ्याची उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळे मोहिते पाटील प्रचंड नाराज आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पेड सर्व्हे? लोकसंख्या १३० कोटी आणि १६,९३१ लोकांनी देशाचा ओपिनियन पोल ठरवला?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हवानिर्मितीसाठी पुन्हा पेड सव्हेने तोंडावर वर काढल्याचे दिसत आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का? असे मथळे छापून आणि प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांसाठीच हे केलं जात आहे केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
6 वर्षांपूर्वी -
पादचारी पूल दुर्घटना; स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई अटकेत
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून काही अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ६ जण मृत्युमुखी पडले, तर तब्बल ३१ जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेलस स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांच्या २ मालमत्ता जप्त
तीन मोठ्या सरकारी बँकांचे तब्बल ६८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्याने लोकसभेचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे व्यवसायाने विकासक असलेले चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता बँकांनी जप्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत झालेली राजकीय खलबतं, दीर्घ चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काल रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबई: उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक आरोप करणाऱ्या किरीट सोमैयांची उमेदवारी अडचणीत?
लोकसभा निवडणूक घोषित झाल्या आणि ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. तसेच त्यांच्या नावासोबत आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केल्याने सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का? रामदास आठवले
प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली असून त्यांच्या सभांना जनतेकडून मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. परंतु, सभेत होणाऱ्या या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रयागराज येथे प्रियांका गांधींकडून हनुमान मंदिरात पूजन, गंगा यात्रेला सुरुवात
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, कुंभ मेळ्यात भाजपचच्या देशभरातील नेत्यांनी आणि स्वतः मोदींनी गंगा स्नान केले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशात महत्वाची जवाबदारी देण्यात आलेल्या प्रियांका गांधी यांनी देखील आज गंगा दर्शनाला आल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पर्रिकर यांना मुखअग्नी मिळण्यापूर्वीच भाजपच्या रात्रभर नितीन गडकरींच्या उपस्थितीत बैठका
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारसमोर पुन्हा एकदा राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्याचं राजकीय संकट उभं राहिलं आहे. पर्रिकरांच्या जागेवर नवीन नेता निवडण्याचं आव्हान भाजसमोर निर्माण झालं आहे. कारण काँग्रेस पक्षानं राज्यपालांना पत्राद्वारे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपचे चौकीदार मंगेश सांगळेंकडून १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग, गंभीर गुन्हा दाखल
माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा गंभीर असल्याने अटक होण्याच्या भीतीने मंगेश सांगळे हे बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC