महत्वाच्या बातम्या
-
ना भेट, ना शब्द, उद्धव ठाकरे किती असंवेदनशील आहेत ते आज मुंबईकरांनी पाहिलं
मुंबई : मुंबई महापालिका ते दिल्लीत खुर्च्या उबवणाऱ्या शिवसेना नेत्यांची तसेच उद्धव ठाकरे यांची मुंबई शहर आणि मुंबईकरांप्रती असलेली असंवेदनशीलता आज अधोरेखित झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील पादचारी पूल काल रात्री कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले आणि जखमी देखील झाले. परंतु, मुंबई महापालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी चकार शब्द देखील काढला नाही, ना जागेची पाहणी केली, ना मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, ना जखमी झालेल्यांची विचारपूस केली.
6 वर्षांपूर्वी -
टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली, त्या पुलाची जबाबदारी आमची होती
महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटने नंतर शिवसेना प्रणित मुंबई महानगर पालिका आणि रेल्वे मध्ये चांगलीच टोलवाटोलवी रंगली. सुरुवातीला तर दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवत आपली जबाबदारी सपशेल झटकली.
6 वर्षांपूर्वी -
रेल्वे आणि मुंबई महापालिके विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम 304 एअंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू तर 31 जखमी - मुंबईकरांचा जीव झाला स्वस्त
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला जोडून असलेला पादचारी पूल गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास कोसळला आणि या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा हिमालया पादचारी पूल कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
नेहरुंमुळेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात अपयश: भाजप
पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये आज चौथ्यांदा चीनने खोडा घातला. युनोमध्ये चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. चीनच्या या निर्णयामुळे मसूदला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी भारताने केलेली मोर्चेबांधणी अयशस्वी ठरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: तुलसी जोशींचा कॉल आणि मराठी माणसाचं 'मॅटर सॉल', बांधकाम व्यवसायिकाने धनादेश दिले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलत नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. त्यापैकीच अजून दोन मदतीची प्रकरण मुंबईतील कुटुंबातून समोर आली आहेत. कारण या मराठी कुटुंबाने कष्टाचा पैसे स्वतःचे घर घेण्याच्या उद्देशाने एका बांधकाम प्रकल्पात गुंतवले होते.
6 वर्षांपूर्वी -
युवा स्वाभिमान पार्टीकडून नवनीत कौर राणांचा जोरात प्रचार
लोकसभा निवडणुकांच्या तारखा आणि आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अनेक पक्ष जोरदारपणे कामाला लागले आहेत. त्याअनुषंगाने अमरावतीच्या लोकसभा आखाड्यात सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणांचा लोकसभेच्या निमित्ताने जोरदार प्रचार सुरु असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी व उद्धव ठाकरे यांचं एकाच व्यासपीठावर मनोमिलन होणार
लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात तब्बल २५ जाहीर सभा होणार आहे. त्यापैकीच ही एक जाहीर संयुक्त सभा असणार आहे. महाराष्ट्र चार टप्प्यांत मतदान होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
योगी ते फडणवीस, कमळावर देखील घराणेशाहीच्याच पाकळ्या
सध्या लोकसभेच्या अनुषंगाने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करत असून भाजप त्यातला नाही असं भासवत आहे. परंतु, भाजपची सध्याची कुंडली तपासल्यास ते इतर पक्षांच्या तुलनेत काही कमी नाहीत असंच चित्र आहे. त्यामुळे घराणेशाही या विषयावर भाजपने न बोललेलं बरं, असा सूर विरोधकांनी लावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानी शरीफ माणसांच्या भेटी, गुजरातमधील झोकाळे आणि फसलेली परराष्ट्रनीती?
युनो’मध्ये घडलेल्या घडामोडीने आज नरेंद्र मोदींची परराष्ट्रनीती किती फसवी होती याचा प्रत्यय करून दिला आहे. २०१४ नंतर राष्ट्रीय प्रतिमा तयार होण्याआधीच स्वतःला आंतराष्ट्रीय स्तरावर मोठं करण्यासाठी परदेशात देखील अनेक इव्हेंट शिस्तबद्ध आयोजित करण्यात आले आले. त्यात अनेक निर्णय आकस्मितपणे घेतले गेले आणि त्यात प्रमुख म्हणजे पाकिस्तानमधील नवाज शरीफ यांची आकस्मित भेट. कारण २०१४ पासून ‘मोदींचा मास्टरस्ट्रोक’ नावाच्या ठळक हेडलाईन म्हणजे सध्याच्या पेड प्रसार माध्यमांना जडलेला आजारंच म्हणावा लागेल.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक आचारसंहितेचा भंग? एसटी बसेस भाजपच्या जाहिराती गावभर फिरवत आहेत
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊन तब्बल ७२ तास उलटल्यानंतरही राज्यातील एसटी बसेसवरील सरकारी जाहिरातींची पोस्टर्स कायम असल्याचे स्पष्ट पणे निदर्शनास येते आहे. सदर विषयाला अनुसरून मुंबई शहराच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाला विचारणा करताच एसटी महामंडळाला याबाबतच्या सूचना केल्याची माहिती देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
मसूद अजहरला युनोत जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनचा सुरुंग
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं पुन्हा एकदा सुरुंग लावला आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. परंतु चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.
6 वर्षांपूर्वी -
अजब! २५० दहशतवादी मारल्याचा आकडा मी सर्वसामान्यांमध्ये रंगलेल्या चर्चेतून दिला: अमित शहा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये २५० दहशतवादी ठार झाल्याचा दावा एका सभेत केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांवर जोरदार टीकास्त्र सोडल होतं, तसेच २५०चा नेमका आकडा अमित शहा यांनी कोणत्या आधारावर दिला, असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता, त्यावर अखेर अमित शहा यांनी मौन सोडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला
मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला
6 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा; माजी खासदार निलेश राणे राष्ट्रवादीकडून लढणार?
सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा काँग्रेसने एनसीपीला द्यावी आणि एनसीपीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी, असा नवीन प्रस्ताव समोर आला आहे. सदर जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडली तर जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावी, असा देखील प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधींच पहिलं ट्वीट; ‘हा’ दिला संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून मंगळवारी कार्यकारिणीची बैठक व जाहीर सभा घेऊन काँग्रेसने लोकसभा निवडणुकांचे जोरदार रणशिंग फुंकले. काँग्रेसच्या गुजरातमधील जाहीर सभेला बऱ्याच वर्षांनी इतकी प्रचंड गर्दी झाली होती. गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधी यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. प्रियंका गांधी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्येच ट्विटर अकाऊंट सुरू केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: पीएनबी महा-घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला मोदी 'मेहुलभाई' म्हणाले होते
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ नोव्हेंबर २०१५ रोजी तीन सुवर्ण योजनांचे उदघाटन करण्यात आले. सुवर्ण रोखे, सुवर्ण ठेव आणि सोन्याची नाणी अशा योजनांतून देशात पडून राहिलेले सोने चलनात आणण्याचा या योजनांमागील उद्देश होता. या योजनांच्या उद्घाटनाप्रसंगी नरेंद्र मोदींनी भाषण केले होते. या कार्यक्रमात गीतांजली जेम्सचा अध्यक्ष आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी हा देखील उपस्थित होता. ज्वेलरी क्षेत्रातील मोठे व्यापारी तसेच रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. २०१५ मध्ये नीरव मोदीचा घोटाळा उघड झाला नव्हता आणि त्यावेळी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही आघाडीचे हिरे व्यापारी होते. मोदींचा जो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे तो याच कार्यक्रमातील आहे. या भाषणात मोदींनी मेहुल चोक्सीचा उल्लेख मेहुल भाई असा केला होता.
6 वर्षांपूर्वी -
फेसबुकला भाजपा आमदाराच्या अकाऊंटवरून अभिनंदन यांचे पोस्टर हटवण्याचे आदेश
केंद्रीय निवडणूक आयोगाने समाज माध्यमांवर विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र असलेले पोस्टर शेअर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला दणका दिला आहे. दिल्लीतील भाजपा आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी फेसबुकवर शेअर केलेले २ पोस्टर हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने फेसबुकला दिले आहे. या दोन्ही पोस्टरवर अभिनंदन यांचे छायाचित्र होते.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेला तब्बल ५० हजार कोटी उधळले जाणार, तर समाज माध्यमांवर ५,००० कोटी
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात २ महिने ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडतील हे निश्चित झाले आहे. दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या (CMS) अहवालानुसार भारतातील ही निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात खर्चिक निवडणूक ठरणार आहे. भारतातील निवडणुकीवर यंदा तब्बल ५० हजार कोटी रुपये (७ अब्ज डॉलर) इतका प्रचंड खर्च होण्याची शक्यता असून अमेरिकेतील निवडणुकीवर २०१६ साली ६.५ अब्ज डॉलर खर्च झाले होते. तर भारतात २०१४ साली निवडणुकीवर पाच अब्ज डॉलर खर्च झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचार गांभीर्याने सुरू असल्याच्या चर्चेस उधाण आले होते. ते आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये छापून आले मात्र या वृत्ताचे खंडन करत आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नसल्याने मातोश्रीवरून स्पष्ट करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC