8 September 2024 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

भारतात निवडणुकीचा काळ, त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा अशा चर्चेने जोर धरला : इमरान खान

IndianArmy, PulwamaDistrict, Jaishemohammad, Imran Khan, Pakistan, Narendra Modi, India

इस्लामाबाद : भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सांगत नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला.

दरम्यान त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी कोणताही पुरावा नसताना देखील भारताकडून पाकिस्तानवर आरोप केला जात असल्याचं सांगत इम्रान खान यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि पाकिस्तानची बाजू मांडली आहे. तसेच पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी, मी भारतीय सरकारसाठी उत्तर देत आहे असं स्पष्ट केलं. आम्हाला या हल्ल्याचा काय फायदा होणार असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. सध्या पाकिस्तान स्थिरतेकडे जात असताना अशा गोष्टी पाकिस्तान करण्याचा विचार देखील करणार नाही, असंही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.

दरम्यान, हा नवा पाकिस्तान आहे. तसेच नवी विचारसरणी आहे असं देखील इम्रान खान यांनी सांगितलं. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आम्ही तयार असून जे पुरावे आहेत ते भारताने आम्हाला द्यावेत अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आणि आम्ही योग्यती कारवाई करु असं आश्वासन देखील इम्रान खान यांनी दिलं. आम्ही भारताशी केव्हाही चर्चा करायचं म्हटलं की आधी दहशतवादावर चर्चा करण्याची मागणी पुढे केली जाते.

दहशतवाद मिटवावा अशी पाकिस्तानची देखील इच्छा आहे. ७० हजार पाकिस्तानी केवळ दहशतवादामुळे मारले गेले आहेत असं यावेळी त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, भारतात नवी विचारसणी येण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये अशी परिस्थिती का आहे याचा विचार भारताने करण्याची गरज आहे. काश्मीरचा मुद्दा चर्चेने सोडवला पाहिजे याकडे भारत लक्ष का देत नाही आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हॅशटॅग्स

#India Pakistan(24)#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x