18 January 2025 3:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

राष्ट्रवादीचा भाजपाला जोरदार धक्का | भाजपचे ज्येष्ठ नेते व वैद्यनाथ कारखान्याच्या व्हाईस चेअरमनसह 5 संचालक राष्ट्रवादीत

Minister Dhanjay Munde

परळी, २८ सप्टेंबर | लोकांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे यांना कोणी थांबवू शकत नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. यावेली बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

Four people, including senior BJP leader and Vaidyanath Karkhana vice-chairman Namdev Aghav, joined the NCP. At this time Jayant Patil was given a warm welcome in Parli :

महाराष्ट्रतल्या कुठल्याही नेत्याने घोटाळा केला की त्याचा पर्दाफाश धनंजय मुंडेंनी विरोधी पक्ष नेता असताना केला. बारामती पवारांच्या मागे उभी राहिली म्हणूनच विकास झाला. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम मुंडे भविष्यकाळात करतील. एक विधानसभेची निवडणूक झाली म्हणजे काही नाही, जवळचे लोक दूर गेले की सर्व संपते, धनंजय मुंडेंवर नवी जबाबदारी मिळाली, मला अध्यक्षपदाची धुरा दिली त्यावेळी अनेकांनी पक्ष बदलला होता, मात्र दोन वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती बदलली आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

माझ्या आढाव्यात धनंजय मुंडे पास झाले आहेत, परत मी आढावा घेण्यासाठी येणार नाही, असं जयंत पाटील हसत हसत म्हणाले. धनंजय मुंडे माझ्या भावासारखे आहेत, राजकीय सामंजस्यपणा धनंजय मुंडेंमध्ये आहे, असं सर्टिफिकेट जयंत पाटील यांनी दिलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Parali BJP leader Namdev Aaghav join NCP party in presence of minister Dhananjay Munde.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x