15 January 2025 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

Parambir Singh Missing | देश सोडून पळालेल्या परमबीर यांच्या आरोपांवर केंद्रीय एजन्सीने विश्वास का ठेवावा?

Parambir Singh Missing

नाशिक, ०२ ऑक्टोबर | अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास (Parambir Singh Missing) ठेवावा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

Parambir Singh, who accused Anil Deshmukh, has fled the country. Why should the ED and other agencies believe their allegations? This question has been asked by NCP State President and Water Resources Minister Jayant Patil. Parambir Singh Missing :

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली आहे. तिथं कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. ‘छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचं काम भाजप सरकारनं केलं. परंतु कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलं. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. लोकांची दिशाभूल करून सरकारला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. सरकार चांगलं काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे,’ असंही जयंत पाटील म्हणाले.

अजून ठोस माहिती नाही:
गृहमंत्रीगेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग हे नॉट रिचेबल असून ते कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. परमबीर सिंग यांच्या देशाबाहेर पलायनाच्या बातम्यांवर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांमधून अशी माहिती समोर येत असल्याचे म्हटले आहे. याविषयी अजून ठोस माहिती मिळाली नाही असे वळसे पाटील म्हणाले. पोलीस परमबीर सिंग यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने रजेवर असताना आपण कुठे आहोत हे कळविणे गरजेचे असते. मात्र सिंग यांनी याबाबतीत काही कळविलेले नाही असे पाटील म्हणाले. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Parambir Singh Missing minister Jayant Patil target NIA and CBI over allegations against Anil Deshmukh.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x