Parambir Singh | मोदी-शहांच्या गुजरातमध्ये परमबीर सिंग शेवटचे दिसलेले | तिथून देश सोडला | माझ्या कानावर आलंय..
गांधीनगर, ०१ ऑक्टोबर | एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Missing) यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.
Heard that Parambir Singh was last spotted in Ahmedabad Gujarat and then went missing from India. Gujarat is a safe haven for so many things tweet by Deepal Trivedi :
काही वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या नॉट रिचेबल असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग त्यांना पहिले समन्स देण्याअगोदरच देशाबाहेर पळाले आहेत. सिंग हे चंदीदडमधून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळून गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
अजून ठोस माहिती नाही:
गृहमंत्रीगेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग हे नॉट रिचेबल असून ते कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. परमबीर सिंग यांच्या देशाबाहेर पलायनाच्या बातम्यांवर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांमधून अशी माहिती समोर येत असल्याचे म्हटले आहे. याविषयी अजून ठोस माहिती मिळाली नाही असे वळसे पाटील म्हणाले. पोलीस परमबीर सिंग यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने रजेवर असताना आपण कुठे आहोत हे कळविणे गरजेचे असते. मात्र सिंग यांनी याबाबतीत काही कळविलेले नाही असे पाटील म्हणाले. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
वाइब्स ऑफ इंडियाच्या संपादिका दीपल त्रिवेदी यांनी ट्विट करून हा धक्कादायक दावा केला आहे. यासंदर्भात ट्विट करताना दीपल त्रिवेदी यांनी म्हटलं आहे की, “कानावर आलंय की परमबीर सिंग शेवटचे गुजरातच्या अहमदाबादमध्ये दिसले होते आणि नंतर तिथून त्यांनी ते भारता बाहेर फरार झाले. गुजरात राज्य बऱ्याच गोष्टींसाठी एक सुरक्षित स्वर्ग झालंय’. दीपल त्रिवेदी या मिड-डे मीडियामध्ये देखील महत्वाच्या पदावर होत्या आणि त्यांनी गुजरातची जवाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या ट्विटवर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहावं लागणार आहे.
Heard that #ParambirSingh was last spotted in #Ahmedabad #Gujarat andthen went missing from #India. #Gujarat is a safe haven for so many things!
— Deepal.Trivedi #VoI. (@DeepalTrevedie) October 1, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Parambir Singh was last spotted in Ahmedabad of Gujarat tweet made by Deepal Trivedi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा