15 January 2025 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

मोदींनी सीबीआय व रॉ प्रमुखांना स्वतःच्या निवासस्थानी का पाचारण केलं: काँग्रेसला शंका

नवी दिल्ली : सीबीआय या देशातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेतील सध्याच्या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जवाबदार आहेत आणि काही दिवसांपासूनची सीबीआय मधील घडामोडी या संशयास्पद आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. दरम्यान, मोदींनी CBI आणि RAW च्या प्रमुखांना आपल्या निवासस्थानी का बोलावले होते? संबंधित चौकशीवर प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न नव्हता का? मोदींनी त्यांना नेमक्या काय सूचना केल्या? असंवैधानिक पद्धतीने तपासात दखल देण्याचा हा प्रकार नव्हे का, असे एक ना अनेक प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भर पत्रकार परिषदेत केली आहेत.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सीबीआय सारख्या सर्वोच्च तपास संस्थेचा स्वतःच्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी दुरुपयोग केला आहे. त्यामुळे या संबंधित प्रकरणात मोदींची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. देशातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेच्या अशा अवस्थेसाठी केवळ मोदीच जबाबदार आहेत असा थेट आरोप काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रणित यूपीए सरकारमधील मंत्र्यांनी न्यायालयात देण्यात येणारे प्रतिज्ञापत्र पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. परंतु, आता स्वतः मोदी काय करत आहेत? आणि सीव्हीसी आज गप्प का आहे? का त्यांना सुद्धा याप्रकरणी थेट वरून आदेश येत आहेत? मोदी एक-एक करत महत्वाच्या संस्था कट रचून संपवत आहेत का? सध्या पंतप्रधानांनी सीबीआयची स्वायत्तता संपवून त्यांना बाहुले बनवले आहे असे एक ना अनेक आरोप काँग्रेसने केले आहेत.

मोदी सर्वकाही असंवैधानिक पद्धतीने या विषयात दखल देत आहेत. तसेच महत्वाचं म्हणजे अस्थाना यांचे नाव न घेता सुरजेवाला म्हणाले की, गोधरा प्रकरणात क्लिन चिट देण्याच्या मोबदल्यात CBI मध्ये त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे का, असा अप्रत्यक्ष संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x