16 April 2025 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी बोलावतात आणि अपमान करतात - नितीन गडकरी

राजकीय सत्ता म्हणजे विकासाचे साधन. परंतु २०१४, मोदी सरकार सत्तेत आल्यापासुन सर्वसामान्य जनता फक्त घोषणांचाच पाऊस झेलत असल्याचे चित्र सध्या तरी देशात आणि राज्यात दिसून येत आहे. यू.पी.ए. सरकारने केलेल्या योजना फक्त नामांतर करून पुन्हा लोकांसमोर मांडणे आणि काहीतरी मोठे केल्याचा गाजावाजा म्हणजेच उत्तम मार्केटिंग करणे हे या सरकारला उत्तम जमते असे काही जाणकारांचे मत आहे. असे काहीसे निर्णय हे सरकार बहुमताने न घेता सत्तेत काही महत्वाचे लोक, यशवंत सिंन्हांच्या मते अडीच लोक हे सगळे निर्णय घेतात आणि इतर सर्व जेष्ठ नेतेमंडीळीना डावललं जातं.

माजी खासदार आणि किसान खेत मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत असतानाचा एक असाच काहीसा अनुभव सांगितला. मोदी सरकारकडून देशभरात जीएसटी लागू करण्यात आला आणि त्यानंतर या निर्णयावर मत मांडण्यासाठी मोदींनी सर्वाना सांगितले. नाना पटोलेंनी मोदींच्या या निर्णयाला विरोध केला, हा विरोधाचा सूर ऐकताच मोदी पटोलेंवर संतापले आणि त्यांना प्रश्न केला ‘तुम्ही मला शिकवणार का?’. त्यानंतर हि बैठकच गुंडाळण्यात आली आणि तिकडे उपस्थित असलेल्या कोणत्याही नेत्याने माझ्याकडे येण्याची हिम्मत नाही दाखवली. परंतु मोदी सरकारमध्ये असलेला विकासाचा एकमेव चेहरा म्हणजे नितिन गडकरी हे त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना फक्त इतकंच म्हणाले ‘इथे घरी बोलावले जाते आणि अपमान केला जातो’.

मोदी-शहांची हि पद्धत भाजप नेत्यांना काही नवीन नाही आणि त्यांना याची सवय देखील झाली असावी. यांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणाऱ्या नेत्यांनी लोककल्याणाचा विचार आधी करावा हे अपेक्षित, परंतु तसे घडताना काही दिसत नाही. पक्षात अनेकजण दुःखी आणि नाराज आहेत त्यामुळे भाजपामध्ये फूट पडली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही असेही पटोले यांनी म्हटले आहे.

मी राजा आणि माझ्यासमोर कोणीही मोठे नाही असे मोदींचे धोरण आहे, अशी एकंदर टीका नाना पटोलेंनी औरंगाबाद मध्ये एका कार्यक्रमात बोलताना केली. मी सांगतो तेवढच ऐकायचं आणि तेवढच काम करायचं असेही पटोलेंनी निदर्शनास आणले. याचवेळी नाना पटोले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर पटोले म्हणाले, सत्तेत येण्याआधी फडणवीस सरकारने १ प्रश्न केला होता ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ आणि आता सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र गायबच करून टाकलाय अशी टीका करायला ते विसरले नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणजे सर्वात वाईट मुख्यमंत्री आहेत अशीही टीका पटोले यांनी केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या