27 April 2025 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

VIDEO: मिशेलच्या नावाने सोनियांची चर्चा; पण पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीला मोदी 'मेहुलभाई' म्हणाले होते

नवी दिल्ली : ३,६०० सहाशे कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारासंबंधित ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मिशेलने तपासणीदरम्यान चौकशीदरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती ईडी’ने आज पतियाळा हाऊस न्यायालयात दिली. दरम्यान, असं असलं तरी मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव कोणत्या संदर्भात घेतले ते मात्र ईडीने स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, आज न्यायालयात मिशेलला ७ दिवसांची ईडी कोठडी दिली.

‘इटालियन महिलेचा मुलगा’ आणि ‘देशाचा पुढचा पंतप्रधान होणार आहे’, असा उल्लेखही मिशेलने चौकशीत केल्याचे ईडीच्या वकिलांनी नमूद केले. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातून कसा एचएएलला डावलण्यात आलं आणि त्याजागी टाटाची कशी वर्णी लावली गेली, याचा तपशील सुद्धा मिशेलने दिल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले आहे. तसेच मिशेलला त्याच्या वकिलांना सुद्धा भेटण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी सुद्धा ईडीने न्यायालयाकडे केली. दरम्यान, मिशेलला त्याचे वकील सकाळी आणि संध्याकाळी असे दोनवेळा १५ मिनिटे भेटू शकतात, असे न्यालयानाने सांगितले आहे.

परंतु, आज ही बातमी ईडीने न्यायालयाला दिली असली तरी पीएनबी घोटाळ्यातील दुसरा आरोपी मेहुल चोक्सीने ४१ तासांचा विमान प्रवास करुन भारतात पोहोचणे अशक्य असल्याचे कोर्टात सांगितले आहे. ईडीने ११ जून रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांविरुद्ध २ स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या अर्जावरील सुनावणीत दरम्यान मेहुल चोक्सीने त्यांच्या वकिलांमार्फत ३४ पानी उत्तर कळवले आहे. त्यात मेहुल चोक्सीने म्हटले आहे की, मी पीएनबी’ला थकबाकी फेडण्यासंदर्भात प्रस्ताव याआधी दिला होता. दरम्यान, सदर विषयात अजून सुद्धा पत्रव्यवहार सुरुच आहे. मात्र, ईडीने ही बाब कोर्टापासून हेतु पुरस्कर दडवून ठेवली, असा दावा केला आहे.

परंतु याच मेहुल चोक्सीला पंतप्रधान नरेंद्र मोदी तो भारतातून फरार होण्यापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात “मेहुल-भाई” बोलले होते. याची कल्पना ईडीला होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. नरेंद्र मोदी मेहुल चोक्सीला ‘मेहुलभाई” बोलल्याचं व्हिडिओ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केला होता आणि तोच व्हिडिओ आम्ही आज तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony