22 January 2025 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

BREAKING | रणनितीकार प्रशांत किशोर आणि शरद पवारांची दिल्लीत भेट | राजकीय घडामोडींना वेग

Prashant Kishor

नवी दिल्ली , २१ जून | राष्ट्रवादी काँग्रेसचेसर्वेसेवा शरद पवार अखेर मोठ्या ब्रेकनंतर राजधानी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीसाठी रवाना झाले असून २३ जूनपर्यंत राजधानीमध्येच असणार असं वृत्त आहे. त्यामुळे दिल्लीत भारतीय जनता पक्षविरोधी रणनीतीला जोर येणार असल्याचं म्हटलं जातंय.

शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान, या दौऱ्यात ते कोणत्या नेत्यांना भेटणार याची चर्चा सध्या सुरु आहे. अशात आज(२१ जून) राजकीय रणनितिकार प्पशांत किशोर दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. या आधी ११ जूनला शरद पवार यांच्या मुंबईच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतली होती. या त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, मुंबईतील त्यांच्या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती होती असंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान, आजच्या प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीचा नेमका अर्थ काय आहे हे समजणं महत्वाचं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Prashant Kishor meet NCP President Sharad Pawar at news Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x