31 January 2025 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
x

नरेंद्र मोदी १६ तारखेला यवतमाळच्या दौऱ्यावर

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, ते महिला बचत गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहून त्याठिकाणी ते सभा देखील घेणार असल्याचे वृत्त आहे. तशी अधिकृत माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

यावेळी पूर्वनियोजित भेटीप्रमाणे पांढरकवडाला जाणार असून तेथे महिला बचत गटांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. यवतमाळमध्ये महिला बचत गटाचं मोठं जाळं असून त्याकडे राजकारणात एक मतपेटी म्हणून देखील पाहिलं जात. त्यामुळे यावेळी यवतमालमधील तब्बल १७,००० पेक्षा अधिक महिला बचत गट उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

सध्या येत असलेल्या निवडणूक सर्व्हेमध्ये भाजपाला हिंदी राज्यांच्या पट्यात मोठा फटका बसणार असल्याने भाजप इतर राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये ज्याठिकाणी मोदींनी सभा घेतल्या तिथे पक्षाला मोठा फटका बसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदी आता यवतमाळमध्ये येत असल्याने, राजकीय विश्लेषक विदर्भात भाजपबाबत वेगळेच संकेत देताना दिसत आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x