5 November 2024 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Priyanka Gandhi at UP Kisan Nyay Rally | मोदींच्या मतदारसंघात प्रियांका गांधींच्या रॅलीला तुफान गर्दी

Priyanka Gandhi at UP Kisan Nyay Rally

वाराणसी, 10 ऑक्टोबर | यूपी काँग्रेसने 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून औपचारिकरीत्या आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. प्रियांका गांधींनी प्रथम वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि दुर्गा मंदिरात पूजा केली. यानंतर एका सभेला संबोधित केले. या सभेचे नाव आधी ‘प्रतिज्ञा रॅली’ असे होते, आता त्याचे ‘किसान न्याय रॅली’ असे नामकरण करण्यात आले आहे. मोदींच्या मतदारसंघात प्रियांका गांधींच्या रॅलीला तुफान गर्दी (Priyanka Gandhi at UP Kisan Nyay Rally) झाल्याचं पाहायला मिळालं. प्रियंका गांधींनी रॅलीत आपल्या भाषणाची सुरुवात देवी दुर्गाच्या श्लोकाने केली. यानंतर योगी सरकारवर बोलताना त्या म्हणाल्या की, भाजप सरकारमध्ये न्यायाची आशा नाही.

Priyanka Gandhi at UP Kisan Nyay Rally. With the Lakhimpur Kheri violence which left eight people including four farmers dead becoming the focal point in the politics of poll-bound Uttar Pradesh, Congress leader Priyanka Gandhi Vadra addressed a ‘Kisan Nyay’ rally in Varanasi today (Sunday, 10 October) :

प्रियांका गांधी म्हणाल्या, येथे न्याय मागणारे लोक दाबले जातात. मग ते हाथरस, उन्नाव किंवा आता लखीमपूर खेरी असो. भाजप सरकार न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करतात, पण हे स्वातंत्र्य कोणी दिले आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य दिले आहे. ज्यांना ते भेटायलाही जात नाहीत.

वाराणसीतील किसान न्याय रॅलीमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा म्हणाल्या की, या देशाच्या गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने 6 शेतकऱ्यांना त्यांच्या कारखाली निर्दयपणे चिरडले आणि सर्व कुटुंबीय म्हणतात की, आम्हाला न्याय हवाय, नुकसान भरपाई नको. पण जो आपल्याला न्याय देतो तो या सरकारमध्ये दिसत नाही. येथील मुख्यमंत्री मंचावर बसलेल्या मंत्र्याचा (गृह राज्यमंत्री) बचाव करत आहेत, ज्यांच्या मुलाने असे कृत्य केले आहे. जे पंतप्रधान लखनऊला येऊ शकले, पण त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी दोन तासांच्या अंतरावर लखीमपूरला का जाऊ शकले नाहीत? असा सवालही त्यांनी केला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, जोपर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही लढतच राहू. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्या म्हणाल्या, जर तुम्ही जागरूक होणार नाही, जर तुम्ही त्यांच्या राजकारणात अडकलात तर तुम्ही ना स्वतःला वाचवू शकाल ना देशाला. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही या देशाचा आत्मा आहात. तुम्ही सर्व नेत्यांना स्टेजवर बसवले आहे. जे तुम्हाला आंदोलक म्हणतात, तुम्हाला दहशतवादी म्हणतात, त्यांना न्याय देण्यास भाग पाडतात. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते कुणाला घाबरत नाहीत. आम्हाला तुरुंगात टाका, आम्हाला ठार करा, काहीही करा, पण आम्ही लढत राहू, आम्ही लढत राहू, जोपर्यंत गृह राज्यमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही हलणार नाही.

हे सुद्धा वाचा – EPFO Alert For Account Holders | तुमचं EPF अकाउंट आहे? | मग ही बातमी वाचा

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Priyanka Gandhi at UP Kisan Nyay Rally after Lakhimpur Kheri violence.

हॅशटॅग्स

#PriyankaGandhi(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x