5 February 2025 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
x

Prashant Kishor's Strategy | प्रियंका गांधी-वाड्रा थेट विधानसभा निवडणूक लढवणार

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ, १५ सप्टेंबर | काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा पुढील वर्षी होणाऱ्या यूपी विधानसभा निवडणुकीत रायबरेली किंवा अमेठीमधील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतात. असे झाल्यास, प्रियंका या विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या गांधी कुटुंबातील पहिल्या सदस्य असतील. यापूर्वी गांधी कुटुंबातील सर्व सदस्यांनी फक्त लोकसभा निवडणूक लढवली आहे.

Prashant Kishor Strategy, प्रियंका गांधी-वाड्रा थेट विधानसभा निवडणूक लढवणार  – Priyanka Gandhi Vadra will contest in Uttar Pradesh Assembly Election 2022 as per Prashant Kishor advice :

सुत्रांचे म्हणणे आहे की, प्रियंकाची पहिली पसंती अमेठी आहे, कारण त्यांना राहुल गांधींच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी अमेठीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मैदान तयार करायचे आहे. जेणेकरून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणींना आव्हान दिले जाऊ शकते.

प्रशांत किशोर यांनीही प्रियंका यांना दिली आहे सूचना:
गेल्या काही दिवसांपूर्वी लखनौ येथे झालेल्या बैठकीत सल्लागार समितीने प्रियंका यांना असेही सांगितले होते की, त्या निवडणूक रिंगणात आल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला नवी ताकद मिळेल. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही प्रियंका यांना सुचवले होते की त्यांनी स्वतः विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरले पाहिजे.

प्रियंकाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसवाल्यांनी कंबर कसली:
प्रियंका गांधींनी स्वतः निवडणूक लढवण्याबाबत किंवा नाही याबद्दल कोणतेही संकेत दिले नाहीत, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांच्या कार्यालयातून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यासाठी रायबरेली आणि अमेठीचा डेटा गोळा केला जात आहे.

रायबरेली किंवा अमेठी का?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींच्या पराभवानंतर गांधी कुटुंबाचे वर्चस्व कमी झाल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रायबरेलीतील गांधी परिवाराचा जनतेशी असलेला संपर्कही कमी झाला आहे.

अशा स्थितीत अमेठी आणि रायबरेली भागातील लोकांशी काँग्रेसचे संबंध प्रियांकाच्या निवडणुकीमुळे अधिक मजबूत होऊ शकतात. रायबरेली आणि अमेठी हे वर्षानुवर्षे गांधी घराण्याचे गड आहेत आणि प्रियंका यांना हे नाते कमकुवत होऊ नये असे वाटते. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी यूपी विधानसभा निवडणुकीत प्रियंका काँग्रेसचा चेहरा असेल असे औपचारिकपणे सांगितले आहे.

निधी उभारण्यासाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशात नवीन मार्गही शोधला आहे. प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी एक परिपत्रक जारी केले आहे की, ज्याला तिकीट हवे असेल त्याला 25 डिसेंबरपर्यंत पार्टी फंडात 11,000 रुपये जमा करावे लागतील. तिकिटासाठी आधी अर्ज भरावा लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Priyanka Gandhi Vadra will contest in Uttar Pradesh Assembly Election 2022 as per Prashant Kishor advice.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x