25 April 2025 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
x

शरद पवारांना निमंत्रित करून उपराष्ट्रपतींचे स्वागत पुणेरी पगडीने?

पुणे : सध्या महाराष्ट्रात पगडी राजकारणाने जोर पकडल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यांचे स्वागत पुणेरी पगडी घालून करण्याचा निर्णय पुण्यातील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेतल्याचे समजते.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एनसीपीच्या वर्धापनदिनी भविष्यात फुले पगडीच वापरण्याचे आदेश शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास त्यांना कोणती पगडी घालण्यात येणार याची चर्चा सध्या पुणे महापालिकेत रंगली आहे.

तर प्रसार माध्यमांनी केलेल्या खात्री असं समजलं की, भारताचे उपराष्ट्रपतीं आणि त्यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित सर्वांनाच पुणेरी पगडी घालण्यात येणार असून स्वतः महापौर मुक्ता टिळक यांनीही मान्यवरांना पुणेरी पगडी घालण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचा विचार करता हे राजकारण भविष्यात वेगळेच स्वरूप घेऊ शकत हे नक्की आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony