15 January 2025 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA
x

पद्म पुरस्कार: फिल्मी भाजप, श्रीदेवी, रमाकांत आचरेकर सर व राज यांनी मांडलेलं ते वास्तव आज सिद्ध झाले

मुंबई : भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे आणि जो भविष्यात भारतरत्न झाला, अशा महान सचिन तेंडुलकरचे गुरु आणि पद्म पुरस्कार विजेते द्रोणाचार्य रमांकात आचरेकर सर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मुंबईतील अनेक महान क्रिकेटपटू, जाणकार आणि राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले गुरु आचरेकर सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. दरम्यान, यावेळी सचिन आणि सरांचे सर्वच शिष्य अत्यंत भावुक झाले होते.

मात्र फडणविस सरकारला आचरेकर सरांच्या कर्तृत्वाचा विसर पडलेला पहायला मिळाला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे असते. विशेष म्हणजे हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारित येतो. मात्र फडणवीस सरकारने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे क्रिकेट प्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे याच फिल्मी भारतीय जनता पक्षाने बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी जेव्हा मद्यपान केल्याने दुबईतील एका हॉटेलमध्ये अपघाताने मृत्युमुखी पडली होती. तेव्हा ती पद्म पुरस्कार विजेती असल्याने भारतीय तिरंग्यात तिला लपेटून माध्यमांना मोठा कव्हरेज करण्याचे जणू आदेशच दिले होते.

श्रीदेवीच्या मृत्यूवेळी काही मुद्यांवरून भाजप विरोधात देशभर रान पेटले होते आणि त्यावरून सामान्य लोकांचे मन विचलित करण्यासाठी श्रीदेवीच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचा मोठा देखावाच केला होता. परंतु, आज जेव्हा इतके महान गुरु, ज्यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले होते, त्यांचा मात्र भाजपच्या फिल्मी सरकारला विसर पडला आहे, असंच म्हणावं लागेल. रोजच्या प्रमाणे सरकारने केवळ दिलगिरी व्यक्त करून वेळ मारून घेतली आहे.

श्रीदेवी यांचा दुबई येथे आकस्मिक निधन झाले होते आणि त्यांच्या शवविच्छेदनात त्यांनी मध्यपान केल्याचे सुद्धा समोर आले होते. त्यांचा पार्थिव अंत्यसंस्कारावेळी तिरंग्यात लपेटण्यात आला होता आणि त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा गुढीपाडव्या दिवशीच्या सभेत पद्मश्री पुरस्कार हे ‘तिरंग्याच’ कारण म्हणजे ‘झूट’ असा शब्दप्रयोग करून टीका केली होती.

परंतु राज ठाकरे यांची टीकेतील तो ‘झूट’ शब्द अखेर खरा ठरला होता. सर्व काही माहितीच्या अधिकारात उघड झालं होतं. जर पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. म.के. ढवळीकर यांचे दि. २७ मार्च रोजी पुण्यात निधन झाले. त्यांना सरकारने २०११ मध्ये पद्मश्रीने गौरवले होते. पण श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांना मिळालेल्या पद्मश्रीचा दाखला देत त्यांच्या पार्थिवाला शासकीय इतमाम दिला. पण पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. म.के. ढवळीकर यांच्याकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केले. फडणवीस सरकारने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कही साधला नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या या दुजाभावावर टीका होताना दिसले होते.

परंतु, माहितीच्या अधिकारात वेगळीच आणि धक्कादायक बाब समोर आली होती. एखाद्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचे समोर आले होते. त्यामुळे श्रीदेवींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे आता स्पष्ट झाले होते. पण त्यावेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. म.के. ढवळीकर यांच्याकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केले होते. तसाच प्रकार आता पद्म पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सरांच्या बाबतीत घडला आहे.

माहितीच्या अधिकाराचा वापर करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी श्रीदेवी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराबाबत आणि याची परवानगी देण्याचे अधिकार कोणाला आहेत, याची माहिती महाराष्ट सरकारच्या राजशिष्टाचार विभागाला मागितली होती. राजशिष्टाचार विभाग हा सामान्य प्रशासनाच्या अंतर्गत येतो. एखाद्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्याचा असल्याचे राजशिष्टाचार विभागाने सांगितले होते.

दुसरं धक्कादायक याच माहितीच्या अधिकारात उघड झालं म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयातून दि. २५ फेब्रुवारी रोजी ‘तोंडी आदेश’ देण्यात आले होते. तेच आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले. थोडक्यात ‘पद्मश्री पुरस्कारा’मुळे नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करता येतात, ही नवीन माहिती गलगली यांना मिळालेल्या उत्तरावरून समोर आली होती.

याचा अर्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या दिवशीच्या सभेत पद्मश्री पुरस्कार हे ‘तिरंग्याच’ कारण म्हणजे ‘झूट’ असा केलेला शब्दप्रयोग हा योग्य असल्याचं समोर आलं आहे. सरकारने नीरव मोदी आणि बँकेतील घोटाळ्याच्या बातम्यांवरून जनतेचं लक्ष हटाव म्हणून जाणीवपूर्वक श्रीदेवी मृत्यू हे प्रकरण तापवण्यात आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी सभे दरम्यान केला होता. त्यामुळे श्रीदेवीच्या मृत्यूवेळी आदेश देणारे मुख्यमंत्री रमाकांत आचरेकर सरांच्या बाबतीत दुजाभाव करताना दिसले आहेत. त्यामुळे कोणी कितीही महान का असेना जर ते भाजपच्या फायद्याचं किंवा सोयीचं नसेल त्या व्यक्तिमत्वाच्या महान असण्याचा भाजपच्या मतलबी राजकारणापुढे काहीच अर्थ नाही, असंच दुर्दैवाने बोलावं लागेल.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x