13 January 2025 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा
x

संख्याबळ असलेले विरोधक नव्हे, तर संख्याबळ नसलेले राज ठाकरेच आगामी निवडणुकीत भाजपला उजवे ठरतील: सविस्तर

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध पोटनिवडणुका, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल आणि भाजपाची घोडदौड पाहता, त्यांच्या समोर आमदार, खासदार असं संख्याबळ असणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष सुद्धा फिके पडताना दिसत आहेत. तर पदवीधर निवडणुकांचे निकाल हे जवळजवळ निश्चित असतात आणि त्या निवडणुकीचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडणे अवघड आहे. परंतु पदवीधर निवडणुकीत सुद्धा भाजपने कोकणात चमत्कार केला तर नाशिकमध्ये ते गाफील राहिल्याने जागा गमवावी लागली होती.

आज राज्यातील भाजपच्या सर्व विरोधकांची निवडणुकांच्या निकालावरून स्थिती बघितल्यास, ते भाजपाला नियोजनबद्ध आणि मुद्देसूद पद्धतीने फैलावर घेऊन मतदारांवर छाप पाडण्यात अक्षरशः अपयशी पडताना दिसत आहेत. अगदी शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आज शिवसेनेकडे ६३ आमदार, १९ खासदार, शेकडो नगरसेवक आणि डझनभर मंत्री असूनही पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभव आणि अगदी कालच्या जळगाव तसेच सांगली-मिरज महानगरपालिका निवडणुकीत त्यांना अस्तीत्व शोधण्याची वेळ आली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीसारखा पक्ष ज्यांचं ग्रामीण भागातील प्रस्थ मोठं मानलं जात आणि त्यात शरद पवारांसारखे अनुभवी राजकारणी आणि अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि एक ना अनेक असे राज्यातील आणि ग्रामीण भागातील धुरंदर चेहरे असताना सुद्धा राष्ट्रवादीची अवस्था ही त्यांची २०१९ मधील अस्वस्थता वाढवणारी आहे. तर राज्यात काँग्रेसला कोणी चेहराच उरलेला नाही, ज्याला ऐकण्यासाठी लोकं जमतील. राज्यातील काँग्रेस तर राम भरोसेच आहे असं चित्र आहे. भाजपाची घोडदौड पाहता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इतर नेते सुद्धा भविष्यात आयत्यावेळी भाजपच्या गळाला लागले नाही तर आश्चर्य वाटायला नको.

तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सर्व पोटनिवडणूका, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीकडे न पाहता केवळ आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर केंद्रित झाल्याचे, त्यांच्या राज्यभरातील दौऱ्यावरून तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यावरून दिसून येत आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणूक मनसेने न लढविण्याचा निर्णय घेतला होता, तरी मनसे अध्यक्षांची पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच झालेली जाहीर सभा आणि त्याला मिळालेला स्थानिक लोकांचा प्रतिसाद सर्वच प्रसार माध्यमांवर दिसत होता. राज ठाकरे समाज माध्यमांवर आल्यामुळे महाराष्ट्र सैनिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवर आले असून विरोधकांना चांगलेच कात्रीत पकडत आहेत, ज्याचा पक्षाला भविष्यत फायदा होऊ शकतो. जनतेच्या हिताच्या प्रश्नांना हात घालून मतदारांमध्ये त्यांचे वेगळे स्थान निर्माण करताना पक्ष दिसत आहे. विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी संघटनांपर्यंत सर्वच थरातील लोकं कृष्णकुंज’वर धाव घेताना दिसत आहेत आणि ही मनसेची आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भाजप विरुद्धची अवस्था पाहता आगामी निवडणुकीत राज ठाकरे हेच प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी असतील, कारण तेच भाजपची आणि त्यांच्या कारभाराची पिस काढतील आणि ती सुद्धा अगदी नियोजनबद्ध अशीच शक्यता आहे. गतकाळापेक्षा ते आगामी निवडणुकीत अधिक आक्रमक आणि मुद्देसूद प्रचार करतील असं त्यांच्या सध्याच्या कार्यशैलीतून जाणवत आहे. मनसेच्या पहिल्या फळीतील नेते सुद्धा पक्ष विस्तारात उतरले आहेत. त्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेचा मूळ मतदार हा त्यांच्या सत्ताकाळातील अनुभवामुळे मोठ्याप्रमाणावर मनसेकडे वर्ग होऊ शकतो, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. कारण सध्याच्या निवडणुकीचे निकाल पाहता मतदार हा भाजप’पेक्षा शिवसेनेवर अधिक नाराज असल्याचं लक्षात येत आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा भाजप’पेक्षा शिवसेनेवर अधिक तापण्याची शक्यता आहे. त्यात नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील पारंपरिक मतदार सुद्धा शिवसेनेवर नाराज असल्याने, त्याचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटत.

त्यामुळे भाजपवर नाराज असलेला मराठी मतदार हा यंदा शिवसेनेपेक्षा मनसेला मतदान करण अधिक पसंत करेल अशी शक्यता आहे. इतकच नाही तर काँग्रेसची राज्यातील अवस्था आणि नैतृत्व पाहता, त्यांचा मराठी मतदार सुद्धा भाजप किंवा शिवसेनेपेक्षा मनसेला पसंती देऊ शकतो. त्यामुळे मनसेसाठी आगामी निवडणुकीचं वातावरण पोषक असल्याचं चित्र प्राथमिक स्थितीत असलं तरी, जस जसा वेळ पुढे सरकेल तस ते चित्र अधिक गडद होत जाईल अशी शक्यता आहे. राज ठाकरे आणि त्यांची भाषण शैली आणि त्यातील मुद्देसूद मांडणी तरुणांना आज ही भावते हे वास्तव आहे. त्यामुळे राज ठाकरे हेच मनसेची खरी ताकद असतील आणि तेच राज्यात सर्व विरोधी पक्षांच, भाजप विरोधात अघोषित नैतृत्व करतील अशीच शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x