26 April 2025 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

चहाच्या टपरीवरच मोदींच्या पराभवाची चर्चा होईल: राजू शेट्टी

देऊळगाव : नरेंद्र मोदींनी ज्या चहाच भांडवल केलं आणि सामान्य जनतेची फसवणूक केली, तीच जनता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? याची चर्चा चहाच्याच टपरीवर करताना दिसतील असं भाकीत राजू शेट्टी यांनी देऊळगाव येथे केलं.

शेतकर्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशन बोलावण्याची आमची मागणी मान्य करावी अस आवाहन करत, २०१९ मधील निवडणूक धर्माच्या आणि जातीच्या नावावर लढणाऱ्या आणि स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी म्हणवणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिसका दाखवा असं खुलं आवाहन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी देऊळगाव येथे उपस्थितांना संबोधित करताना केलं.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेची महाराष्ट्र दिनापासून धुळे जिल्ह्यातील ‘वखरण’ येथून ‘शेतकरी सन्मान यात्रा’ सुरू झाली होती आणि ५ मे रोजी रात्री ती देऊळगाव मही येथे पोहोचली होती त्यावेळी राजू शेट्टी उपस्थितांना संबोधित करत होते. ही लढाई नेतृत्व स्थापन करण्यासाठी नसून परिवर्तन करण्यासाठी आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली असून सरकारचे आयात संदर्भातील धोरण हे शेतकऱ्यांसाठी अतिशय मारक ठरत आहे. तसेच केंद्र सरकारने जर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस स्वकारल्या असत्या तर वेतन आयोगाप्रमाणे सरकारला फरक द्यावा लागला असता. आधीच नोटबंदी व जीएसटीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे असं ही राजू शेट्टी म्हणाले.

देऊळगाव मही येथे ‘शेतकरी सन्मान यात्रेला’ माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगूले, कवी ज्ञानेश वाकुडकर, महिला प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, राज्य उपाध्यक्ष सयाजी मोरे, अमोल हिप्परगे, अनिल पवार, राज्य उपाध्यक्षा शर्मीला येवले, बबनराव चेके, घनशाम चौधरी, माणिकराव कदम, गजानन बंगाळे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony