23 January 2025 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला, तज्ज्ञांकडून मोठे संकेत - NSE: IREDA Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH Airtel New Plans | एअरटेलचे 2 नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च, मिळतील अनलिमिटेड बेनिफिट्स, एकदा किंमत पाहून घ्या Credit Card | केवळ बिल पेमेंट करून सिबिल स्कोर सुधारणार नाही, या पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरुवात करा
x

कराडांबाबत पवारांनी सांगितलेलं कारण खरं निघालं

लातूर : रमेश कराड यांनी पंकजा मुंडेंना दुर्लक्षित करत राष्ट्रवादीत विधानपरिषदेच्या तोंडावर प्रवेश केला खरा, पण त्यांनी ५ दिवसात राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी उमेदवारी मिळून सुद्धा का पक्ष का सोडला याचे अनेक तर्क वितर्क जोडले गेले. काहींनी त्याचा दोष धनंजय मुडेंना सुद्धा दिला. परंतु काही दिवसांपूर्वी स्वतः शरद पवारांनी त्यामागे उमेदवाराची आर्थिक कुवत हे कारण दिल होत.

इतकच नाही तर रमेश कराड यांच्या निर्णयामागे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा मास्टरस्ट्रोक वगरे बोललं जाऊ लागलं. परंतु ते सर्व चुकीचे तर्क होते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांनी दिलेलं कारण योग्य असल्याच समोर आलं आहे. स्वतः रमेश कराड यांनी एका खासगी वृत्त वहिनीला खरं कारण सांगितलं आहे.

रमेश कराड म्हणाले की, मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे विधानपरिषदेची अर्ज दाखल केला. परंतु मला आधी ठरवलेल्या बजेटपेक्षा अधिक पैसे मागण्यात आले. त्यामुळे माझ्या आर्थिक कुवतीप्रमाणे ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी सोडून माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला असं ते म्हणाले.

पुढे रमेश कराड असं म्हणाले की, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. तसेच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेलं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं आहे. त्यामुळे कुठेतरी चुकल्यासारखं वाटू लागलं म्हणून कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत भाजपात काम केलं आहे व भविष्यातही भाजपसाठी काम करणार असं कराड यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x