15 April 2025 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

राज्यातील आमदार, खासदारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची राजकीय परंपरा... म्हणून

Minister Balasaheb Thorat

मुंबई, २३ सप्टेंबर | काँग्रेस खासदार राजू सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवर एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घातली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे.

काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातल्याची चर्चा, थोरात म्हणाले, काँग्रेसला विजयाचा विश्वास – Revenue minister Balasaheb Thorat gave explanation on discussed with Devendra Fadnavis over Rajya Sabha by polls :

राज्यातील आमदार किंवा खासदारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, त्या जागी निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. त्या परंपरेनुसार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर निवडणूक न होता ती बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षाला विनंती करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज देवेंद्र फडणीस यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज 22 सप्टेंबरला भरण्यात आला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते, की राजीव सातव यांच्या निधनानंतर त्या जागी राजीव यांच्या पत्नीला उमेदवारी दिली असती तर, भाजपने उमेदवार दिला नसता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केल्यानंतर भाजप नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Revenue minister Balasaheb Thorat gave explanation on discussed with Devendra Fadnavis over Rajya Sabha by polls.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या