5 November 2024 9:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

यूपीत मोदी व योगींना नाकारलं, आरएलडी व सपाकडून भाजपचा पराभव

कैरना : उत्तर प्रदेशातील कैरना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला धोबीपछाड करत आरएलडीने विजय संपादित करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चांगलाच धक्का दिला आहे. आधीच गोरखपूर आणि फुलपूर निवडणुकीतील पराभवानंतर योगी आदित्यनाथ आणि भाजपवर प्रचंड दबाव होता. अखेर २०१९ मधील निवडणुकीपूर्वी भाजपला अजून एक जोरदार धक्का उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत बसला आहे.

कैरना लोकसभा पोटनिवडणुकीत आरएलडीचे उमेदवार तबस्सुम हसन यांनी भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यामध्येच तबस्सूम हसन यांनी 35 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. भाजपा खासदार हुकूम सिंह यांच्या निधनामुळे कैराना लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील नूरपुर विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीचे उमदेवार नईम ऊल हसन यांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली आहे.

०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून देण्यात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. परंतु गोरखपूर आणि फुलपूर निवडणुकीत पराभवानंतर भाजपसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अखेर त्यांना पुन्हां पराभवाचा धक्का बसल्याने २०१९ चा सत्ता स्थापनेचा मार्ग कठीण होताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x