22 November 2024 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

RSS व भाजपाच्या ऑगस्टमधील गुप्त सर्वेक्षणातील धक्कादायक आकडेवारीमुळे रुपाणींचा राजीनामा? - सविस्तर वृत्त

Hardik Patel

गांधीनगर , १२ सप्टेंबर | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा भाजपने घेतलेला राजीनामा ही रणनीती आहे की अचानक घेतलेला निर्णय आहे? विजय रुपाणी यांचा राजीनामा अचानकपणे घेण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. विजय रुपाणी आणि पक्षाच्या संघटनात खूप दिवसांपासून मतभेद सुरू होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध नव्हते. त्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकदा हस्तक्षेप केला होता. सुत्राच्या माहितीनुसार 2021 मध्ये भाजपच्या प्रदेश नेत्यांनी रुपाणी यांच्याविरोधात पक्षाच्या वरिष्ठांना अहवाल दिला होता. विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात सरकार कमकुवत झाल्याचे अहवालात म्हटले होते. गुजरातच्या राजकारणात रुपाणींच्या राजीनाम्यांची खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती.

RSS व भाजपाने ऑगस्टमध्ये केलेल्या गुप्त सर्वेक्षणामधील धक्कादायक आकडेवारीमुळे रुपाणींचा राजीनामा? – RSS and BJP survey made in August is the reason behind resignation of CM Vijay Rupani said Hardik Patel :

गुजरात भाजपमधील स्थिती नियंत्रणात येण्यासाठी वेळेपूर्वी विधानसभा निवडणूक घेण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे. स्थानिक आमदारांमधील असंतोष आणि सरकार विरोधातील असंतोषाची लाट थोपविण्यासाठी मुख्यमंत्री बदलण्यात येत असल्याची चर्चा आहे. 2022 च्या सुरुवातीला 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले तर गुजरातची निवडणूक ही लवकर होऊ शकते. दरम्यान, रुपाणी यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा सूत्रे स्वीकारली होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरुन भाजपा आणि रुपाणी यांच्यावर निशाणा साधलाय.

ऑगस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने केलेल्या गुप्त सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. काँग्रेसला ४३ टक्के मतांसहीत ९६ ते १०० जागा आणि भाजपाला ३८ टक्के मतांसहीत ८० ते ८४ जागा, आपला ३ टक्के मतांसहीत ० जागा, एमआयएमला एक टक्के मतांसहीत ० जागा आणि सर्व अपक्षांना १५ टक्के मतांसहीत ४ जागा मिळणार आहेत,” असं पटेल म्हणालेत. मुख्यमंत्री रुपाणी यांचा साजीनामा राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी घेण्यात आल्याचा आरोपही पटेल यांनी केलाय. मात्र त्याचवेळी त्यांनी खरा बदल पुढील वर्षीच्या निवडणुकांमध्ये होणार आहे जेव्हा जनता भाजपाला सत्तेतून बाजूला करेल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केलाय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: RSS and BJP survey made in August is the reason behind resignation of CM Vijay Rupani said Hardik Patel.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x