22 January 2025 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Rupali Chakankar | वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो, तसा बोलण्यातही | संवेदनाहिन मनाच्या अन अर्धवट ज्ञानाच्या

Rupali Chakankar

मुंबई, 11 ऑक्टोबर | उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारा निषेध म्हणून आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात सर्व ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान, आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावलाय. तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Rupali Chakankar. Opposition leader Devendra Fadnavis’s wife Amrita Fadnavis has slammed the Mahavikas Aghadi government over today’s Maharashtra bandh. NCP state president Rupali Chakankar responded strongly to Amrita Fadnavis :

अमृता फडणवीस या ट्वीटर किंवा अन्य माध्यमातून सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात. लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरही अमृता फडणवीसांनी टीका केलीय. आज वसुली सुरु आहे की बंद? असा खोचक सवाल करत महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न अमृता फडणवीस यांनी केलाय.

अमृता फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असं ट्वीट चाकणकर यांनी केलंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Rupali Chakankar reply to Amruta Fadnavis over statement during Maharashtra Bandh/

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x