14 November 2024 11:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भाजपशी युतीसंदर्भात भूमिका | खेडेकरांच्या पत्नी भाजपच्या माजी आमदार

Sambhaji Brigade

पुणे, १६ सप्टेंबर | पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकीय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची भूमिका मांडली. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये भाजपसोबतच्या युतीची भूमिका मांडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. कारण आगामी निवडणुकीसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड हे आता भाजपसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसून येतंय.

संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भाजपशी युतीसंदर्भात भूमिका, खेडेकरांच्या पत्नी भाजपच्या माजी आमदार – Sambhaji Brigade should make alliance with BJP says Purushottam Khedekar :

मराठा सेवा संघाची स्थापना 1 सप्टेंबर 1993 रोजी अकोला या ठिकाणी करण्यात आली. मराठा समाजातील अधिकाऱ्यांची एक संघटना म्हणून या संघटनेकडे सुरुवातीला बघितलं जात होतं. भारतीय जनता पक्ष हा अर्थातच आरएसएसच्या नेतृत्त्वातील पक्ष आहे. विशेष म्हणजे मराठा सेवा संघाची संपूर्ण मांडणी ही आरएसएस विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात आहे. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा विचार मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, नेहमीच भाजपाच्या विरोधात भूमिका घेणारी संभाजी ब्रिगेड सोबत जाण्यासाठी कसे तयार झाली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून अशाप्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आमची कोअर कमिटी निर्णय घेईल. असा काही प्रस्ताव असेल तर तो राज्याच्या प्रदेशाध्यक्षांकडेच यायला हवा. आमचा पक्ष हा जगभर पसरलेला आहे. देशात १२ राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे इतक्या सहजपणे हे निर्णय होत नाहीत. त्याची मोठी प्रक्रिया असते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

खेडेकरांच्या पत्नी माजी भाजप आमदार:
संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघ नेहमी RSS-भाजपविरोधी भूमिका घेऊन मैदानात उतरल्याचं सर्वांना माहिती आहे. मात्र पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी रेखाताई खेडेकर या भाजपच्या आमदार होत्या. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी संघ-भाजपवर टीका केली होती. इतकंच नाही तर तत्कालिन सरसंघचालक के. सुदर्शन यांच्यावर चप्पल भिरकावणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचा सत्कार खेडेकर यांनी केला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Sambhaji Brigade should make alliance with BJP says Purushottam Khedekar.

हॅशटॅग्स

#SambhajiBrigade(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x